सरकारी योजना

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना विषयी माहिती

महाराष्ट्र राज्यातील नागरीकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकार नेहमी प्रयत्नशील असते.शासनाच्या वतीने नागरीकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. आज आपण शासनाने देशातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे आहे.ही योजना शेतकरी बांधवांसाठी तसेच शेती व्यवसायाला पुरक शेळी पालन मेंढी पालन असे इतर व्यवसाय करत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे.

राजे यशवंतराव होळकर ह्या योजनेअंतर्गत आपणास शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.

यशवंतराव होळकर महामेष योजना काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेतीसोबत शेळीपालन,मेंढी पालन,कोंबडी पालन मत्स्य पालन असे इतरही अनेक शेतीला पुरक जोडव्यवसाय करतात.

पण आज पाहायला गेले तर शेतकरी बांधवांकडील शेळ्या तसेच मेंढयांची संख्या ही दिवसेंदिवस खुपच कमी होत चालली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेळ्या तसेच मेंढयांची ही होणारी घट थांबावी म्हणून राज्य सरकारच्या वतीने नेहमी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.तसेच नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.

यशवंतराव होळकर महामेष ही अशीच एक महत्वाची योजना आहे.यशवंतराव होळकर महामेष योजना २०१७/२०२८ ह्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.

मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व ३५ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.तरूणांना स्वताचा रोजगार मिळावा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

जिव्हाळा कर्ज योजना विषयी माहिती

योजनेअंतर्गत लाभार्थींना दिला जाणारा लाभ –

यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत लाभार्थींना २० मेंढ्या व एक नर मेंढीचे वितरण केले जाते.

ह्या योजनेअंतर्गत शेतकरींना मेंढीपालनासाठी खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी अनुदान देखील दिले जाते.याचसोबत शेतकरींना हिरवा चारा बनविण्यासाठी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.

योजनेअंतर्गत लाभार्थींना मेंढीपालनासाठी ७५ टक्के तसेच मेंढ्यांच्या चारयासाठी ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

यशवंतराव होळकर महामेष योजनेचे महत्व –

शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या महाराष्ट्र राज्यातील तरूणांसाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करू इच्छित व्यक्तींना दिला जाणार आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करावा लागेल.

शेतकरींना पशुपालक यांना घरबसल्या मोबाईलच्या मदतीने देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज केल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती देखील मोबाईल दवारे घरबसल्या जाणुन घेता येईल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत मेंढीपालन व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे.तसेच २० मेंढया एक मेंढा नर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के इतक्या अनुदानावर वाटप केले जाईल.

ह्या योजनेअंतर्गत सुधारीत प्रजातीच्या नर मेंढया ७५ टक्के अनुदानावर वितरीत केल्या जातील.

मेंढीपालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच ७५ टक्के अनुदान दिले जाईल.

मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्याकरिता देखील ह्या योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान दिले जाईल.

कुटटी केलेल्या हिरव्या चारयाचा मुरघास करायला यंत्राची खरेदी करायला देखील ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

ज्यांना पशुखाद्य कारखाने उभारायची आहेत अशा व्यक्तींना पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी शासनाच्या वतीने ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत विविध पातळीवर आॅनलाईन पदधतीने अर्जाची छाननी व निवड प्रक्रिया केली जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण महामेष योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.

लाभार्थींचे वय किमान अठरा वर्षे पेक्षा जास्त अणि ६० च्या आत असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे आधार कार्ड बॅक खात्यासोबत लिंक असायला हवे.

ज्या लाभ धारकांना योजनेअंतर्गत लाभ प्राप्त झाला आहे परंतु त्यांची निवड झाली आहे अणि लाभ मिळणे बाकी आहे असे लाभार्थीं योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

स्थायी पद्धतीने मेंढीपालन करत असलेल्या लाभार्थींकडे स्वताची जमीन असावी.

अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबामधील कुठलीही व्यक्ती शासकीय निमशासकीय संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा नसावा तसेच तो केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेचा सभासद पदाधिकारी लोकप्रतिनिधी देखील नसावा.

योजनेसाठी फक्त आॅनलाईन पदधतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कुठल्याही अन्य मार्गाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला आपणास mahamesh.co.in. ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • वयाचा दाखला
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीत सहहिस्सेदार असेल तर त्याचे ना हरकत प्रमाणपत्र
  • पशुपालन प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • ईमेल आयडी मोबाईल नंबर

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button