व्यवसायसरकारी योजना

व्यावसायिक प्रशिक्षण योजना २०२४ विषयी माहिती

नोकरी प्राप्त न होत असल्याने बेरोजगार होऊन बसलेल्या देशातील सर्व तरूणांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी आपल्या देशातील सरकार नेहमी बेरोजगारांसाठी कल्याणकारी योजना राबवित असते. आज आपण शासनाने बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी सुरू केलेल्या अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव व्यावसायिक प्रशिक्षण योजना असे आहे.

व्यावसायिक प्रशिक्षण योजना काय आहे?

आपल्या भारत देशातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त व्हावे तसेच त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणातुन स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा यासाठी शासनाने व्यावसायिक प्रशिक्षण ही योजना सुरू केली आहे.

व्यावसायिक प्रशिक्षण ह्या योजनेअंतर्गत तरूणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत असतात.

देशातील बेरोजगार होऊन बसलेल्या तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वताचा एखादा रोजगार उद्योग व्यवसाय सुरू करावा अणि स्वताच्या पायावर ठामपणे उभे राहावे

याकरिता व्यावसायिक प्रशिक्षण ह्या योजनेअंतर्गत शासनाकडून देशातील सर्व बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येते.तसेच अशा बेरोजगार तरुणांना स्वताचा रोजगार सुरू करता यावा यासाठी १० हजार रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येते.

एवढेच नव्हे तर आवश्यकतेनुसार तरूणांना स्वताचा रोजगार सुरू करण्यासाठी व्यवसायांचे किट देखील वितरीत केले जाते.

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थींच्या बँक खात्यात डिबीटी दवारे जमा करण्यात येत असते.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

आज आपल्या देशात बहुतांश तरूण असे आहेत जे चांगले शिकलेले आहेत.पण त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हवी तशी नोकरी मिळत नाहीये.

अशा तरूणांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी प्राप्त करण्यासाठी आपली शैक्षणिक कागदपत्रे हातात घेऊन उन्हातान्हात रोज भटकावे लागते आहे तरी देखील त्यांना नोकरी उपलब्ध होत नाहीये.

अशा देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाकडे उद्योजतकेकडे वळविण्यासाठी स्वताच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर सक्षम बनवण्यासाठी शासनाने व्यावसायिक प्रशिक्षण ही योजना सुरू केली आहे.

ह्या योजनेचे लाभार्थी कोण असतील?

योजनेचे लाभार्थी देशातील सर्व बेरोजगार तरूण तरूणी असणार आहेत.

तसेच ज्यांना खुप शोधून देखील आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी प्राप्त होत नाहीये असा स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेले तरूण तरूणी असणार आहे.

ह्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरूण तरूणींना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

तसेच त्यांना स्वताचा रोजगार सुरू करण्यासाठी दहा हजार रूपये इतकी आर्थिक मदत देखील केली जाते.

 व्यावसायिक प्रशिक्षण ह्या योजनेअंतर्गत ज्या तरूण तरूणींचे वय १८ ते ४५ दरम्यान आहे त्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते अणि प्रशिक्षण काळात जा ये करण्यासाठी महिन्याचा बसपास देखील देण्यात येतो.

आंतरजातीय विवाह योजना २०२४ विषयी माहिती Antarjatiya Vivah Yojana 2024 Information in Marathi

लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचे नियम –

अर्जदार व्यक्ती पुणे महानगर पालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्यास असावी.

अर्जदार हा मागासवर्गीय प्रवर्गातील असावा किंवा तो अपंग असावा.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.

एक प्रशिक्षण झाल्यानंतर त्याच्याशी पुरक प्रशिक्षण एका पेक्षा जास्त विषयात करू शकतात.

व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी अर्जदाराला काही अनामत रक्कम भरावी लागते समजा अर्जदार लाभार्थीं प्रशिक्षण अर्धवट सोडून निघून गेला किंवा त्याने अॅडमिशन मिळाल्यानंतर देखील प्रशिक्षणासाठी आला नाही तर अशा परिस्थितीत पुणे मनपाकडे त्याने जमा केलेली अनामत रक्कम जप्त करण्याचा पुर्णपणे अधिकार असेल.

कोणत्या अर्जदाराचा अर्ज स्वीकारायचा कोणाचा अर्ज अस्वीकार करायचा मुख्य समाज विकास अधिकारी स.वि.वि पुणे मनपा कडे असणार आहे.त्यांनी ह्याबाबत घेतलेला निर्णय शेवटचा निर्णय असेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • अर्जदाराचे कुटुंब तीन वर्षांपासून पुणे महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास आहेत याचा पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे जोडणे
  • वयाचा पुरावा
  • अर्जदार मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
  • अर्जदार अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • अखेरची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक
  • अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र

इत्यादी

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

व्यावसायिक प्रशिक्षण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम dbt.punecorporation.org ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर new registration ह्या पर्यायावर क्लिक करून आपली सर्व आवश्यक माहीती भरून घ्यायची आहे.

यानंतर आपली योजना जाणुन घेऊन आपल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे अणि विचारलेली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

ह्या योजनेसाठी आॅफलाईन अर्ज करण्यासाठी समाज विकास कार्यालयात किंवा प्रभाग पातळीवरील समूह संघटकांच्या कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे

अणि त्यात विचारलेली माहीती भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो तिथे जमा करायचा आहे

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button