सरकारी योजना

Mahatma Phule Shetkari Karjmukti Yojna महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना विषयी माहिती

आपला भारत देश हा शेतकरींचा देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो.

कारण भारत हा एक शेतीप्रधान देश आहे जिथे पिढ्यानपिढ्या पासुन शेती हाच व्यवसाय लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी करत आले आहेत.

महाराष्ट्र राज्यात गरीब शेतकरी देखील आहेत

पण आपल्या महाराष्ट्र राज्यात काही असे गरीब शेतकरी देखील आहेत. ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे.

त्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी लागणारी महत्वाची साधनसामग्री खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.

अशावेळी बहुतांश शेतकरी बांधव सावकाराकडे अधिक व्याजदराने स्वताचे घर तसेच शेतजमिन गहाण ठेवतात आणि शेतीसाठी उपयुक्त असलेली साधन सामग्रीची खरेदी करतात.

पण त्यात देखील अचानक अवकाळी पाऊस पडल्याने तसेच अतिवृष्टी, गारपीट, वादळ दुष्काळ इत्यादी कारणांमुळे शेतकरींना पिकांच्या नुकसानाला सामोरे जावे लागते.

अशा पद्धतीने शेतकरींचे शेतीचे तर नुकसान होतेच शिवाय शेतीसाठी उपयुक्त साधन सामग्रीची साहित्याची खरेदी करण्यासाठी जे पैसे सावकाराकडुन व्याजाने घेतलेले असतात.त्या पैशांची तसेच त्याच्या व्याजाची देखील परतफेड न करता आल्याने सावकार त्यांच्या घरावर शेतजमीनीवर ताबा घेत असतो.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरींचे आज उत्पन्नाचे एकमेव साधनच शेती आहे.आज शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी संपूर्णत शेतीवर अवलंबून आहे.

अशातच अचानक आलेल्या अवकाळी पाऊस,गारपीट अतिवृष्टी,वादळ इत्यादी नैसर्गिक संकटामुळे शेतकरींचे खुप मोठे नुकसान होत असते.

अशावेळी उत्पन्नाचे एकमेव साधनच बंद पडल्याने शेतकरींना प्रश्न पडतो की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा त्यांचा सांभाळ कसा करावा तसेच सावकाराकडुन घेतलेले कर्ज कसे फेडावे.

हतबल निरूपाय होऊन अशावेळी अनेक शेतकरी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतात.अणि आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करतात.

आज शेती व्यवसायात वारंवार होत असलेल्या नुकसानामुळे तर अनेक शेतकरी शेती करायलाच नाही म्हणत आहेत.अणि असे झाले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल.

देशातील ह्याच गंभीर समस्येला लक्षात घेऊन शासनाने शेतकरयांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकरींना शेतीव्यवसाय करण्यासाठी अधिक प्रोत्साहन प्राप्त करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती Mahatma Phule Shetkari Karjmukti ह्या योजनेचा आरंभ केला आहे.

Mahatma Phule शेतकरी कर्जमुक्ती योजना काय आहे?

ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरींसाठी शासनाने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती ही योजना महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे.

ह्या योजनेअंतर्गत शेतकरींना कर्जमाफी दिली जाते तसेच जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करत आहेत त्यांना प्रोत्साहनपर लाभ सुद्धा दिला जातो.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची कर्जमाफी देऊन त्यांना शासनाकडून आर्थिक पाठबळ प्राप्त करून देणे.

राज्यातील गरीब शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावर कर्जमाफी देऊन कर्जबाजारीपणामुळे होत असलेल्या शेतकरयांच्या आत्महत्या थांबवणे तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरींना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे शेती व्यवसायाकडे आकर्षित करणे हे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधव महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असणार आहेत.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती ह्या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर कर्जमाफी दिली जाते तसेच कर्ज प्रोत्साहन रक्कम देखील दिली जाते.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अधिक आत्मनिर्भर अणि सक्षम बनतील.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ प्राप्त होऊन त्यांचे भविष्य उज्वल होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या राहणीमानात जीवनमानात सुधारणा घडुन येईल.

राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडुन येईल.

महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ घडुन येईल.

राज्यातील नियमितपणे कर्जाची परतफेड करत असलेल्या शेतकरयांना प्रोत्साहनपर लाभ प्राप्त होणार आहे.

एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi

महाराष्ट्र राज्यातील अधिकतम शेतकरी शेती व्यवसायाकडे वळतील शेती व्यवसायाकडे आकर्षित होतील.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा बसेल तसेच शेतकरींची आर्थिक प्रगती देखील होईल.

ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकडुन बॅकेकडुन कर्ज घेतले आहे त्यांना आपल्या शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यावर जवळ उत्पन्नाचे साधन नसल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची ह्या चिंतेत आतमहत्यासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागणार नाही.

कारण आपल्या देशातील सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी भावना शेतकरींच्या मनात निर्माण होईल.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील अणि स्वताच्या पायावर उभे राहतील.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

शेतकरी कर्जमुक्ती ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.

देशातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंतचे थकबाकी असलेले पीक कर्ज अणि पुनर्गठित कर्जाची माफी केली जाते.

ह्या योजनेमध्ये थकबाकी भरण्याची कोणतीही अट ठेवण्यात आली नाहीये.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्ज प्रोत्साहन लाभाची रक्कम लाभार्थीं शेतकरीच्या बॅक खात्यात डिबीटीच्या साहाय्याने जमा करण्यात येते.

ह्या योजनेचा लाभ करण्यासाठी कुठल्याही शेतकरीला अर्ज करावा लागणार नाही.याने लाभार्थीं शेतकरींचा शासकीय कार्यालयाच्या चकरा मारण्यात जाणारा वेळ अणि रहदारीचा खर्च दोन्ही वाचतील.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांला प्राप्त करता येतो.

म्हणजे ही योजना कुठल्याही एका विशिष्ट प्रवर्गातील शेतकरींसाठी नाहीये.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही शेतकरी असणे अनिवार्य आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.

कुठल्याही सरकारी कार्यालयात नोकरी करत असलेल्या व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणारा शेतकरी किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची रक्कम देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेतला जाईल तसेच त्या शेतकरयाने एक किंवा अनेक बॅकाकडुन घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम ह्या दोघांचा विचार करून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम निश्चित केली जाईल.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरीता फक्त नॅशनल बॅक, प्रायव्हेट बॅक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बॅक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी बॅकाकडुन कर्ज प्राप्त करत तसेच स्वनिधीतुन शेतकरींना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज ह्या योजनेकरीता विचारात घेतले जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे असे शेतकरी प्रोत्साहन लाभ प्राप्त करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरीकडे स्वताची शेतजमिन असायला हवी.

Mahatma Phule शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्यांचे बॅकेत खाते असावे.तसेच त्या खात्याला आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाल्याने तसेच महापुर आल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ प्राप्त झालेले शेतकरी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

अणि समजा एखाद्या शेतकर्यांचा मृत्यू झाला अणि त्याच्या पश्चात त्याच्या वारसदाराने त्याने घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केली तर त्या वारसाला देखील प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ही आधीच्या कर्जमुक्ती योजनेप्रमाणे आॅनलाईन पदधतीने करण्यात येणार आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करत असताना माननीय मुख्य सचिवांच्या परवानगीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमये आवश्यक ते बदल करण्यात येतील.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत खालील दिलेल्या व्यक्तींना कर्ज प्रोत्साहन दिले जाणार नाही-

केंद्र व राज्य शासनाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळुन सर्व कर्मचारी अधिकारी ज्यांचे महिन्याचे वेतन २५ हजारापेक्षा जास्त आहे.

Mahatma Phule शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री,राज्यमंत्री, माजी लोकसभा राज्यसभा सभासद,आजी माजी विधानपरिषद सदस्य अर्ज करू शकत नाही.

राज्य सार्वजनिक कार्यक्रम एसटी महामंडळ तसेच इतर अनुदानित संस्थेचे एकत्रित मासिक वेतन २५ हजारपेक्षा जास्त असलेले अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळुन

शेतीसोडुन इतर उत्पन्नातून आयकर भरत असलेले व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

निवृत्तीवेतन धारक कर्मचारी ज्यांना महिन्याला २५ हजारपेक्षा जास्त पेंशन मिळते.

कृउबा समिती मधील, सहकारी साखर कारखान्यातील,नागरी सहकारी बॅकेतील, सहकारी सुतगिरणी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी दुध संघ मधील २५ हजारपेक्षा जास्त मासिक वेतन प्राप्त होणारे अधिकारी कर्मचारी.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जमिनीची कागदपत्रे सातबारा तसेच आठ अ उतारा
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • ईमेल आयडी मोबाईल नंबर
  • बॅक खाते तपशील

Mahatma Phule शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा तसेच कर्ज प्रोत्साहन रक्कमेचा लाभ घेण्यासाठी शेतकरींना कुठलाही अर्ज करावा लागत नाही.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button