Maharashtra Weather Forecast : राज्यात आज पासून धो-धो बरसणार पाऊस, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात हाई अलर्ट जारी ! वाचा सविस्तर….
Monsoon 2023 Update In Maharashtra : उशिराने दाखल होत असलेल्या मान्सूनची प्रतिक्षा आता संपली असून पुढच्या २ दिवसांमध्ये पाऊस कोकणासह महत्त्वाच्या भागांमध्ये बरसणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. नेमका कुठे आणि कधी होईल पाऊस ?
हवामान विभागाचे अधिकृत अंदाज पाहण्यासाठी इथे पहा !
मुंबई : केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला.
या चार राज्यांमध्ये सौर कृषी पंपांना 95% अनुदान मिळत आहे, त्वरित ऑनलाइन अर्ज करा.
चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काही काळासाठी मंदावला. दुसरीकडे पूर्वेकडील वाऱ्यांची गती नियमित होती. त्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात लवकर शिरण्याची शक्यता असल्याचे मत काही हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे.