Monsoon Update : अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा , जाणून घ्या या आठवड्यात हवामानाची स्थिती.
Maharashtra Monsoon News : येत्या २४ तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहील.
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होत असल्याने हवामानात वारंवार बदल होत आहेत. राज्यात ऊन आणि पावसाची लपाछपी सुरूच आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडक उष्मा आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याने आणि पावसाने कहर केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) देखील नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पंजाबराव डख यांचे हवामानविषयक अंदाज येथूनच जाणुन घ्या !
Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनच्या (Kerala Monsoon Onset) प्रवेशाबाबत, आयएमडीने सांगितले की, परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. मात्र, केरळमध्ये मान्सून कधी सुरू होईल, त्याची नेमकी तारीख अद्याप सांगता येणार नाही. आम्ही निरीक्षण करत आहोत आणि सोमवारी याबाबत अपडेट जारी करू. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे.