शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहिती
आपल्या भारत देशात नेहमी स्वच्छता असायला हवी यासाठी आपल्या देशाचे सरकार नेहमी वेगवेगळ्या स्वच्छता योजना राबवित असते. स्वच्छ भारत मिशन ही केंद्र सरकारची अशीच एक महत्वाची योजना आहे.हया योजनेअंतर्गत देशात वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ही त्यापैकीच एक महत्वपूर्ण योजना आहे.ही योजना सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने राबविण्यात येत असते.
आजच्या लेखात आपण शौचालय अनुदान योजने विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र काय आहे?
ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जे गरीब कुटुंब त्यांची
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधण्यास असमर्थ आहेत अशा गरीब कुटुंबांना स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून ह्या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.
घरातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांना स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधता येत नसते.
अशा गरीब कुटुंबातील स्त्रिया पुरूषांना उघड्यावर शौचाला बसावे लागते.याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने रोगराई होण्याची शक्यता असते.याचकरीता स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून महाराष्ट्र सरकारने शौचालय अनुदान योजना सुरू केली आहे.
मोफत शिलाई मशीन योजना २०२४ विषयी माहिती
शौचालय अनुदान योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत म्हणून हे अनुदान दिले जाणार आहे.
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची लाभाची रक्कम डीबीटीच्या साहाय्याने लाभार्थींच्या बॅक खात्यात थेट जमा केली जाते.
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील स्वताचे शौचालय बांधण्यास असमर्थ असणारेच गरीब कुटुंब असतील.
ह्या योजनेचा लाभ अनुसुचित जाती अनुसुचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब,लहान अल्पभूधारक शेतकरी, ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहेत असे कुटुंब, कुटुंबामधील प्रमुख स्त्रिया यांना शौचालय अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या असक्षम दुर्बल असलेल्या गरीब कुटुंबाला स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते.
पण ह्या अनुदानाची रक्कम लाभार्थींना एकाच वेळी न देता दोन टप्प्यांत दिली जाते.
ही योजना केंद्र अणि राज्य सरकार दोघांच्या माध्यमातून राबविण्यात येत असते.यात केंद्र सरकारकडून ७५ टक्के इतकी रक्कम ९ हजार रुपये अनुदानासाठी दिले जातात तर बाकी २५ टक्के रक्कम म्हणजे तीन हजार राज्य सरकार कडुन दिले जात असतात.
शौचालय अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
देशात उघड्यावर शौचाला बसणे थांबावे तसेच उघड्यावर शौचाला बसण्यास प्रतिबंध करत स्वच्छता निर्माण करावी, ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात राहणीमानात सुधारणा घडवून आणावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या गरीब कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त करून देणे.
ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे,गावात याविषयी जनजागृती करणे.
योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील असावी.
दारिद्य्र रेषेखालील अनुसूचित जाती जमाती मधील कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
याअगोदर ज्या कुटुबांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या कुटुंबाने आधीपासून घरात शौचालय बांधले आहे ते ह्या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही.
शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बीपीएल रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बॅक खाते तपशील
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- मोबाईल नंबर अणि ईमेल आयडी
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम sbm.gov.in ह्या वेबसाइटवर जावे लागेल.
ह्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला रेजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.यानंतर आपला आयडी पासवर्ड टाकुन साईन अप करून घ्यायचे आहे.
यानंतर नवीन अर्ज ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर योजनेचा अर्ज येईल त्यात आपल्याला आपली सर्व विचारलेली वैयक्तीक माहिती भरायची आहे.
सर्व माहिती भरून झाल्यावर अॅप्लाय ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.अशा प्रकारे आपली अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.
किंवा आपण आॅफलाईन पद्धतीने देखील ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन योजनेचा फाॅम घ्यायचा आहे.
अणि तो भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा लागेल यानंतर आपल्या अर्जाची कागदपत्रांची चौकशी केली जाईल.
आपण योजनेसाठी पात्र असल्यास आपणास संदेश पाठवला जाईल.
शौचालय अनुदान योजनेचे फायदे –
सरकारच्या ह्या कल्याणकारी योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वताचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत प्राप्त होईल.
लोकांना उघड्यावर शौचाला बसावे लागणार नाही ज्यामुळे गावात कुठल्याही प्रकारची दुर्गंधी पसरणार नाही रोगराई होणार नाही,आजार पसरणार नाही.
घरातील महिलांना उघड्यावर शौचाला बसावे लागणार नाही.
गांव लहोडडा तहसील खतौली जिला मुजफ्फरनगर