ट्रेंडिंगसरकारी योजना

Business Loan : चर्मोद्योग विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येत आहे व्यवसायासाठी कर्ज

Business Loan : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय अणि विकास विभागाच्या माध्यमातुन अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जात असतात.

व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० टक्के अनुदान ही देखील अशीच एक महत्वपूर्ण योजना आहे.

५० टक्के अनुदान योजना काय आहे ?

योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे

येथे क्लीक करा

योजनेअंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील व्यक्तींना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

ह्या योजनेत अनुसूचित जाती ह्या प्रवर्गातील लाभार्थींना राष्ट्रीयकृत बॅकेत ५० हजार रुपये इतका प्रोजेक्ट असलेल्या उद्योग व्यवसायात गुंतवणुक करायला सवलतीचे व्याज दराची आकारणी करत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

प्राप्त होत असलेल्या कर्जाच्या रकक्मेतील एकुण ५० टक्के इतकी रक्कम म्हणजे १० हजार रुपये महामंडळ अनुदान म्हणुन आपल्याला देत असते.

अणि उर्वरित ५० टक्के इतकी कर्जाची रक्कम ३६ ते ६० महिन्यांच्या समान हप्त्यात आपणास फेडावी लागत असते.किंवा ह्या घेतलेल्या ५० टक्के इतक्या कर्जाची परतफेड आपणास बॅकेकडुन निर्धारीत करून दिलेल्या हप्त्यात बॅकेला करावी लागेल.

ह्या योजनेअंतर्गत बॅकेकडुन आपणास दिल्या जाणाऱ्या कर्जावर द.सा.द.शे ९.५ ते १२.५ टक्के इतक्या दराने व्याजदराची आकारणी केली जाईल.

योजनेचे लाभार्थी कोण असतील?

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार समाजातील व्यक्तींना दिला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी तसेच नियम-

ह्या ५० टक्के अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रतेच्या अटी निर्धारित करण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत –

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती महाराष्ट् राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती चर्मकार समाजातील असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय १८ ते ५० दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यवसाय कर्ज घेऊन जो उद्योग व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायाचे त्याला उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.त्या क्षेत्रात काम करण्याचा त्याला अनुभव असायला हवा.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ९८०००अणि शहरी भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न१२०००० पर्यंत असणे आवश्यक आहे.
 • राज्य पुरस्कृत योजनेसाठी शहर तसेच ग्रामीण ह्या दोन्ही भागातील उत्पन्न मर्यादा १००००० पर्यंत असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे

येथे क्लीक करा

 • अर्जदाराला दिलेला जातीचा उत्पन्नाचा दाखला तत्सम सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला असायला हवा.
 • अर्जदाराने याआधी महामंडळाकडून तसेच इतर कोणत्याही शासकीय उपक्रमा अंतर्गत आर्थिक लाभ प्राप्त केलेला नसावा.
 • महामंडळाच्या वतीने लादण्यात आलेल्या सर्व अटी शर्तीचे पालन करणे अर्जदारास साठी बंधनकारक असणार आहे.

योजनेसाठी अर्ज करायला लागणारी महत्वाची कागदपत्रे Business Loan

 • योजनेचा विहित नमुन्यातील भरलेला अर्ज
 • अर्जदाराचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • वाहन परवाना
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • ग्रामपंचायत तसेच तत्सम शासकीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र (noc no objection certificate )
 • रेशनकार्ड
 • ज्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहेत त्या क्षेत्रातील व्यवसायाचा अनुभव दाखला

योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

ह्या योजनेसाठी अर्जाचा नमुना हा अर्जदाराला महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात निशुल्क देण्यात येईल.हा विहित नमुन्यातील दिलेला अर्ज भरून त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन अर्जदाराने जिल्हा कार्यालयात आपला अर्ज सादर करायचा आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट –

अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार समाजातील व्यक्तींचे जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी तसेच चर्मकार समाजाचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी ही योजना संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button