Upcoming Electric Cars: मारूतीच्या एका निर्णयानं उडवली टाटा-महिंद्राची झोप

Maruti Suzuki Upcoming Electric Cars: मारुती सुझुकीनं SUV नंतर इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. याचे संकेत नुकत्याच संपलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये दिसून आले. एक्सपोदरम्यान कंपनीनं आपली पहिली EV संकल्पना

गाडी घ्येण्यासाठी ही बँक देत आहे वैयक्तिक कर्ज

HDFC बँक देत आहे वैयक्तिक कर्ज 5 लाख रुपये फक्त 5 स्टेप मध्ये, येथे करा अर्ज.

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. देशात विकली जाणारी जवळपास प्रत्येक दुसरी कार मारुतीची आहे. एकूण प्रवासी वाहन उद्योगात कंपनीचा 50 टक्के वाटा आहे. आता मारुतीनं एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी लवकरच देशात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. दुसरीकडे, टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी भारतीय कंपनी आहे. महिंद्रानं अलीकडेच आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. अशा परिस्थितीत मारुतीचा हा निर्णय टाटा आणि महिंद्रासाठी मोठे आव्हान म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, ज्यांनी परवडणारी इलेक्ट्रिक कार घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय खूप चांगला ठरू शकतो, कारण मारुती तिच्या परवडणाऱ्या कारसाठी ओळखली जाते.

मारुतीकडे सध्या 10 पेक्षा जास्त मॉडेल्स आहेत,

एक्स-शोरूम किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध असतील-

मारुतीने अलीकडेच आपली रणनीती उघड केली आणि सांगितलं की कंपनी भारतात आर्थिक वर्ष 2024 मध्ये ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केलेली SUV बॅटरी EV लाँच करेल. यानंतर 2030 पर्यंत आणखी 6 इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच केल्या जातील. कंपनी इलेक्ट्रिक तसेच हायब्रीड कार लाँच करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. पुढील काही वर्षांमध्ये कंपनीकडे सुमारे 25 टक्के हायब्रिड इलेक्ट्रिक मॉडेल्स असतील, तर लाइनअपमधील एकूण इलेक्ट्रिक मॉडेल्सची संख्या 15 टक्क्यांहून अधिक असेल.

Back to top button