सरकारी योजना

निर्धुर चूल वाटप योजना २०२४ विषयी माहिती Nirdhur Chul Vatap Yojana 2024 

दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या वाढत असलेल्या किंमतीमुळे ग्रामीण भागातील अनेक महिला चुलीवर स्वयंपाक करणे अधिक पसंत करतात. तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्या गरीब कुटुंबांकडे गॅस नाही ते देखील चुलीवरच आपला स्वयंपाक बनवत असतात.चुल फुकत असताना त्यातुन निघत असलेल्या धुरामुळे वायु प्रदुषण होते तसेच चुल फुकत असताना हा धूर महिलांच्या नाकातोंडात गेल्यास त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. याचकरीता महिलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तसेच वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोफत निर्धुर चुल वाटप योजना सुरू केली आहे.

निर्धुर चूल वाटप योजना काय आहे?

ही एक महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे.जिच्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुसूचित जाती जमाती मधील गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चूल वाटप केले जाते.

निर्धुर चूल वाटप योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अनुसुचित जाती जमाती मधील कुटुंबांना निर्धुर चूल उपलब्ध करून देणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील स्त्रियांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी देखील ही निर्धुर चूल वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.

याचसोबत निर्धुर चूल वाटप ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे,वाढती जंगलतोड थांबविण्याचा प्रयत्न करणे,

तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने अशा विविध उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी निर्धुर चूल वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना विषयी माहिती

योजनेचे फायदे तसेच वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

हया योजनेचा आरंभ महाप्रित द्वारे करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही योजना खुप महत्वाची भुमिका पार पाडेल.

निर्धुर चूल वाटप योजनेमुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होईल त्या सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतीलच शिवाय वाढत्या जंगलतोडीला आळा बसण्यास देखील मदत होईल.

योजनेसाठी आॅनलाईन पदधतीने अर्ज सादर करावा लागतो त्यामुळे योजनेसाठी अर्ज करायला आपणास सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची तसेच जास्त धावपळ देखील करण्याची आवश्यकता पडत नाही.याने आपला वेळ आणि पैसा दोघे वाचतात.

योजनेअंतर्गत महिलांना मोफत चुल वाटप केली जाते म्हणजे निर्धुर चूल प्राप्त करण्यासाठी महिलांना कुठलीही रक्कम भरावी लागत नाही.

ह्या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?

लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुसूचित जाती जमाती मधील गरीब कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

निर्धुर चूल वाटप ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील कुटुंबांना कुठलेही शुल्क न आकारता निःशुल्क निर्धुर चूल वाटप करण्यात येते.

योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या चुलीमुळे महिलांना पारंपरिक पद्धतीने जेवण बनवण्याच्या पदधतीपासुन मुक्तता मिळते.

निर्धुर चूल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

लाभार्थीं अनुसूचित जाती जमाती मधील असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभार्थीं महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

निर्धुर चूल वाटप योजनेचे नियम –

ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील गरीब कुटुंबांना देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंब ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती अनुसूचित जाती जमाती मधील असावा.

व्यक्तीकडे एलपीजीचे गॅस कनेक्शन नसावे.

अर्जदाराने जर याआधी निर्धुर चूल वाटप योजनेअंतर्गत मोफत चुल घेतले असेल तर त्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख संपण्याच्या आधी अर्ज करावा.

निर्धुर चूल वाटप योजनेअंतर्गत केलेला अर्ज केव्हा रद्द होईल?

योजनेअंतर्गत केलेला अर्ज पुढील काही परिस्थितीत रद्द केला जाऊ शकतो –

  • अर्जदार व्यक्तीकडे एलपीजीचे गॅस कनेक्शन असल्यास योजनेचा अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार अनुसूचित जाती जमाती मधील नसला तेव्हा देखील त्याचा अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात पुर्ण माहिती दिली नाही, अर्जात स्वताविषयी चुकीची तसेच खोटी माहिती दिली किंवा त्याने एकाच वेळी दोन अर्ज केले तेव्हा देखील त्याचा अर्ज योजनेसाठी रद्द केला जाऊ शकतो.
  • अर्जदाराने याअगोदर निर्धुर चूल वाटप योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा अर्ज रद्द केला जाईल.

निर्धुर चूल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • शपथपत्र
  • ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

यानंतर होम पेज वर दिलेल्या महाप्रित ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल नवीन सुचनांमध्ये clean cooking cookstove distribution ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर एक अर्जाचे नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली माहीती भरून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button