ट्रेंडिंगसरकारी योजना

चंदन कन्या योजना २०२४ विषयी माहिती Chandan Pm Kanya Yojana 2024 Information in Marathi

चंदन योजना Chandan Pm Kanya Yojana ही महाराष्ट्र सरकारने शेतकरींच्या मुलींसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.मुलींच्या शिक्षणाचा खर्च अणि मुलीबाबतचा संकुचित विचार खोडुन काढण्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने विशेष पुढाकार घेतला आहे.याकरीताच महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने चंदन कन्या योजना सुरू केली आहे.

चंदन कन्या योजना काय आहे?

निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये हवे तेवढे उत्पन्न प्राप्त होत नव्हते याचाच परिणाम ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर होऊ लागला.

हया सर्व परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी तसेच शेतकरींच्या मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने चंदन कन्या ही योजना सुरू करण्यात आली आहे.

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

चंदन कन्या ह्या योजनेअंतर्गत शेतकरींच्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी,लग्न करण्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाकडुन १५ ते २० लाखाचे आर्थिक अनुदान दिले जाते.फक्त याबदल्यात शेतकरींना चंदनाची झाडे बारा वर्षे सांभाळायची आहेत.

Chandan Pm Kanya Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे?

चंदन कन्या ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकरयांची एक ते दहा वर्षे वयोगटातील मुलगी आहे अशा शेतकरींना त्यांच्या शेताच्या बांधावर फक्त २० चंदनाची झाडे लावावी लागणार आहेत.

ह्या झाडांना बारा वर्षे सांभाळले म्हणजे बारा वर्षात शेतकरयाने २० चंदनाची झाडे लावली तर शेतकरयाला त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाकडुन एकरकमी पंधरा ते वीस लाख रुपये दिले जातात.

शेतकरींनी चंदन कन्या योजनेत सहभागी होण्यासाठी काय करायचे?

चंदन कन्या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरींना सर्वप्रथम ह्या योजनेचा फाॅम भरावा लागेल.

शेतकरीकडे त्याची अणि त्याच्या मुलीच्या आधार कार्डची एक झेरॉक्स असायला हवी.

याचसोबत चंदन कन्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरींना अकराशे रूपये इतके सहभाग शुल्क देखील भरावे लागणार आहे.

ह्या योजनेमध्ये शेतकरींची मुलगी/पुतणी भाची इत्यादी सहभागी होऊ शकते.

चंदन लागवडीसाठी चंदनाची रोपे/झाडे कुठून आणायची?

जे शेतकरी चंदन कन्या योजनेसाठी नोंदणी करतील त्यांना चंदनाची झाडे रोपे विकत घेण्यासाठी सर्व मदत एकदम सहज अणि निःशुल्क करण्यात येते.

चंदन कन्या योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकरींना त्यांच्या मुलीच्या नावावर २० चंदनाची झाडे रोपे लागवड करण्यासाठी त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात.

याचसोबत शेतकरयांना चंदनाची लागवड करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन देखील केले जाते.चंदनाची लागवड करून झाल्यानंतर चंदनाच्या झाडाची नोंद तसेच सात बारावर नोंद घेण्यासाठी मोफत मदत केली जाणार आहे.

चंदनाच्या झाडाची वाढ झाल्यावर झाडे तोडणे तसेच वाहतूक करण्यासाठी परवाना काढण्यासाठी देखील शेतकरींना चंदन उत्पादक संघाकडुन मदत केली जाते.

शेतकरयांनी लागवड केलेल्या वाढविलेल्या ह्या झाडाची खरेदी देखील स्वता चंदन उत्पादक संघाकडुन केली जाईल.

सलोखा योजना २०२४ विषयी माहिती Salokha Yojana 2024 Information in Marathi

चंदन कन्या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत? Chandan Pm Kanya Yojana

महाराष्ट्र सरकारच्या ह्या चंदन कन्या योजनेमुळे चंदनाच्या लागवडीत अधिक वाढ होण्यास मदत होणार आहे.

शेतकरींच्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी तसेच लग्नासाठी आर्थिक अनुदान प्राप्त होणार आहे.

चंदनाच्या झाडाची लागवड करून त्यांची वाढ करून शेतकरयांना ह्या योजनेअंतर्गत पंधरा ते वीस लाख कमवता येणार आहे.

चंदन कन्या ह्या योजनेमुळे शेतकरींना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी पैशांची काळजी करण्याची कुठलीही आवश्यकता पडणार नाही.

कारण ह्या योजनेअंतर्गत शेतकरींच्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी १५ ते २० लाखापर्यंतचे आर्थिक अनुदान प्राप्त होणार आहे.

चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  1. चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –
  2. मुलीचे आधार कार्डची झेरॉक्स/जन्म दाखला झेरॉक्स
  3. शेतकरीचे आधार कार्ड झेरॉक्स
  4. चंदन कन्या नोंदणी शुल्क
  5. चंदन कन्या योजनेचा फाॅम
  6. रहिवासी दाखला
  7. दोन पासपोर्ट साईज फोटो
  8. मोबाईल नंबर
  9. शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  10. जमिनीचा सातबारा उतारा

चंदन कन्या योजना का सुरू करण्यात आली?ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील कित्येक शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत.घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करता येत नाही.

ज्यामुळे मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते.त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास होत नाही.

याचकरीता शेतकरयांच्या आर्थिक दृष्ट्या गरीब मुलींच्या उच्च शिक्षणाचा,लग्नाचा खर्च करण्यासाठी शासनाने चंदन कन्या योजना सुरू केली आहे.

चंदन कन्या योजनेअंतर्गत सर्व शेतकरींचा आर्थिक विकास केला जाणार आहे.तसेच शेतकरींच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे आपले शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून आर्थिक मदत देखील केली जाणार आहे.

चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

१)अर्जदार हा शेतकरी असायला हवा.त्याच्याकडे शेतजमीन असायला हवी.

२) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

३) महाराष्ट्र राज्याबाहेरील व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

४) शेतकरींच्या परिवारात मुलगी असणे गरजेचे आहे अणि ती मुलगी एक ते दहा वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

५) योजनेअंतर्गत शेतकरयांना चंदनाच्या झाडाची लागवड करून बारा वर्षे चंदनाच्या झाडाची निगा राखणे आवश्यक आहे.

Chandan Pm Kanya Yojana योजनेसाठी नोंदणी कशी करायची?

चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी तसेच योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण ७०३८४४३३३३ ह्या मोबाईल क्रमांकावर व्हाटस अप करायचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button