यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ विषयी माहिती Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana
भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंब हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगावी भटकंती करत असतात.तसेच ह्या गावातुन त्या गावात स्थलांतर करीत असतात. अशा भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना अंतर्गत शासनाकडून घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते.
अशा भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाना स्वताचे घर बांधण्यासाठी शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत निधी देखील पुरवला जातो.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना काय आहे? ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येत असते.
आपली प्रत्येकाची इच्छा असते की आपले स्वताचे हक्काचे घर असायला हवे पण पुरेशा पैशांच्या अभावामुळे समाजातील काही गरीब घटकांना घरकुल बांधणे शक्य होत नाही.
अशा गरजु लोकांना शासनाकडून घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते एवढेच नव्हे तर ह्या योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना घर बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देखील दिले जाते.
विमुक्त भटक्या जाती जमातीतील लोकांचे राहणीमान उंचावावे त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतात वाढ व्हावी तसेच त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेसाठी ठेवण्यात आलेले लाभार्थीं निवडीचे निकष काय आहेत?
- लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती मधील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंब गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणारे असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे एकुण वार्षिक उत्पन्न हे १.२० लाखापेक्षा कमी असायला हवे.
- लाभार्थी कुटुंब बेघर असावे किंवा ते झोपडी कच्चेवर पाला पाचोळयाच्या घरामध्ये राहणारे असावे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेसाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान –
योजनेसाठी शासनाकडून ग्रामीण भागात १.२० लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते.
तसेच डोंगरी नक्षलवादी भागातील लोकांसाठी ह्या योजनेअंतर्गत १.३० लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते.
मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेसाठी दिले जाणारे प्राधान्यक्रम –
पालात राहत असलेल्या तसेच गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह करत असलेल्या कुटुंबांना ह्या योजनेसाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
ज्यांच्या घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा परीतक्त्या अपंग महिलांना देखील ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.
पुरग्रस्त क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना देखील ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच समाज कल्याण विभागात,ग्रामपंचायतीमध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे.
ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ग्रामसेवक आपणास ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर माहिती दिली जाते.
ह्या योजनेसाठी लाभार्थीं निवडण्याची प्रक्रिया ही बहुतांशी वेळा ग्रामसभेत पार पडत असते.
योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाला दिला जातो.
ह्या योजनेअंतर्गत दिव्यांग महिला, दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना तसेच पुरग्रस्त कुटुंबांना देखील लाभ दिला जातो.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे फायदे –
शासनाच्या ह्या कल्याणकारी योजनेमुळे भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना स्वताचे हक्काचे घर प्राप्त होते.
याचसोबत शासनाकडून रोजगाराच्या संधी देखील शासनाच्या वतीने उपलब्ध होत असतात.
चंदन कन्या योजना २०२४ विषयी माहिती साठी येथे क्लिक करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- भुमिहिन असल्याचे प्रमाणपत्र
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेच्या लाभाचे स्वरूप –
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात २० कुटुंबांसाठी एक वस्ती तयार केली जाते.तयार केलेल्या ह्या वस्तीस वसाहतीस पाणीपुरवठा,वीजपुरवठा सेफ्टी टॅक इत्यादी सुविधा पुरविण्यात येत असतात.
ज्या लाभार्थ्यांनी सध्या स्थितीत कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही अणि त्यांच्याकडे स्वताची जमीन आहे त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ दिला जातो.