सरकारी योजना

गटई स्टाॅल योजनेविषयी माहीती Gatai Stall Scheme Information in Marathi

आज आपल्या महाराष्ट्र राज्यात चामड्याच्या वस्तू दुरूस्त करणे तसेच रस्त्याच्या कडेला बसुन रस्त्याने ये जा करत असलेल्या पादचारी लोकांच्या तुटलेल्या चप्पल शिवणे फाटलेले बुट शिवणे इत्यादी पादत्राणे दुरूस्तीची कामे अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती करताना आपणास दिसून येतात. आज दिवसभर रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसुन लोकांच्या फाटक्या चपला तसेच बुटे शिवून जो काही पैसा त्यांना प्राप्त होतो त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. अनुसूचित जाती मधील हे पादत्राणे दुरूस्तीचा व्यवसाय करणारे व्यक्ती रोज उन वारा पाऊस इत्यादी सहन करत आपले काम करतात अणि लोकांची सेवा करत असतात. अशा रस्त्याच्या कडेला बसुन दिवसभर उन्हातान्हात कष्ट करत असलेल्या अनुसुचित जाती मधील व्यक्तींना उन, वारा पाऊस इत्यादी पासुन संरक्षण प्राप्त व्हावे. अशा देशातील कष्टकरी लोकांचा आर्थिक विकास घडुन यावा म्हणून त्यांना ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेच्या क्षेत्रात पत्र्याचे स्टाॅल बांधण्यासाठी गटई स्टाॅल Gatai Stall Scheme योजनेअंतर्गत शंभर टक्के इतके अनुदान दिले जाते.

गटई स्टाॅल योजना काय आहे?

What is Gatai Stall Scheme ?

गटई स्टाॅल ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांसाठी सुरू केली आहे.ही योजना सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांना आपला पादत्राणे दुरूस्तीचा व्यवसाय करण्यासाठी फ्री मध्ये पत्र्याचे स्टाॅल उपलब्ध करून दिले जातात.

गटई स्टाॅल योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

राज्यातील गटई कामगारांना ऊन,वारा,पाऊस यांपासून स्वताचा बचाव करत त्यांचा पारंपरिक पद्धतीने चालत आलेला चपला बुट शिवण्याचा,दुरुस्तीचा व्यवसाय करता यावा यासाठी त्यांना पत्र्याचे छोट छोटे स्टाॅल बांधून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांची सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने.

गटई स्टाॅल योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

ह्या योजनेचे लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील रस्त्याच्या कडेला बसून चप्पल बूट शिवण्याचा दुरुस्तीचा व्यवसाय करणारे गटई कामगार असणार आहेत.

गटई स्टाॅल योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत गटई कामगारांना शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टाॅल बांधून दिले जातात.

गटई स्टाॅल योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम तसेच पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

लाभार्थीं अर्जदार व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील तसेच चर्मकार समाजातील असावा.

फक्त महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असलेले कामगार ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.महाराष्ट राज्याच्या बाहेरील गटई कामगार ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत.

लाभार्थींचे वय अठरा ते पन्नास ह्या वयोगटादरम्यान असावे.

अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्याला चांगले ज्ञान असायला हवे.

ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे ९८ हजार अणि शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे.

अर्जदाराजवळ तहसीलदार तसेच तत्सम सक्षम प्राधिकारी कडुन देण्यात आलेले जातीचे तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील असावे.

ज्या अर्जदार लाभार्थींने केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या गटई स्टाॅल योजनेचा याआधी लाभ घेतला आहे ते ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाही.

अर्जदाराला ज्या जागेवर स्टाॅल बांधायचा आहे ती जागा अर्जदाराची स्वताच्या मालकीची असायला हवी.

किंवा ती ग्रामपंचायत महानगरपालिकेने भाडयाने खरेदी केलेली तसेच अर्जदारास फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली असावी.

गटई स्टाॅल योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या स्टाॅलची दुरुस्ती करण्याचे देखभाल करण्याची जबाबदारी पुर्णपणे लाभार्थींची असणार आहे

व्यावसायिक प्रशिक्षण योजना २०२४ विषयी माहिती

स्टाॅलच्या दुरुस्ती तसेच देखभालीसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च देण्यात येणार नाही.

गटई स्टाॅल योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या स्टाॅलची लाभार्थी विक्री करू शकत नाही किंवा तो स्टाॅल तो इतर कुठल्याही व्यक्तीला भाडयाने देऊ शकत नाही.

योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यात येतो.

गटई स्टाॅल योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या स्टाॅलमध्ये लाभार्थीं इतर दुसरा व्यवसाय करू शकत नाही किंवा तो इतर दुसरया वस्तुंची विक्री देखील करू शकत नाही.

योजनेचा लाभार्थीं कुठल्याही सरकारी कार्यालयात नोकरी करत नसावा.

स्टाॅल प्राप्त झालेल्या लाभार्थींला स्टाॅल वितरणाचे पत्र फोटोसोबत स्टाॅलच्या पुढील भागात लावणे बंधनकारक असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

गटई स्टाॅल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला पुढील कागदपत्रे जोडावी लागतील-

  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाबाबद प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे शपथपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी
  • बॅक खाते डिटेल्स

गटई स्टाॅल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सगळ्यात पहिले आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.

कार्यालयातुन योजनेचा लाभ घेण्यासाठी फाॅम घ्यावा लागेल तो अर्ज व्यवस्थित अचुकरीत्या भरून घ्यायचा आहे त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन घ्यायची आहे.

मग तो अर्ज समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात सबमिट करायचा आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button