राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना विषयी माहिती 2024 Rastriya Kutumb Arthsahayya Yojana
शासनाच्या वतीने देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. परंतु देशातील नागरिकांना ह्या योजनांची माहिती नसल्याने त्यांना ह्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसतो. आज आपण शासनाने देशातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अशाच एका कल्याणकारी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत जिचे नाव राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना असे आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना काय आहे?
ही एक शासकीय केंद्र पुरस्कृत योजना आहे जिच्याअंतर्गत आपल्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपये पर्यंतचे अर्थसाहाय्य प्रदान केले जाते.
ह्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप –
जे कुटुंब दारिद्य्र रेषेखालील आहे अणि त्या कुटुंबातील १८ ते ५९ ह्या वयोगटातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला आहे अशा व्यक्तींच्या परिवाराला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत २० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थीं कुटुंबाला एकरकमी २० हजार इतकी रक्कम अर्थसाहाय्य म्हणून दिली जाते. ह्या योजनेसाठी केंद्र सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो.ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असते.
योजना सर्व प्रवर्गासाठी लागु करण्यात आली आहे.
लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा ?
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतु कार्यालयात जाऊन आॅनलाईन अर्ज करावा लागतो. यानंतर अर्जदार व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसिलदार संजय गांधी कार्यालयात तलाठी कार्यालयात जाऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी हा विहीत नमुन्यातील अर्ज फाईल सोबत जमा करावा लागतो.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
- आपल्या कुटुंबातील मृत झालेला व्यक्ती हा आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील मृत झालेल्या प्रमुख व्यक्तीचे वय हे १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
- मृत झालेल्या प्रमुख व्यक्तीचे नाव हे दारिद्य्र रेषेखालील यादीत असणे देखील गरजेचे आहे.
- राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजारपेक्षा कमी असावे यापेक्षा अधिक असु नये.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कमावता प्रमुख व्यक्ती मृत झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबाला दिला जातो?
योजनेचा लाभ अशा कुटुंबाना दिला जातो ज्या कुटुंबातील कमावता प्रमुख व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिक मृत्यू पावला असेल. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातात तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत असते.
लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पुढील महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
● विहित नमुन्यातील अर्ज
● परिवाराचा दारिद्य्र रेषेखालील असल्याचा दाखला
● तलाठीकडुन देण्यात आलेला अहवाल
● कुटुंबाचे रेशनकार्ड
● तलाठ्याने दिलेले वारसाचे प्रमाणपत्र
● हजार रुपयेच्या करार नाम्यावर तहसिलदार यांचे अॅफिडेव्हीट
● कुटुंबातील मृत्यू झालेल्या कमावता प्रमुख व्यक्तीचे आधार कार्ड तसेच मृत्यू प्रमाणपत्र
● पासपोर्ट साईज दोन फोटो
● आधार कार्ड
● गावातील पोलिस पाटील सरपंच किंवा नगरसेवक यांच्याकडुन भेटलेले ओळखपत्र
● योजनेसाठी पात्र असल्याचा तहसिलदाराकडून दिलेला दाखला
● अर्जदाराचे राष्ट्रीय बॅक खाते पासबुक
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे फायदे –
ज्या कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा अपघातात किंवा नैसर्गिक रीत्या मृत्यू झाला आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना शासनाकडून ह्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.