सरकारी योजना

वृदध कलाकार मानधन योजनेविषयी माहिती

राज्यातील कलाकारांकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असतात. कलाकार मानधन ही राज्यातील कलाकारांसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी अशीच एक अत्यंत महत्वाची योजना आहे.

आजच्या लेखात आपण वृदध कलाकार मानधन ह्या योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

वृदध कलाकार मानधन योजना काय आहे?

वृदध कलाकार मानधन ही योजना राज्यातील मान्यवर वृदध साहित्यिक कलावंतांसाठी १९५४/१९५५ पासुन ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात शंभर पर्यंतचा लक्षांक ठेवून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडुन अर्ज मागविण्यात येतात.

ह्या योजनेअंतर्गत राज्यातील वृद्ध कलावंतांना साहित्यिकांना मानधन दिले जाते.

सर्व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मध्ये लॅपटॉप दिला जाणार आहे. Laptop Yojana 2024 

वृदध कलाकार मानधन योजनेअंतर्गत कोणाला मानधन दिले जाते?

राज्यातील विविध क्षेत्रात आपली कला सादर केलेल्या तसेच पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी आपली कला सादर केलेले कलावंत

जसे की भजनी मंडळी, किर्तनकार,आराधी,गोंधळी, तमाशा,साहित्यिक,गायक, वादक,कवी,लेखक अशा वेगवेगळ्या विविध कलाक्षेत्रात दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी आपले योगदान दिलेल्या अशा कलाकारांना ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे.

अशा वृदध कलाकारांना वृदध कलाकार मानधन योजनेअंतर्गत मानधन दिले जात असते.

ज्या साहित्यिक कलावंतांनी साहित्य तसेच कलेसाठी त्यांचे संपुर्ण आयुष्य वेचले आहे.अणि हयावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता अशा वृदध साहित्यिक कलाकार यांना ह्या योजनेअंतर्गत मानधन दिले जाते.

वृदध कलाकार योजनेअंतर्गत कोणत्या कलाकारांना किती मानधन दिले जाते?

वृद्ध कलाकार मानधन ह्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कलावंतांना २२०५० रूपये तसेच राज्यस्तरीय पातळीवर काम करत असलेल्या कलाकारांना २७०० रूपये इतके मासिक मानधन दिले जाते.

तसेच राष्ट्रीय पातळीवरील काम करत असलेल्या कलाकारांना ३१,०५० रूपये इतके मासिक मानधन दिले जाते.

वृदध कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेले निकष तसेच पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

वृदध कलाकार योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी आणि निकष पुढीलप्रमाणे आहेत-

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असलेला अर्जदार व्यक्ती साहित्यिक व कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करणारा असावा.
 • कलाक्षेत्रात काम करण्याचा १५ ते २० वर्ष इतक्या प्रदीर्घ काळाचा त्या कलावंताला साहित्यिकाला अनुभव असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार कलाकाराचे वय पन्नास वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्ती जर अधार्गवायु, क्षयरोग कुष्ठरोग इत्यादी रोगांनी ग्रस्त असेल किंवा तो ४० टक्के पेक्षा अधिक दिव्यांग असेल तसेच अपघातामुळे त्याला ४० टक्के अपंगत्व आले आहे त्यामुळे त्याला स्वताचा व्यवसाय करता येत नाही अशा गरजु साहित्यिक कलावंतांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.तसेच वय न बघता देखील अशा लाभार्थींला मानधन दिले जाते.
 • विधवा महिला परीतक्त्या वृदध साहित्यिक यांना देखील त्या कलावंत असल्यास मानधन दिले जाते.
 • विधवा तसेच वृद्ध महिला यांना इथे योजनेचा प्राधान्याने विशेष लाभ दिला जातो.
 • वृदध कलाकार साहित्यिक यांचे सर्व मार्गाने मिळुन प्राप्त होणारे ग्रामीण भागातील कलावंत साहित्यिक यांचे वार्षिक उत्पन्न हे ४८ हजारपेक्षा अधिक नसावे.
 • अर्जदार किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • स्त्री पुरुष वृदध साहित्यिक कलाकार यांचे वय पन्नास वर्षेपेक्षा जास्त असावे.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी कला तसेच साहित्य क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्याचा पुरावा देखील द्यावा लागेल
 • प्रत्येक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापुर्वी संबंधित मान्यवर कलावंत साहित्यिक हयात असल्याचा दाखला त्यांच्याकडुन उपलब्ध करून घेतला जाईल.
 • जी व्यक्ती शासनाच्या अन्य कुठल्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ प्राप्त करत आहे अशी व्यक्ती ह्या मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाही.

कुठल्या कलाक्षेत्रातील कलावंतांना साहित्यिकांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो?

सर्व कलाक्षेत्रातील कलावंतांना साहित्यिकांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो.कारण कलाक्षेत्र हे एक अत्यंत व्यापक क्षेत्र आहे.

वृदध कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

वृदध कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी वृदध कलाकार साहित्यिक यांना विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.

सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान जेव्हा आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्फत एक जाहीरात काढली जाईल.तेव्हा तिथे त्या पत्यावर आपणास विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो.

वृदध कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

 • आधार कार्डशी लिंक बॅक खाते क्रमांक
 • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा दाखला
 • जन्मतारखेचा दाखला
 • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला
 • अर्जदार कर्करोग कुष्ठरोग इत्यादी रोगांनी ग्रस्त असेल किंवा त्याला अपघाताने अपंगत्व आले असेल तर रोगाबाबद अपंगत्वाबाबद जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणने
 • साहित्य कलाक्षेत्रातील कार्याचा पुरावा
 • केंद्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र
 • साहित्य तसेच कलाविषयक कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे
 • जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या वाडमय विषयक अथवा कला विषय नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थेचे शिफारसपत्र जोडणे
 • अर्जदार इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button