PM Shrestha : पीएम श्रेष्ठ योजनेविषयी माहीती
अनुसुचित जाती मधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या देशातील सरकार नेहमी नवनवीन उपक्रम योजना राबवित असते. आज आपण केंद्र सरकारने अनुसुचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव पीएम श्रेष्ठ PM Shrestha योजना असे आहे.
(Tadpatri) ताडपत्री अनुदान योजना २०२४ विषयी माहिती
अनुसुचित जाती ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम श्रेष्ठ ही योजना सुरू केली आहे.
पीएम श्रेष्ठ ह्या योजनेचा फुलफाॅम scheme for residential education for students high school in targeted area असा होतो.
पीएम श्रेष्ठ काय आहे ? What is PM Shrestha Scheme ?
ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे.पीएम श्रेष्ठ ही केंद्र सरकारची एक निवासी शिक्षण योजना आहे.
ह्या पीएम श्रेष्ठ योजनेत अनुसूचित जाती मधील एससी प्रवर्गातील गरीब तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण अणि संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
६ डिसेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने ह्या योजनेची सुरुवात केली होती.ही योजना भारत देशातील सर्व राज्यात लागु करण्यात आली आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ – Benefit given under PM Shrestha Yojana
ह्या योजनेअंतर्गत नववी तसेच बारावी इयत्तेपर्यत शिकत असलेल्या एससी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्याना मोफत निवासीय शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.
यामध्ये शाळेची फी,ट्यूशन फी आणि हॉस्टेल फीचा देखील समावेश असणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यांच्या हस्ते श्रेष्ठ नावाची योजना सुरू करण्यात येत आहे.
पीएम श्रेष्ठ ह्या योजनेअंतर्गत एससी प्रवर्गातील गुणवंत तसेच गरीब विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम खाजगी निवासी शाळेत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.