सरकारी योजना

महिला सन्मान योजना २०२४ विषयी माहिती Mahila Sanman Scheme 2024 Information in Marathi

आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी सर्वांगिण विकासासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली अशीच एक अत्यंत महत्वाची योजना आहे.ही योजना २०२३/२०२४मधील अर्थसंकल्पात महिलांच्या हितासाठी सुरू करण्यात आली होती.

महिला सन्मान योजना काय आहे?

ही महाराष्ट्र सरकारने येथील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

महिला सन्मान ह्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटी बसच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासात ५० टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे.

म्हणजे आता महाराष्ट्र राज्यातील महिलांना बसने प्रवास करण्यासाठी फक्त अर्धे तिकिटाचे पैसे भरावे लागणार आहे बाकी अर्ध्या तिकिटाच्या पैसे भरण्याची आवश्यकता त्यांना नसेल.

महाराष्ट्र सरकारच्या ह्या कल्याणकारी योजनेमुळे महिलांना आता राज्यातील कुठल्याही ठिकाणी फक्त ५० टक्के भाडे भरून प्रवास करता येणार आहे.

ह्या योजनेची १७ मार्च २०२३ पासून करण्यात आली होती.ही योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना विषयी माहिती

महिला सन्मान योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसच्या प्रवासामध्ये ५० टक्के इतकी सवलत दिली जात आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

महिला सन्मान ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला घेऊ शकतात.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महिला सन्मान ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणत त्यांना आत्मनिर्भर सक्षम बनवणे हा आहे.

याचसोबत महाराष्ट्र राज्यातील महिलांना समाजात मानाचे आदराचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महिला सन्मान योजना सुरू केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये प्रवास करण्यासाठी महिलांना तिकिट दरात ५० टक्के पर्यंत सवलत दिली जाते.

महाराष्ट्र सरकारच्या ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सामाजिक आर्थिक विकास घडुन येईल, त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागणार नाही किंवा अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाही कारण

ही योजना महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही एका विशिष्ट प्रवर्गातील महिलांसाठी नसुन सर्व प्रवर्गातील महिलांना लागु होणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

महिला सन्मान ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिलांना कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागणार नाही

कारण ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना मिळणार आहे.

योजनेअंतर्गत कोणकोणत्या एसटी बसच्या प्रवासात महिलांना सवलत दिली जात आहे?

साध्या बसेस,मिनी बस,निम आराम, शिवशाही,विनावातानुकुलित शयन आसनी,शिवाई,शिवसेनेरी,अश्वमेध इत्यादी

सर्व प्रकारच्या एसटी बसेसच्या प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिली जात आहे.

एवढेच नव्हे तर भविष्यात नवीन एसटी बस उपलब्ध झाल्यावर त्यात देखील ५० टक्के इतकी सवलत महिलांना दिली जाणार आहे.

महिला सन्मान योजनेच्या अटी नियम कोणकोणते आहेत?

महाराष्ट्र राज्यातील महिलांना ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत एसटी बसच्या प्रवासासाठी अनुज्ञेय असणार आहे.

ही सवलत शहरी वाहतुकीसाठी अनुज्ञेय नसेल.

अशा महिला ज्यांनी एसटी बस प्रवासासाठी तिकिटचे अॅडव्हान्सड मध्ये बुकिंग केले आहे अशा महिलांना ५० टक्के सवलतीचा परतावा दिला जाणार नाही.

महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी बसच्या भाड्यात ५० टक्के सवलत असली तरी देखील ज्या महिला कंप्युटरदवारे, आॅनलाईन अॅपदवारे अशा महिला प्रवासींकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल केला जाईल.

७५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या ‌परिपत्रकीय सुचनेनुसार १०० टक्के सवलत अनुज्ञेय असणार आहे.

योजनेअंतर्गत ७५ वर्षाच्या वरील महिलांकडे आधार कार्ड अणि ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रवास करत असताना असणे आवश्यक आहे.

अणि ६५ ते ७५ ह्या वयोगटातील महिला प्रवासींना महिला सन्मान योजना हीच सवलत अनुज्ञेय असणार आहे.

५ ते १२ ह्या वयोगटातील लहान मुलींना आधीप्रमाणेच ५० टक्के सवलत एसटी बसच्या प्रवासात दिली जाईल.

महिला सन्मान योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ५० टक्के इतक्या सवलतीच्या तिकिट दरात प्रवास करता येणार आहे.

महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button