व्यवसायसामाजिक

दिवाळी मध्ये भरपुर कमाई करता येईल असे उद्योग व्यवसाय diwali business ideas in Marathi

आज आपण काही अशा उद्योग व्यवसायांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत. जे आपल्याला दिवाळीच्या सीझनमध्ये चांगली कमाई करून देऊ शकतात.

फक्त ह्या व्यवसायांमध्ये आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. आपण ज्या व्यवसायांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत त्या उद्योग व्यवसायात आतापर्यंत कित्येक लोकांनी मेहनत घेऊन दिवाळीच्या सीझनमध्ये भरपुर कमाई केली आहे.

१) दिवाळीचे फराळ तसेच फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीचा व्यवसाय –

  • दिवाळी म्हटले की शहर तसेच गावात आपल्या प्रत्येकाच्याच घरात सण उत्सवात घरी येणारया पाहुण्यांसाठी फराळ तयार केले जाते.
  • काही घरांमध्ये महिला वर्ग स्वता दिवाळीचे फराळ बनवत असतात. तर काही ठिकाणी महिला आचारीकडुन दिवाळीचे सर्व फराळ बनवून घेत असतात.
  • शहरी भागातील महिला नोकरी करत असल्याने त्यांना रोज सकाळी आॅफिस, कंपनीत जाऊन दिवसभर काम करावे लागते.
  • त्यामुळे त्यांना दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसतो अशा नोकरदार महिला बाहेरून रेडीमेड तयार करण्यात आलेले दिवाळीचे फराळ बाहेरून दुकानातुन मागवत असतात.
  • अशा महिलांना आपण स्वादिष्ट दिवाळीचा फराळ बनवून देण्याचे काम करू शकतात. ज्यात लाडु, चकली, चिवडा, शंकरपाळे, शेव, अनारसे इत्यादीं दिवाळीच्या फराळाचा समावेश असतो.
  • आज दिवाळीमध्ये जागोजागी रस्त्यांवर नाक्यांवर आपल्याला दिवाळीचे फराळ विकण्यासाठी लावण्यात आलेले स्टाॅल पाहायला मिळतात. ह्या स्टाॅलवर आपणास दिवाळीतील सर्व फराळ विक्रीसाठी ठेवलेले दिसुन येईल.
  • आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा देखील वापर करू शकतात.

२) दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ –

  • आपण दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ जसे की अनारसे पीठ, करंजीसाठी लागणारे सारण इत्यादीं दिवाळीचे सामान बनविण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या अन्न पदार्थांची विक्री देखील करू शकतो.
  • चकलीचे पीठ, अनारसे पीठ, करंजी सारण तयार करण्यासाठी खुप वेळ लागतो अणि यात खुप झंझट असते म्हणून बर्याच महिला हे पीठ रेडीमेड आणायला अधिक पसंती देतात.
  • अशा परिस्थितीत जर आपण महिलांची ही मागणी पूर्ण केली तर आपण दिवाळीमध्ये चांगली कमाई करू शकतात.
  • दिवाळीच्या सीझनमध्ये दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी लागत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे पीठ आपल्याकडे उपलब्ध आहे हे सांगण्यासाठी आपल्याला घरोघरी जाण्याची देखील आवश्यकता नाही.
  • आपण आपल्या व्हाटस अप स्टेटस वर देखील आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करू शकतात. खाण्याच्या पदार्थांमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त प्राॅफिट मार्जिन प्राप्त होत असतो.

३) घरच्या घरी गिफ्ट बाॅक्स तयार करून विकणे –

  • आपण दिवाळीमध्ये घरच्या घरी गिफ्ट बाॅक्स तयार करून विकु शकतो. ज्यात दिवाळीचे शुभेच्छा देणारे ग्रिटींग कार्ड, नक्षीदार पणत्या असतील.
  • यासर्व सेटची पुर्ण किंमत काढली तर ग्रिटींग कार्ड ५० रूपये मध्ये येते होलसेल मध्ये पाच नक्षीदार पणत्या खरेदी केल्या तर आपल्याला हे २० रूपयाला एक मिळेल. असे एकुण शंभर रुपये. यात गणपतीची मूर्ती असल्यास त्याचे १५० रूपये असे एकुण ३०० रूपये होतात.
  • अॅमेझाॅन वर पाहायला गेले तर हाच सेट ५८९ रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवला जातो. याचठिकाणी हे गिफ्ट बाॅक्स आपण अजून आकर्षित बनवले तर आपल्याला याची किंमत हजार ते बाराशे पर्यंत ठेवता येईल.
  • अशा पद्धतीने दिवाळीच्या सीझनमध्ये आपण आपल्या अंगी असलेल्या कला कौशल्याचा वापर करून आकर्षक अणि सुंदर गिफ्ट बाॅक्स तयार करू शकतो.

४) ड्राय फ्रूट बाॅक्स तयार करणे-

  • आपण घरच्या घरी ड्राय फ्रूटचे बाॅक्स बनवण्याचे काम करू शकतात. आज बर्याच कंपन्या आपल्या कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला ड्राय फ्रूटचे बाॅक्स दिवाळीमध्ये भेट म्हणून देत असतात.
  • आपण होलसेल मध्ये ड्राय फ्रूटचे बाॅक्स आणायचे आणि त्यात थोड्या प्रमाणात काजु, बदाम, मनुके,असे ड्राय फ्रूट आकर्षक रीत्या ठेवायचे आहेत.
  • यात आपल्याला उत्पादन खर्च थोडा जास्त लागु शकतो पण नफा देखील चांगला प्राप्त होईल.
  • एल आयसी एजंट, सीए, किराणा दुकानवाले,दागिण्याचे दुकानदार यांना दरवर्षी दिवाळी मध्ये आपल्या रोजच्या ग्राहकांना असे गिफ्ट द्यावे लागते.
  • म्हणुन आपण अशा उद्योग व्यवसायिकांशी संपर्क साधत त्यांच्याकडुन मोठी आॅडर घेऊ शकतो. किंवा आपण आपल्या शहर परिसरातील दुकानदारांना हे गिफ्ट बाॅक्स कमिशन बेसेसवर विकू शकतात.

५) डेकोरेशनचे साहित्य लायटिंग –

  • दिवाळीच्या काही दिवस आधी आपण प्रत्येक जण आपल्या घराची साफसफाई करत असतो. कोणी घराला नवीन रंग देते साफसफाई करून झाल्यावर आपण प्रत्येक जण दिवाळी मध्ये आपल्या घराची सजावट करत असतो.
  • दिवाळी मध्ये आपल्या घराची साजसजावट करण्यासाठी आपल्याला लायटिंग अणि डेकोरेशनचे साहित्य लागत असते.
  • आपण दिवाळीच्या सीझनमध्ये लोकांची ही गरज पूर्ण करून चांगली कमाई करू शकतात. आपण आपल्या आजुबाजुच्या परिसरातील लोकांना लायटिंग अणि डेकोरेशनचे साहित्य विकुन चांगली कमाई करू शकतो.
  • होलसेल मार्केट मध्ये आपल्याला लायटिंग अणि डेकोरेशनचे साहित्य खुप कमी दरामध्ये उपलब्ध होते. म्हणजे समजा डेकोरेशनचे एक स्टिकर आपल्याला पाच रूपयात मिळत असेल तर ते आपण २० ते ३० रूपयांत कस्टमरला विकु शकतो.
  • थोडक्यात सांगायचे म्हटले तर लायटिंग अणि डेकोरेशनचे साहित्य मध्ये आपल्याला चांगला मार्जिन प्राप्त होतो. त्यामुळे दिवाळीच्या सीझनमध्ये फक्त दहा ते पंधरा दिवसात आपण खूप चांगला नफा प्राप्त करू शकतो.

६) दिवाळीत पणत्या मुर्त्या विकणे –

  • दिवाळी मध्ये आपण पणत्या देवी लक्ष्मीच्या मुर्ती गणपतीची मूर्ती रांगोळी इत्यादीं वस्तु विकुन चांगली कमाई करू शकतो.
  • दिवाळी मध्ये घरासमोर लावण्यासाठी प्रत्येकाला पणत्या हव्या असतात आपण जर दिवाळी मध्ये पणत्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर काही दिवसात चांगली कमाई करू शकतात.
  • आपण ह्या दिवाळीच्या होलसेल मधून खरेदी करून त्याचा स्टाॅल लावून चांगली कमाई करू शकतो.

७) फुलांचा व्यवसाय –

  • दिवाळी ह्या सणामध्ये आपल्याला रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने देवी देवतांची पुजा करण्यासाठी फुलांची आवश्यकता भासत असते.
  • म्हणुन दिवाळी मध्ये आपण फुलांचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकतात.आपण आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील सोसायटीतील लोकांना फुले पुरविण्याचा व्यवसाय करू शकतो.

८) पुजेचे साहित्य आकाशकंदीलचा व्यवसाय –

  • आपण दिवाळीच्या सीझनमध्ये पुजेसाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची विक्री करू शकतात.याचसोबत दिवाळीत घराच्या समोर, घराच्या वर लावण्यासाठी आकाशकंदील लाईटमाळ देखील विकु शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button