ट्रेंडिंगसरकारी योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना विषयी माहिती Dr. Punjabrao Deshmukh Scholarship Information in Marathi

बाहेरगावी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहताना अडचणी येत असतात. dr.panjabrao deshmukh scholarship information in marathi

काही महाविद्यालयात वसतिगृहाची सुविधा असते पण काही महाविद्यालयात वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होत नाही.अशावेळी विद्यार्थ्यांना जागा भाडयाने घेऊन राहावे लागते.

अशा वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना फक्त शिष्यवृत्ती पुरेशी नसते

म्हणून अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी निर्वाह भत्ता देखील प्राप्त व्हावा

म्हणून शासनाने २०१७ मध्ये पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना सुरू केली होती.

योजनेअंतर्गत उच्च शिक्षण संचालयाच्या अखत्यारीतील शासकीय,अशासकीय अनुदानित,अंशत अनुदानित,कायम विना अनुदानित महाविद्यालय,अकृषी विद्यापीठे अणि विद्यापीठांतर्गत असलेल्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ दिला जातो.

पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत तसेच नोंदणीकृत मजुर आहेत त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा निरंक ठेवण्यात आली आहे.

यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वसतिगृहाचे ठिकाण मुंबई,पुणे,महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे औरंगाबाद, नागपुर इत्यादी प्रादेशिक शहरांसाठी वार्षिक ३० हजार रुपये इतका निर्वाह भत्ता दिला जातो.

ज्याच्यामध्ये जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचे एक लक्षांक निश्चित केले नाहीये.याचसोबत इतर शहरे अणि ग्रामीण भाग आहेत अशा भागांसाठी वार्षिक २० हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जातो.

ह्या योजनेतील दुसरा प्रकार म्हणजे इतर विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये इतकी आहे पण ते अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत मजुर नाहीये.

अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई,पुणे, नागपुर औरंगाबाद अशा शहरांसाठी वार्षिक दहा हजार रूपये

अणि इतर शहर अणि ग्रामीण विभागासाठी वार्षिक ८ हजार रुपये इतका निर्वाह भत्ता दिला जातो.

ह्या दुसरया प्रकारात सुदधा जिल्हयासाठीचा लक्षांक अमर्याद ठेवण्यात आला आहे.यात अमर्याद प्रमाणात अनुदान भत्ता दिला जातो.

तिसरया प्रकारात १ लाखापासुन ८ लाखापर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई,पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे,औरंगाबाद, नागपुर ह्या शहरांसाठी वार्षिक १० हजार रुपये भत्ता दिला जातो.

याचप्रमाणे १ लाखापासुन ८ लाखापर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असलेले जे विद्यार्थी आहेत.त्या विद्यार्थ्यांसाठी इतर शहरे व ग्रामीण भागासाठी वार्षिक रूपये ८ हजार इतका निर्वाह भत्ता दिला जातो.

पण यांच्यात एक अट देण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी ५०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी एक लक्षांक निश्चित करण्यात येतो.

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १ लाखापर्यंतची कौटुंबिक उत्पन्न क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक २ हजार रुपये इतका निर्वाह भत्ता दिला जातो.

dr.panjabrao deshmukh scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय निमशासकीय खाजगी वसतीगृहात प्रवेश घेतला आहे त्यांनी त्याबाबतचा एक पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

जे विद्यार्थी खाजगी मालकीच्या घरात राहत आहेत त्यांनी त्याठिकाणी राहत असल्याचा भाडे पट्टा करार तसेच नोटरी करणे करणे आवश्यक असणार आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने जर तो सामान्य रहिवासी असलेल्या त्याच गावातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल तर त्याला निर्वाह भत्ता दिला जाणार नाही.

ह्या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील दोन अपत्यांपर्यतच मर्यादित ठेवण्यात आला आहे.

अणि अशा प्रकारचे प्रमाणपत्र देखील आपणास ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडावे लागणार आहे.

एखाद्या विद्यार्थ्याला अन्य योजनेत निर्वाह भत्ता मिळत असेल तर तो ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.

विद्यार्थ्यांने अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या कालावधी करीताच निर्वाह भत्ता दिला जातो.तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला.

किंवा काही कारणाने त्याला वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला नाही तर त्या वर्षापुरता निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

ह्या योजनेअंतर्गत १ लाख रूपये उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता लाभ देण्यासाठी संख्येची कुठलीही मर्यादा नाहीये तसेच जिल्हानिहाय कुठलीही अट नसेल.

पण १ लाख ते ८ लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रति जिल्हा लाभार्थीं विद्यार्थ्यांची संख्या ५०० इतकी निश्चित करण्यात आली आहे.

यातील ३३ टक्के इतक्या जागा विद्यार्थीनींकरीता राखीव ठेवण्यात येतात पण पुरेशा विद्यार्थीनी उपलब्ध झाल्या नाहीत तर रिक्त राहीलेल्या जागांवर त्या जिल्ह्यातील विदयार्थ्यांसाठी उपयोगात आणता येईल.

प्रत्येक जिल्ह्यातील कोटा हा प्राप्त होत असलेल्या अर्जाच्या संख्येनुसार प्रमाण शीरपणे निश्चित करण्यात येतो.

ह्या योजनेसाठी सामान्य श्रेणी तसेच एसई बीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतलेले उमेदवार पात्र ठरतील.

पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास महाडिबीटी ह्या पोर्टलदवारे आॅनलाईन पदधतीने अर्ज करायचा असतो.

ह्या पोर्टलच्या माध्यमातुन आपणास नूतनीकरण देखील करता येते.

dr.panjabrao deshmukh scholarship वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –

  • सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र
  • पालकांचे अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत मजुर असल्याचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • विधी शिक्षण शास्त्र शारीरिक शास्त्र अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी गॅप संबंधित कागदपत्रे,गॅप असल्यास गॅपच्या संबंधित दस्तऐवज
  • दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र

पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरेल?

वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी व्यावसायिक विनाअनुदानित अभ्यासक्रमाचे महाविद्यालये.तंत्रनिकेतन सरकार अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालये ह्या योजनेअंतर्गत निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सक्षम प्राधिकरणामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी इथे पात्र ठरतील.

यात पदविका दहावी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा बारावीनंतर फार्मसी डिप्लोमा.

बारावी नंतर हाॅटेल मॅनेजमेंट डिप्लोमा अशा उच्च अणि तंत्रशिक्षण विभागाचे कोर्स ह्या ठिकाणी पात्र असतील.

फोन पे मधून पैसे कसे कमवायचे | How to Earn Money from Phonepe

याचप्रमाणे पदवी मध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, हाॅटेल मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर,एमबीए,एमसीए,एमसी एस अशा काही पदव्युत्तर पदवी देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पदव्या ज्यात एमबीबीएस,बीडीएस, बीएमएस,बीयु एम एस,बीपीटीएच,बीओटीएच नर्सिंग अशा पदव्या देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

कृषी विभागात कृषी पदविका देखील ह्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

याचसोबत फलोत्पादन, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान,शेती व्यवस्थापन, पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभागातील पदव्या देखील इथे पात्र ठरतील.

प्राणीशास्त्र, पशुसंवर्धन,दुग्धसंवर्धन, मत्स्य विज्ञान यांचयाअंतर्गत असलेले विद्यार्थी देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरतील.

पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button