एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi
एल आयसीच्या ह्या योजनेचे नाव एल आयसी सरल पेंशन योजना Lic Saral Pension Plan असे आहे. जे व्यक्ती सरकारी नोकरी करत नसतात अणि ते एखाद्या खाजगी क्षेत्रात खाजगी कंपनीत कामाला असतात. अशा व्यक्तींना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन दिले जात नसते.कारण खाजगी नोकरी करत असलेल्या व्यक्तींना पेंशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसते. अशा खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न,पेंशन प्राप्त होणार नसते म्हणून त्यांना तरुणपणातच आपल्या वृदधालपकाळाची चिंता भेडसावू लागते. मग असे व्यक्ती वृदधालपकाळात देखील आपला उदरनिर्वाह व्हावा आपल्याला कुठल्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागु नये म्हणून वेगवेगळ्या पेंशन योजनेमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असतात. आपण देखील सरकारी नोकरी करत नाहीये अणि एखादी खाजगी नोकरी करत आहात वृदधालपकाळात आपल्याला देखील निवृत्तीवेतन हवे असेल तर नोकरीच्या कालावधीत आपण ह्या पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करणे आवश्यक आहे.
आज आपण एल आयसीच्या एका अशा पेंशन योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत
ज्यात आपल्याला फक्त एकदा गुंतवणुक करायची आहे अणि त्यानंतर आपल्याला लाईफटाईम १२ हजार रुपये इतकी दरमहा पेंशन प्राप्त होणार आहे.
योजना काय आहे ? What is Lic Saral Pension Plan ?
ह्या योजनेमध्ये आपल्याला फक्त एकदाच गुंतवणुक करावी लागते यानंतर आपल्याला दरमहा बारा हजार रुपये इतकी पेंशन प्राप्त होते.
हे पेंशन आपण महिन्याला, तिमाही सहामाही वार्षिक अशा कुठल्याही एका पदधतीने प्राप्त करू शकतो.
योजनेमध्ये एका वेळची गुंतवणुक केल्यास आपल्याला ह्या योजनेअंतर्गत दरमहा बारा हजार रुपये इतके निवृत्तीवेतन प्राप्त होत असते.
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहिती
पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे –
योजनेमध्ये फक्त एकदा प्रिमियम भरावा लागत असतो यानंतर जेव्हा आपण साठ वर्षांचे पुर्ण होतो
तेव्हापासून आपल्याला दरमहिन्याला १२ हजार रुपये इतके निवृत्तीवेतन दिले जाते.
एल आयसीच्या ह्या सरल पेंशन योजनेचा लाभ ६० वर्षांपासून आयुष्यभर म्हणजे जिवंत असेपर्यंत आपणास घेता येणार आहे.
समजा ह्या पाॅलिसीच्या धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला बेस प्रिमियम देण्यात येत असतो.
फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेणे आवश्यक आहे की ह्या योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेली दरमहा पेंशनची रक्कम आपण किती गुंतवणुक करतो यावर अवलंबून असते.
आपल्या गुंतवणुकीनुसार दरमहा देण्यात येत असलेली पेंशनची रक्कम ठरविली जाते.
एल आयसी सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे –
एल आयसी सरल पेंशन योजनेमध्ये एका वेळची गुंतवणुक केल्यास खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या नोकरदार व्यक्तींना देखील लाईफटाईम पेंशन प्राप्त होईल.
खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या नोकरदार व्यक्तींना निवृत्तीनंतर देखील नियमित उत्पन्न,पेंशन प्राप्त होते.
यामुळे त्यांना निवृतीमध्ये आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.
एल आयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुक केल्यास खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या नोकरदार व्यक्तींचे देखील सरकारी नोकरी करत असलेल्या व्यक्तींप्रमाणे आर्थिक भविष्य सुरक्षित होते.
एल आयसीच्या सरल पेंशन योजनेअंतर्गत पाॅलिसी धारकाला पाॅलिसी सुरू केल्यानंतरच्या सहा महिने इतक्या कालावधी नंतर कधीही कर्ज घेता येते.
म्हणजे ह्या योजनेमध्ये गुंतवणक करणायारयांना कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एल आयसीच्या सरल पेंशन योजनेची किमान गुंतवणुक मर्यादा –
एल आयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये आपल्याला दर वर्षी आपल्याला कमीत कमी बारा हजार रुपये इतकी गुंतवणुक करावी लागते.
यात जास्तीत जास्त किती गुंतवणुक करता येईल याबाबत कुठलीही मर्यादा सांगण्यात आली नाहीये.
एल आयसी सरल पेंशन ही योजना कोणत्या वयोगटातील व्यक्तींना योजना लागू होते?
एल आयसी सरल पेंशन ही योजना ४० ते ८० ह्या वयोगटातील व्यक्तींना लागु होते.
म्हणजे हा प्लॅन ४० ते ८० वर्षे ह्या वयोगटातील व्यक्तींना खरेदी करता येईल.
ह्या प्लॅन मध्ये मासिक पेंशन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक हजार रुपये इतकी पेंशन घ्यावी लागते.
तिमाही पेंशन घ्यायची असल्यास किमान तीन हजार रुपये, सहामाही किमान सहा हजार अणि वार्षिक बारा हजार रुपये इतकी पेंशन आपणास प्राप्त होत असते.
हा प्लॅन आपण आॅफलाईन पद्धतीने एखाद्या एल आयसी एजंटला भेटुन देखील खरेदी करू शकतात
किंवा आॅनलाईन पदधतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खरेदी करू शकतात.