Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या ह्या योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार सौर कृषी पंप मिळणार

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : काल २६ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला ह्या अर्थसंकल्पामध्ये शासनाच्या वतीने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मागेल त्याला सौरकृषी पंप ही नवीन योजना शासनाच्या वतीने लवकरच सुरू करण्यात येत आहे.हया योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana:

ह्या योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप बसविण्यात येणार आहेत.

पीएम कुसुम योजनेअंतर्गत ह्या वर्षी एक लाख सौर कृषी पंप स्थापित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी ७८ हजार ७५७ पंप आतापर्यंत कार्यान्वित करण्यात आले आहेत.असे देखील अर्थसंकल्पात सांगितले गेले आहे.

राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षांत आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीजदर सवलतीस एक वर्षाची मुदत वाढ देखील दिली जाईल.वीज सेवा उपलब्ध नसलेल्या महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३७ अंगणवाडी केंद्रांना सौर उर्जा संच दिला जाईल.

वन्य प्राणींदवारे होत असलेल्या शेती पिकांच्या नुकसानाला डाॅ शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास ह्या योजनेअंतर्गत शेतकरींना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान दिले जाईल.

ह्या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होईल अणि प्रदुषणात घट होईल.तसेच हरीत उर्जा निर्मिती क्षेत्रात आपले महाराष्ट्र राज्य अग्रेसर होण्यास मदत होईल.

२०२४/२०२५ ह्या वर्षाच्या खर्चाकरीता ११ हजार ९३४ कोटीचा निधी प्रस्तावित आहे.

अयोध्या म्हणजेच राम जन्मभूमी मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २०२८ जाहिर करण्यात आले आहे.हया धोरणा अंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधा पत्रिका वर सार्वजनिक वितरण प्रणाली दवारे एका कुटुंबास एका साडीचे मोफत वितरण केले जाणार आहे.

  • राज्यात अठरा लघुवस्त्रोदयोग स्थापित करण्यात येणार आहे.त्यादवारे सुमारे ३६ हजार नवीन रोजगार अपेक्षित असतील.
  • ऊसतोड कामगारांसाठी अपघाती विमा योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील पुर रोखण्यासाठी २३०० कोटी इतकी तरतुद केली जाईल.
  • अशा अनेक महत्वाच्या घोषणा २०२४ मधील अंतरिम बजेट मध्ये करण्यात आल्या आहेत.
Back to top button