सरकारी योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना विषयी माहिती

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना अकरा हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

याबाबत एक महत्वाचा शासन निर्णय देखील २०२३ मध्ये घेण्यात आला आहे.ही योजना सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

आजच्या लेखात आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांची वृदधालपकाळात परवड तसेच हेळसांड होऊ नये यासाठी आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.

वृदधालपकाळात पत्रकारांना आत्मनिर्भर बनवणे त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणने हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पत्रकारांना म्हतारपणात आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागु नये यासाठी विशेषतः ज्येष्ठ पत्रकारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची घोषणा २ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली होती.

दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना विषयी माहिती DDU GKY Scheme Information in Marathi

योजनेअंतर्गत लाभार्थींना दिला जाणारया लाभाचे स्वरूप –

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला अकरा हजार रुपये दिले जातात.

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थींच्या बॅक खात्यात डिबीटीच्या साहाय्याने जमा करण्यात येते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभार्थी कोण असतील?

ह्या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकार असणार आहेत.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना वृदधालपकाळात अकरा हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य दरमहा पेंशनच्या स्वरूपात दिले जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी जास्त धावपळ करण्याची तसेच सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची देखील आवश्यकता पडत नाही इतकी सहज अणि सुलभ प्रक्रिया ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची आहे.

ह्यामुळे अर्जदाराचा वेळ अणि पैसा दोघे वाचतात.

म्हातारपणात ज्येष्ठ नागरीक पत्रकारांना दैनंदिन जीवनात लागत असलेल्या पैशांसाठी ही योजना आत्मनिर्भर सक्षम बनवते.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना वृदधालपकाळात त्यांचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून ११ हजार रुपये दरमहा आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे नियम अटी कोणकोणत्या आहेत?

लाभार्थी ज्येष्ठ पत्रकार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

ह्या योजनेअंतर्गत ज्यांनी वृत्तपत्रात वृतपत्र संपादक तसेच इतर वृत प्रसार माध्यम मध्ये संपादक म्हणून ३० वर्षे काम केले आहे असे ६० वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ पत्रकार पात्र ठरतील.

कमीत कमी ३० वर्षे इतका कालावधी श्रमिक पत्रकार छायाचित्रकार म्हणून सेवा करून रिटायर्ड झालेले तसेच किमान ६० वर्षे पूर्ण झालेले पत्रकार ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

जे किमान ३० वर्षे सलगपणे स्वतंत्र व्यवसाय पत्रकार छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता किंवा छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता करून निवृत्त झाले आहेत असे ६० वर्ष पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसाय पत्रकार छायाचित्रकार ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

कमीत कमी १० वर्षे इतका कालावधी अधिस्वीकृती धारक तसेच वयाची ६० वर्षे पूर्ण झाली असलेला पत्रकार.

अधिस्वीकृती धारक नसलेल्या पत्रकारांच्या बाबतीत अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेले निकष पुर्ण करणारे पत्रकार यांचा योजनेसाठी विचार करायचा की नाही हे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार समितीकडे असणार आहे.

असे पत्रकार ज्यांना ईपीएफ व्यतीरीक्त इतर कोणत्याही सोर्समधुन निवृती वेतन तसेच निवृत्ती वेतन विषयक लाभ मिळालेला आहे किंवा मिळत नाहीये अशा पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागु होईल.

ज्येष्ठ पत्रकार ज्यांच्या उपजिविकेचे साधनच पत्रकारिता आहे इतर कोणत्याही व्यवसायात ते नव्हते असे ज्येष्ठ पत्रकार योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

ह्या योजनेचा लाभ घेणारा पत्रकार इन्कम टॅक्स भरत नसावा.

ज्या पत्रकाराला एखाद्या गंभीर गुन्ह्यात दोषी सिदध झाल्याने शिक्षा झाली आहे असा पत्रकार ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

ज्येष्ठ पत्रकार ज्या प्रसारमाध्यमात पत्रकारिता करून निवृत्त झाला आहे त्या प्रसारमाध्यमातील संबंधित वृतपत्र नियमित असावीत

पत्रकार ज्या प्रसारमाध्यमात पत्रकारिता करून निवृत्त झाला आहे ती वृतवाहीनी असेल तर अधिकृत व प्राधिकारीकडे ती नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम फक्त लाभार्थीं जिवंत असेपर्यंत दिली जाईल त्याच्या मृत्यूनंतर ह्या योजनेची रक्कम त्याच्या कुटुंबाला दिली जाणार नाही.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना ही अधिस्वीकृती धारक पत्रकाराच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून लागु करण्यात येईल.

योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय उपसंचालक वृत मुंबई यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज द्यायचा आहे.

यानंतर अर्जदाराचा अर्ज माहीती व जनसंपर्क महासंचालनालयातील महासंचालक माहीती व जनसंपर्क यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडुन तपासला जातो मग पात्र लाभार्थीची निवड केली जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

 • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज
 • वयाचा दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जन्म दाखला
 • आधार कार्ड
 • रेशनकार्ड
 • पॅनकार्ड झेरॉक्स
 • शैक्षणिक माहितीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
 • राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील
 • ज्या माध्यमात काम केले आहे तेथील अनुभवाचा पुरावा
 • माध्यमातून काम करत असताना प्राप्त झालेल्या मानधनाचा वेतनाचा पुरावा
 • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • प्रतिज्ञापत्र अर्जातील सर्व माहिती खरी आहे याबाबतचे

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button