सुकन्या समृद्धी योजना विषयी माहिती Sukanya Samruddhi Scheme Information in Marathi
सुकन्या समृद्धी योजना ही शासनाने सुरू केलेली एक स्माॅल डिपाॅझिट स्कीम आहे.सुकन्या समृद्धी ही योजना सरकारने मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीमेअंतर्गत सुरू केली होती.
ही केंद्र सरकारने मुलींचे भवितव्य उज्ज्वलतेकडे नेण्यासाठी सुरू केलेली महत्वाची बचत गुंतवणूक योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे –
या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी पैसे जमा करता येतात.जोपर्यत मुलगी २१ वर्षांची होत नाही तोपर्यंत पालकांना परतावा म्हणून मोठी रक्कम प्राप्त होते.
ज्या पालकांनी त्यांची मुलगी लहान असताना यात गुंतवणुक करावयास सुरुवात केली त्यांना यात पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणुक करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये केलेल्या गुंतवणूकीस आयकरात देखील सवलत देण्यात आली आहे.
व्याज काढल्यावर तसेच अंतिम रक्कम हातात येते तेव्हा देखील आपणास कुठल्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.
या योजनेअंतर्गत मुलगी अठरा वर्षाची पुर्ण झाल्यावर ह्या योजनेच्या खात्यातील उपलब्ध शिल्लकेतील पन्नास टक्के इतकी रक्कम आपणास मुलीच्या शिक्षणासाठी काढता येईल.
आणि उर्वरित रक्कम आपणास मुलगी २१ वर्षांची झाल्यावर किंवा तिच्या लग्नाच्या वेळी १८ ते २१ वर्षादरम्यान कधीही काढता येते.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यामुळे पालकांना आपल्या मुलीच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी निधी गोळा करता येतो.
प्रधानमंत्री वय वंदना योजना विषयी माहिती
सुकन्या समृद्धी योजना गुंतवणुक मर्यादा –
ह्या योजनेमध्ये आपण किमान २५० रूपयांपासुन तर कमाल १२५०० रूपयांपर्यत गुंतवणुक करायला सुरुवात करू शकतो.यात आपणास वर्षाला जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत गुंतवणुक करता येते.
योजनेमध्ये दिले जाणारे व्याजदर –
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपणास ७.६ टक्केपासुन ८.५ टक्के इतके व्याजदर प्राप्त होते.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
ह्या योजनेचा लाभ फक्त मुलींना दिला जाणार आहे.
योजनेसाठी खाते कोणाला उघडता येईल?
या योजनेसाठी फक्त मुलगी खाते उघडु शकते पण मुलगी लहान असल्यास मुलीच्या नावाने तिचे पालक आईवडील देखील खाते उघडु शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेत कधीपर्यंत गुंतवणुक करता येते?
ह्या योजनेमध्ये मुलीचे वय २१ होईपर्यंत ह्या योजनेत गुंतवणूक करता येते.
ह्या सुकन्या समृद्धी योजना गुंतवणुक कालावधी –
योजनेचा गुंतवणुक कालावधी १५ वर्षे इतका आहे.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपणास किमान २५० रूपये अणि दीड लाख इतकी रक्कम दरमहा जमा करता येते.यात आपण महिन्यातुन एकवेळा किंवा वर्षातुन पाहीजे तेव्हा रक्कम जमा करू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे उघडायचे?
योजनचे खाते आपणास शहरातील गावातील पोस्ट आॅफिस मध्ये तसेच सार्वजनिक तसेच खाजगी बॅकेत देखील उघडता येते.पण मुलीच्या १० व्या वर्षापर्यंत फक्त दोन मुलींसाठीच ह्या योजनेत खाते उघडता येते.
ह्या योजनेची सुरुवात कशी झाली?
२२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या मोहीमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
योजनेमध्ये मुलीचे कायदेशीर पालकांना मुलीच्या नावाने खाते उघडता येईल.
ह्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एका मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी किमान २५० रूपये भरावे लागतील.
या योजनेचे खाते सुरू करत असताना मुलीचे दहा वर्षांपेक्षा अधिक असु नये.
योजनेत खाते उघडताना मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे नाहीतर आपणास योजनेसाठी खाते उघडता येणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे पुढील महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे –
- मुलीचा जन्म दाखला
- आधार कार्ड असल्यास मुलीचे आधार कार्ड
- मुलीच्या पालकांचे आई वडिलांचे आधार कार्ड
- पॅन कार्ड असल्यास मुलीचे पॅन कार्ड
- तीन पासपोर्ट साईज फोटो(मुलीचे तिच्या आई वडिलांचे)
- नवीन खाते उघडायचा अर्ज
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किती पैशांची गुंतवणूक केल्यावर किती पैसे मिळतात?
ह्या योजनेमध्ये आपण दरमहा २५० रूपये जमा केले तर वर्षाचे ३ हजार होतात.पंधरा वर्षे होईपर्यंत आपल्याला दरवर्षी ३ हजार जमा करावे लागतात.
यात आपली एकुण गुंतवणुक ४५ हजार इतकी असणार आहे.यावर मिळणारे एकुण व्याज ८२ हजार ३०३ इतके असणार आहे.अणि मॅच्युरिटी झाल्यावर आपल्याला १.२७,३०३ रूपये प्राप्त होत असतात.
३०० रूपये दरमहा जमा केल्यावर वर्षाचे ३६०० रूपये होतात.पंधरा वर्षांपर्यंत आपणास हे ३६०० रूपये जमा करावे लागतात.एकुण गुंतवणुक केलेली रक्कम ५४ हजार असणार आहे.यात मिळणारे एकुण व्याज ९८ हजार ७६४ रूपये इतके असणार आहे.मॅच्युरिटी झाल्यावर आपल्याला १ लाख ५२ हजार ७६४ रूपये मिळतात.
५०० रूपये दरमहा जमा केल्यावर वर्षाचे ६ हजार जमा होतात.पंधरा वर्षे होईपर्यंत आपल्याला हे सहा हजार दरवर्षी जमा करावे लागतात.
आपली एकुण गुंतवणुक रक्कम ९० हजार असणार आहे.यात मिळणारे एकुण व्याज १ लाख ६४ हजार ६०६ रूपये आहे.मॅच्युरीटी झाल्यावर आपल्याला २ लाख ५४ हजार ६०६ रूपये मिळतात.
१००० रूपये दरमहा जमा केल्यावर वर्षाचे १२ हजार होतात.पंधरा वर्षे होईपर्यंत आपल्याला हे बारा हजार दरवर्षी जमा करावे लागतात.
एकुण गुंतवणुकीची रक्कम १ लाख ८० हजार इतकी आहे.यावर मिळणारे एकुण व्याज ३ लाख २९ हजार २१२ रूपये इतके असणार आहे.
मॅच्युरिटी झाल्यावर आपल्याला ५ लाख ०९,२१२ रूपये मिळतात.
२००० दरमहिन्याला जमा केल्यावर वर्षाचे २४ हजार होतात म्हणजे १५ वर्षे होईपर्यंत आपल्याला २४ हजार दरमहिन्याला जमा करावे लागतात.
एकुण गुंतवणुकीची रक्कम आपली ३ लाख ६० हजार इतकी आहे.यावर मिळणारे व्याज ६ लाख ५८ ४२५ इतके आहे.
मॅच्युरिटी झाल्यावर आपल्याला १० लाख १८ हजार ४२५ रूपये मिळतात.
दरमहा पाच हजार रुपये जमा केल्यावर वर्षाचे ६० हजार होतात.पंधरा वर्ष होईपर्यंत आपल्याला यात दरवर्षी साठ हजार भरावे लागतील.
एकुण गुंतवणुकीची रक्कम ९ लाख इतकी आहे.यावर मिळणारे व्याज दर १६ लाख ४६ हजार ६२ रूपये इतके असणार आहे. मॅच्युरीटी झाल्यावर आपल्याला २५ लाख ४६ हजार ६२ रूपये मिळतात.