Loan For Women’s : महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज ……..!
Loan For Women’s : मातृकेंद्रित पर्यटन धोरण जाहीर केले. चार महिने झाले. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतून फारच कमी प्रस्ताव दाखल झाले आहेत. या योजनेबाबत जनजागृती होत नसून या योजनेची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत पोहोचली नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. पर्यटन क्षेत्रातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विकास विभागाने ही योजना तयार केली आहे. पर्यटन व्यवसायासाठी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसाय महिलांच्या मालकीचा आणि चालवायला हवा.