जननी सुरक्षा योजना विषयी माहिती Janani Suraksha Yojana in Marathi
जननी सुरक्षा योजना Janani Suraksha Yojana ही सरकारने गरोदर मातांसाठी सुरू केलेली महत्वाची योजना आहे.
ही योजना सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी सुरू केली होती. हया योजनेवर शासनाकडुन दरवर्षी सोळाशे कोटी रुपये इतका खर्च केला जातो आहे. आज सुमारे एक कोटी गर्भवती महिला ह्याचा लाभ घेत आहेत.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारी किंवा कुठल्याही मान्यताप्राप्त खाजगी रूग्णालयात एखाद्या महिलेची प्रसुती झाल्यानंतर त्या महिलेला सामान्य प्रसुती करीता 600 रूपये अणि सिझरीयन प्रसुतीसाठी १५०० रूपये इतकी आर्थिक मदत दिली जाते.
आपल्या जिल्ह्यातील ज्या आशा कार्यकर्त्या आहेत त्या अर्जदार महिलांना मातृत्व केंद्रात नोंदणी करायला साहाय्य करीत असतात.
ह्या आशा कार्यकर्त्या आपणास Janani Suraksha Yojana जननी सुरक्षा योजना नावाचे कार्ड देखील प्राप्त करून देतात. कुठल्याही महिलेची गर्भधारणा ट्रॅक करण्यासाठी ह्या जननी सुरक्षा कार्डचा वापर केला जातो.
Business Loan from government : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज कसे मिळवायचे.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलांना मोफत औषधे दिली जातात, त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी देखील केली जाते. याचसोबत महिलांना फ्री मध्ये लसीकरण सुविधा देखील प्रदान केली जाते.
योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी प्रसुतीनंतर सात दिवसांच्या आत ह्या योजनेसाठी दावा करावा लागतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या ठेवण्यात आल्या आहेत?
ह्या योजनेचा लाभ एससी, एसटी कॅटॅगरी मधील तसेच दारिद्य्र रेषेखालील गर्भवती महिला घेऊ शकतात.
अर्जदार गर्भवती महिलेचे वय १९ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
फक्त दोन अपत्यांपर्यतच ही योजना मर्यादित ठेवण्यात आली आहे. म्हणजे फक्त दोन अपत्ये होईपर्यंत महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
- जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-
- लाभार्थीं महिलेकडे एसटी एससी तसेच बीपीएल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीं महिलेकडे रहिवासी दाखला देखील असणे आवश्यक आहे.
- जातीचे प्रमाणपत्र
- शाळेचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड झेरॉक्स
- बॅक खाते पासबुक झेराॅक्स
वरील सर्व कागदपत्रे जननी सुरक्षा कार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कुठे करायला हवी?
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण तसेच शहरी शासकीय रुग्णालयात आपण गरोदर माता असल्याची नोंदणी करावी लागते.यानंतर लगेच आपणास जननी सुरक्षा कार्ड दिले जाते.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना किती लाभ प्राप्त होतो?
समजा शासकीय आरोग्य संस्था किंवा एखाद्या मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत मातेची प्रसुती झाली तर ग्रामीण भागातील लाभार्थीं महिलांना सात दिवसांच्या ७०० रूपये इतका लाभ त्यांच्या बॅक खात्यात परस्पर जमा होत असलेल्या धनादेशाद्वारे दिला जातो.
अणि शहरी भागातील लाभार्थीं महिलांना ६०० रूपये दिले जातात.म्हणजे शहरी भागातील जननी सुरक्षा योजना लाभार्थीं पात्र महिलेची जर शासकीय आरोग्य संस्था/मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती झाली तर तिच्या प्रसुतीच्या नंतर सात दिवसांच्या आत ६०० रूपये इतका लाभ तिला तिच्या बॅक खात्यात परस्पर जमा होत असलेल्या धनादेशाद्वारे दिला जातो.
समजा ग्रामीण किंवा शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील महिलेची प्रसुती घरी झाली तर तिला ५०० रूपये दिले जातात.हा लाभ त्या महिलेला प्रसुतीच्या तारखेनंतर सात दिवसांच्या आत परस्पर जमा होत असलेल्या धनादेशाद्वारे दिला जातो.
जननी सुरक्षा योजना पात्र लाभार्थी महिलेची सिझेरीयन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल तर
तिची सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला बॅक खात्यामध्ये परस्पर जमा होत असलेल्या धनादेशाद्वारे
१५०० रूपये दिले जातात.हा सर्व लाभ गरोदर महिलांच्या खात्यावर जमा केला जातो.
योजना का सुरू करण्यात आली होती व मुख्य उद्दिष्ट काय आहे?
जननी सुरक्षा ही योजना गरोदर माता अणि नवजात बालकांच्या मृत्युदरात घट घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
दारिद्य रेषेखालील कुटुंबांना संस्थात्मक बाळंतपणासाठी प्रोत्साहित करणे हा देखील ह्या योजनेचा मुख्य हेतु आहे.
जननी सुरक्षा योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?
जननी सुरक्षा ही योजना गर्भधारणेदरम्यान आरोग्य तपासणी आणि प्रसूतीनंतर काळजी आणि देखरेख करण्यास मदत करते.
Janani Suraksha Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भावस्थेत मातेला अंगणवाडी केंद्रात रेजिस्ट्रेशन करावे लागते.
बाळाच्या जन्माच्या वेळी ज्यांनी सरकारी दवाखान्यात रेजिस्ट्रेशन केले आहे ते ह्या योजनेसाठी पात्र आहेत.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेला अंगणवाडी केंद्रात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सर्वप्रथम अर्ज करावा लागतो.
योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक लाभार्थींकडे एमसीएच कार्ड तसेच जननी सुरक्षा कार्ड असणे देखील आवश्यक आहे.
ह्या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दिली जाणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटी दवारे ट्रान्स्फर केली जाते.
योजनेअंतर्गत आशा कार्यकर्त्यास मिळणारे महत्वाचे लाभ कोणकोणते आहेत?
जर आशा कार्यकर्त्याने ग्रामीण भागातील पात्र जेएसवाय लाभार्थीं महिलेला तिची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानांकित आरोग्य संस्थेत करण्यास प्रवृत्त केले तर एकुण सहाशे रुपये प्रती लाभार्थी आशा कार्यकर्त्यास मानधन स्वरूपात दिले जातात.
यातील तीनशे रूपये हे प्रसुती आधी द्यायच्या सेवा दिल्याची खात्री केल्यावर दिल्या जातात.
तर बाकीचे तीनशे आरोग्य संस्था मध्ये प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे सिद्ध झाल्यावर दिले जात असतात.
Thoughts of Swami Vivekananda… स्वामी विवेकानंदांचे विचार
जर आशा कार्यकर्त्याने शहरी भागातील पात्र जेएसवाय लाभार्थीं महिलेला तिची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानांकित आरोग्य संस्था मध्ये करण्यास प्रवृत्त केले तर एकुण ४०० रूपये प्रति लाभार्थी आशा कार्यकर्त्यास मानधन दिले जाते.
यातील दोनशे रुपये प्रसुती आधी द्यायच्या सेवा दिल्याची खात्री झाल्यावर दिले जातात आणि बाकीचे दोनशे रुपये आरोग्य संस्था मध्ये प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यावर दिले जातात.