सरकारी योजना

स्टॅण्ड अप इंडिया कर्ज योजनेविषयी माहिती Stand up India loan scheme information in Marathi

ज्या व्यक्तींना स्वताचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा व्यक्तींसाठी स्टॅण्ड अप इंडिया कर्ज योजनेविषयी माहिती Stand up India loan scheme ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण ह्या योजनेअंतर्गत नवोदित उद्योजकांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखापासुन एक करोड रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

स्टॅन्ड अप इंडिया ही भारत सरकादवारे सुरू करण्यात आलेली योजना आहे ह्या योजनेअंतर्गत अर्ज करून भारत देशातील कुठल्याही राज्यातील व्यक्ती कर्ज प्राप्त करू शकते. स्टॅन्ड अप इंडिया ह्या योजनेचा एप्रिल २०२६ मध्ये सुरू करण्यात आली होती.हया योजनेमध्ये नवोदित उद्योजकांना सहजपणे कर्ज उपलब्ध होते. ज्यांना स्वताचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नाही अशा व्यक्तींना ह्या योजनेअंतर्गत स्टार्ट अप बिझनेस करीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महाराष्ट्र रोजगार संगम योजना २०२४ विषयी माहिती

स्टॅन्ड अप इंडिया ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत-

  • स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी आपण एससी किंवा एसटी कॅटॅगरी मधील असणे आवश्यक आहे.
  • किंवा आपण महिला उद्योजक असणे आवश्यक आहे.
  • ह्या योजनेअंतर्गत कंपनी दवारा कर्ज प्राप्त करण्यासाठी कंपनीचे ५१ टक्के शेअर होल्डर हे एससी किंवा एसटी कॅटॅगरी मधील असणे आवश्यक आहे.
  • किंवा ते महिला उद्योजक असायला हवेत
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असलेल्या अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्याचे वय १८ ते ५८ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा डिफॉल्टर नसावा म्हणजे ज्यांनी एखाद्या बॅकेकडुन कर्ज घेतले आहे अणि ते डिफॉल्टर केले आहे असे व्यक्ती ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • अर्जदाराकडे सर्व केवायसी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Stand up India loan योजनेअंतर्गत आपणास किती कर्ज प्राप्त होईल?

ह्या कर्ज योजनेअंतर्गत आपणास १० लाखापासुन एक करोड पर्यंतचे कर्ज प्राप्त होईल. जेवढा आपला व्यवसाय प्रकल्प असेल त्याच्या ८५ टक्के इतकी रक्कम आपल्याला ह्या कर्ज योजनेअंतर्गत दिली जाते. म्हणजे समजा आपला व्यवसाय प्रकल्प दहा लाखांपर्यंतचा असेल तर आपल्याला ह्या योजनेअंतर्गत ८.५ लाख रूपये इतके कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

स्टँड अप योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याजदर किती आकारले जाते?

बॅकेला जितक्या टक्केवर आरबीआयकडुन कर्ज प्राप्त होत असते.तितक्या म्हणजे बॅकेच्या एमसी एल आर रेटच्या ३ ते ४ टक्के अधिक व्याजावर इथे आपणास कर्ज प्राप्त होत असते. म्हणजे समजा बॅकेला आरबीआयकडुन तीन टक्के प्रमाणे कर्ज प्राप्त होत आहे तर आपल्याला बॅकेकडुन ९ ते १० टक्के दराने व्याजाची आकारणी केली जाईल.

ह्या योजनेअंतर्गत किती कालावधी करीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते?

स्टँड अप योजनेअंतर्गत दिल्या जाणारया कर्जाचा कालावधी हा सात वर्षे इतका असतो. म्हणजे सात वर्षांत आपल्याला हे बॅकेने दिलेले कर्ज फेडावे लागत असते.

योजनेमध्ये आपल्याला १८ महिन्यांचा मोरोटोरिअम पिरीअड देखील दिला जातो.म्हणजे अठरा महिन्यापर्यंत आपल्याला कुठलाही ईएम आय वगैरे यात द्यावा लागत नाही.फक्त जेवढे आपण कर्ज घेतले आहे त्याचे व्याज आपणास द्यावे लागते. अठरा महिन्यानंतर आपला व्यवसाय व्यवस्थित उभा झाल्यावर ईएम आयला सुरूवात होते.

स्टँड अप लोन योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी कोलेटरलची आवश्यकता असते का?

ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी आपणास बॅकेने सिक्युरिटीची मागणी केल्यास सिक्युरिटी देण्याची आवश्यकता असते.

स्टँड अप योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते?

ह्या योजनेअंतर्गत पुढील काही व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते

  • एखाद्या वस्तुचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कर्ज प्राप्त होते.
  • सर्विस क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करण्यासाठी देखील आपणास कर्ज प्राप्त होते.
  • शेतीशी संबंधित मासेपालन पशुपालन इत्यादी व्यवसाय करण्यासाठी देखील आपणास कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

स्टँड अप योजनेअंतर्गत कोणाला कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येईल?

जे व्यक्ती योजनेसाठी पात्र उमेदवार आहेत अणि त्यांना स्वताचा स्टार्टअप उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे

अशा सर्व व्यक्तींना ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

स्टँड अप योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करायचा?

ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी आपणास स्टॅन्ड अप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर standupmitra.in वर जायचे आहे.

स्टँड अप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर आपणास apply loan ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपले नाव, ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकायचा आहे.अणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.

तो ओटीपी प्रविष्ट करून घ्यायचा आहे अणि verify otp वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्या जवळील कमर्शियल बॅकेकडुन आपणास संदेश किंवा फोन येईल.

आपले व्यवसायाचे कागदपत्रे तपासली जातात.आपल्या व्यवसायाची बॅकेकडुन संपुर्ण माहिती प्राप्त केली जाते.

आपला सिबिल स्कोअर देखील तपासला जातो अणि मग आपले कर्ज मंजूर केले जाते.

Stand up India loan योजनेचे उद्दिष्ट –

अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना प्रगत करणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Stand up India loan योजनेचे इतर फायदे –

योजनेअंतर्गत स्टार्ट अप उद्योग व्यवसायांना तीन वर्षांपर्यंत इन्कम टॅक्स मध्ये सवलत दिली जाते.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button