सरकारी योजना

आंतरजातीय विवाह योजना २०२४ विषयी माहिती Antarjatiya Vivah Yojana 2024 Information in Marathi

आपल्या समाजातील स्पृश्य अस्पृश्यतेचा उच्च निच्चतेचा भेदभाव दुर व्हावा म्हणून शासन नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असते.अनेक महत्वाचे पाऊल उचलत असते. आंतरजातीय विवाह योजना ही योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला असाच एक महत्वाचा उपक्रम तसेच उचललेले महत्वाचे पाऊल आहे.

ही योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येते.हया योजनेची सुरुवात ३ सप्टेंबर १९५९ रोजी करण्यात आली होती.

आजच्या लेखात आपण आंतरजातीय विवाह योजना २०२४ विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

आंतरजातीय विवाह योजना काय आहे?

देशातील स्पृश्य अस्पृश्य भेदभाव दुर व्हावा म्हणून ही योजना शासनाने सुरू केलेली ही एक महत्वाची योजना आहे.

जे जोडपे ह्या योजनेअंतर्गत विवाह करते त्याला पन्नास हजार रुपये इतकी रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाते.

ही योजना का सुरू करण्यात आली आहे?

समाजातील जात धर्म तसेच स्पृश्य अस्पृश्यतेचा पसरलेला भेदभाव दुर करून अस्पृश्यता निवारण करण्यासाठी अणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन प्राप्त व्हावे म्हणून सरकारने आंतरजातीय विवाह योजना सुरू केली आहे.

देशात जात धर्माच्या नावाखाली होत असलेले दंगली मारामारी यांना आळा घालण्यासाठी तसेच समाजात विवाहाविषयी लोकांच्या मनात असलेल्या चुकीच्या समज दुर करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेविषयी माहिती

आंतरजातीय विवाह योजनेची इतर उद्दीष्टे –

 1. जात धर्माचा समाजात होत असलेला भेदभाव पुर्णतः नष्ट करणे.
 2. समाजातील जाती धर्माविषयी लोकांचे असलेले गैरसमज दूर करणे.
 3. नवविवाहित जोडप्यांना शासनाकडुन आर्थिक साहाय्य प्रदान करणे.
 4. प्रत्येक धर्माला समान दर्जा देणे राज्यात सर्व धर्मसमानता आणने.
 5. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे.

योजना अंतर्गत प्रोत्साहन रक्कम प्राप्त करण्यासाठी ठेवण्यात आलेली अट काय आहे?

योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये इतकी रक्कम प्राप्त करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.

विवाह करत असलेल्या जोडप्यापैकी म्हणजे वर,मुलगा किंवा वधु मुलगी अनुसूचित जाती जमाती म्हणजेच दलित प्रवर्गातील असावी तेव्हाच ह्या योजनेअंतर्गत आंबेडकर फाऊंडेशन तर्फे २.५ लाख इतकी प्रोत्साहनपर रक्कम आपणास दिली जाईल.

योजनेचा लाभ कोणत्या जोडप्याला दिला जातो?

जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या खुल्या प्रवर्गासाठी मुलाने किंवा मुलीने अनुसुचित जाती प्रवर्गातील म्हणजे दलित समाजातील मुलीशी किंवा मुलाशी विवाह केला तर त्या दोघे जोडप्याला आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जातो.

ह्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या एकुण लाभाचे स्वरूप –

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी ५० टक्के रक्कम राज्य सरकार देत असते अणि पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार देत असते.

याचसोबत आंबेडकर फाऊंडेशन तर्फे २.५ लाख इतकी रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाते.म्हणजे ह्या योजनेअंतर्गत लाभार्थींना एकुण ३ लाख रूपये दिले जातात.

जेव्हा एखादा अनुसूचित जाती जमाती मधील मुलगा किंवा मुलगी एखाद्या हिंदु,जैन,ख्रिश्चन,शीख इत्यादी दुसरया जाती तसेच धर्मातील मुलाशी मुलीशी विवाह करतो तेव्हा त्या विवाहाला आंतरजातीय विवाह असे संबोधण्यात येईल.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेअंतर्गत जोडप्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणला जाईल.

विवाह करणारी जोडपे सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.

राज्यात आंतरजातीय विवाहाला अधिक प्रोत्साहन प्राप्त होईल.

आंतरजातीय विवाह करणारया जोडप्यांना आर्थिक मदत प्राप्त होईल.

देशातील जाती धर्माचा भेद नष्ट होण्यास मदत होईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

आंतरजातीय विवाह योजनेचे नियम तसेच अटी कोणकोणत्या आहेत?

फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या जोडप्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.महाराष्ट राज्याच्या बाहेरचे जोडप्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

लाभार्थी विवाहीत जोडप्यातील एक जण अनुसुचित जाती अनुसुचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा.

योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम त्याच जोडप्यांना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील मुलांशी/मुलीशी आंतरजातीय विवाह केला आहे.

दोघेही जोडप्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे अणि त्याला आधार कार्ड देखील लिंक असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

 • लाभार्थी जोडप्याचे विवाह प्रमाणपत्र
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • वार्षिक उत्पन्न दाखला
 • कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट
 • दोघांचे पासपोर्ट साईज फोटो
 • विवाहीत जोडप्यापैकी कोणीही एक जण अनुसुचित जाती अनुसुचित जमाती विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील असल्याचे प्रमाणपत्र
 • दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम sjsa.maharashtra.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन आंतरजातीय विवाह योजना ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर एक रेजिस्ट्रेशन अर्ज येईल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे.आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे.

किंवा आपण आॅफलाईन पद्धतीने नजीकच्या जिल्हा कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तिथे जमा करू शकतात.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button