काय असते एकनिष्ठ्ता

महाराष्ट्राचे राजकारण एका दिवसात वर्तमानपत्र वाचून कळण्या ऐवढे सोपे नाही.त्यासाठी तुम्हाला काही दशकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.या राजकारणामध्ये धर्माला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पण होते पण त्याची तीव्रता तेवढी नव्हती.आज उघड पणे धर्माचा आधार घेउन राजकारण होताना आपण पाहत आहोत..काही पक्षासाठी धर्म ही दुय्यम बाजू होती आणि विकास महत्वाचा होता.सर्व धर्मातील लोकांचा विकास महत्वाचा होता.पण आज असे पक्ष तयार झाले आहेत ते उघड पणे धर्माला पूढे करूण राजकारण करत आहेत..काही पक्ष तर एकाच धर्माशी निगडित असल्यामुळे ते फक्त त्याच धर्माबदृदल भाष्य करताना दिसत आहेत.पूढे चालून असे आपल्याला बघायला भेटेल की प्रत्येक धर्माचा एक पक्ष असेल आणि त्या नुसार राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील , आपला धर्म वाचवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असेल.
१९ जून १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी ,मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली.पूढे चालून आय एम मॅड मॅड हिंदू असे ठाम पणे सांगत हिंदूचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली हे तर सर्वांना माहीतच आहे.
खेडया खेडया मध्ये त्यांनी शिवसेना पोहचवली.कट्टर शिवसैनिक ,कट्टर हिंदू त्यांनी तयार केले.एकनिष्ठ शिवसैनिक त्यांनी तयार केले.फक्त् बोलून चालणार नाही त्यासाठी निवडणूक लढवून सत्ता आपल्या हातात आल्यावर आपल्या लोकांवर अन्याय होणार नाही,आपल्या लोकांना न्याय देता येईल या हेतूंनी त्यांनी निवडवणूक लढवण्याचे ठरवले पण स्वत: कधी कोणती निवडणूक त्यांनी लढवली नाही.त्यांनी शिवसैनिकांना मोठे केले ..सामान्य माणसाच्या हातात सत्ता दिली..त्यांच्या बरोबर सर्वजण एकनिष्ठ राहिले..काही जण सोडले तर बाळासाहेबांबरोबर एकनिष्ठ राहिले..पक्षांचा विस्तार झाला ,आमदार,खासदारांची संख्या वाढली .पक्ष वाढत गेला.पक्षाची ताकद एवढी निर्माण झाली की महाराष्ट्राचे राजकारणात शिवसैनेला महत्व प्राप्त झाले ..राजकारण फक्त कॉग्रेस पक्षाच्या आवती भोवती फिरत होते..ते आता पूर्ण बदलेले आणि महाराष्ट्रात राजकीय वारे शिवसेने भोवती फिरू लागले.
आपला आजचा विषय आहे एकनिष्ठता काय असते याची थोडी चर्चा करायची आहे,काही जण पक्षाची एक निष्ठ राहतात काही जण एखाद्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहतात तर काही जण विचाराशी निष्ठ राहतात.काही जण देशाबरोबर एकनिष्ठ राहतात,काही जण जनतेशी एकनिष्ठ राहतात,काही जण आपल्या कुंटुबांबरोबर एकनिष्ठ राहतात ,तर काही जण एकनिष्ठ धर्माशी राहतात.एकनिष्ठता म्हणजे विशिष्ठ गोष्टीचा स्वीकार करून त्या नुसार वागणे,त्या मध्ये कसलाही बदल न करता त्या गोष्टीचे पालन करत राहणे,दुसऱ्या गोष्टीसाठी या गोष्टी सोडून जर कोण वागत असेल तर तो त्या गोष्टीसाठी एकनिष्ठ नसतो..किंवा त्याची वृत्ती एकनिष्ठ राहण्याची नसते.
शिवसेनेचे ४० आमदार एक वेगळी भूमिका घेतात आणि बंड करतात..या घटनेचा विचार केला असे जाणवेल की हे पक्षाशी एकनिष्ठ नव्हते,ते एका विशिष्ठ विचारांशी एकनिष्ठ होते.धर्माशी ,विकासाशी ते एकनिष्ठ होते असे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.पक्षाशी एक निष्ठ राहिले नाहीत हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल.कारण पक्षाशी जर एकनिष्ठ असते तर त्यांनी पक्षप्रमुखांच्या महत्व दिले असते.पक्षप्रमुख जरी चूकत असला तर त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनी आपली बाजू मांडली असती पण पक्षप्रमुख जर अगोदरचे विचारांना तिलांजली देत असेल तर जे पक्षाशी एकनिष्ठ नसलेले पण विचारामुळे एकनिष्ठ राहिलेले एक दिवस सोडून जाणार यात काय वाद नाही..
एक सांगली चा आमदार काल पर्यंत पक्ष माझ्यासाठी महत्वाचे आहे मी पक्षाला महत्व देतो..मी पक्षाची एकनिष्ठ आहे आणि अचानक एका रात्री तून तो दुसऱ्या गटात जातो..याला काय म्हणायचं .ही सरळ सरळ फसवणूक झाली .पक्षाबरोबरची एकनिष्ठता आणि विचांराशी एकनिष्ठता यामध्ये यांचा काहीही संबंध नाही ..हे एक वेगळया उद्देशासाठी एकनिष्ठ आहेत.. एक विशिष्ट उद्देश ठेवून त्या पक्षाशी हे लोक एकनिष्ठ आहेत..यांना ना विचाराशी घेणदेणं,ना पक्षाशी घेणदेणं..जिथे यांचा वेगळा उद्देश साध्य होईल त्या पक्षात हे जाणारे लोक..ना यांना विकास करायचा असतो ना यांना पक्ष वाढवायचा असतो,फक्त आणि फक्त आपल्या मनातील उद्देश साध्य करायचे असतात..
पक्ष बदलणे हे चूकीचे नाहीत पण त्याला एक विशिष्ठ विचारधारा असली पाहिजे,चार पैशासाठी जर एखादा व्यक्ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल तर हे लोकशाही साठी धोकयाची घंटा आपल्याला समजावी लागेल..आणि त्यात एखादा पक्षातील समुह जर पैशासाठी जर आपल्या पक्षाला जुन्या पक्षाला धोका देत असेल तर आपण लवकरच लोकशाही संपवण्याच्या दिशेन पाउल टाकले आहे असे समजावे.
पैशाने जर एकनिष्ठता जर खरेदी करता येत असेल तर आपल्याला मान्य करावे लागेल की आपण पैशाची एकनिष्ठ आहोत..
परत एकदा एकनिष्ठ म्हणजे काय हे समजून घ्या : एखादया व्यक्तीशी,एखादया विचारांशी ,एखादया समुहाशी ,एखादया पक्षाशी ची प्रामाणिक असणे,त्या व्यक्तीला ,त्या विचाराला ,त्या समुहाला कधीही धोका न देणे,आयुष्यभर त्या व्यक्तीला,त्या पक्षाला ,त्या समुहाला ,त्या विचाराला सोबत घेउन जगणे म्हणजे एकनिष्ठ .करा विचार तुम्ही आहात का एकनिष्ठ ..