Lek Ladki Yojana Apply : मुलगी 18 वर्षांची होताच तिला मिळणार 75 हजार रुपये, पहा अर्ज कोठे करावा आणि कसा करावा…? जाणून घ्या…
Lek Ladki Yojana Apply 2024 : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस देखील उपस्थीत होते.
लेक लाडकी योजना अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा
राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…
- सर्वात प्रथम लाभार्थी मुलीचा जन्म दाखला सादर करावा लागेल.
- वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत असल्यास तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला.
- मुलींचे व पालकांचे आधार कार्ड. (पहिल्यांदा लाभ घेत असताना मुलीच्या आधारकार्डसाठी सूट मिळेल.)
- राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, यासोबतच रेशन कार्डची झेरॉक्स.
- मतदान ओळखपत्र सादर करावे लागेल. (शेवटचा लाभ घेत असताना मुलीचे नाव मतदार यादीत असणे बंधनकारक आहे.)
- लाभ घेत असताना प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत आहे याचे प्रमाणपत्र म्हणजेच बोनाफाईड.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र पालकांना सादर करावे लागेल.
- अंतिम लाभ घेत असताना मुलीचा विवाह झालेला नसावा. म्हणजेच अविवाहित असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करावे लागेल. Lek Ladki Yojana Apply