व्यवसाय

फुड ट्रक व्यवसाय कसा सुरु करायचा ? how to start food truck business in Marathi

आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस माॅडेल उपलब्ध आहेत ज्यातील एक बिझनेस मॉडेल आहे फुड ट्रक.

  • फुड ट्रक हे एक प्रकारचे चालते फिरते रेस्टाॅरंट असे देखील आपण याला म्हणू शकतो. हया चालत्या फिरत्या ट्रकमधील खाण्या पिण्याचा कुठलाही पदार्थ आपण खाऊ शकतो.
  • जागोजागी ह्या व्यवसायात दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसुन येत आहे. आज शहरी भागात आपल्याला रस्त्याच्या पलिकडे तसेच नाक्यावर फुड ट्रक उभा असलेला दिसतो.
  • फुड ट्रकचा मुख्य फायदा हा असतो की यात आपण खाण्यापिण्याच्या वस्तू अन्न पदार्थ एका जागेवरून दुसरया जागेवर नेऊ शकतो.
  • फुड ट्रक मध्ये कस्टमरसाठी ट्रकमध्ये स्वयंपाक बनवला जातो अणि ग्राहकांना तो खाऊ घातला जातो. यात स्वयंपाक बनविण्यासाठी लागणारी सर्व साधन सामग्री उपलब्ध असते.
  • फुड ट्रक मध्ये आपण लोकांना समोसा, सॅडविच, कचोरी, वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड तसेच व्यंजन इत्यादी बनवून खाऊ घालू शकता.

फुट ट्रकचा व्यवसाय कसा सुरु करायचा ?

ट्रक खरेदी करणे –

  • फुड ट्रकचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ट्रक खरेदी करावा लागेल. एखादी अशी गाडी खरेदी करावी लागेल ज्यात स्वयंपाक बनवून आपण लोकांना खाऊ घालू शकतो.
  • समजा आपल्याकडे नवीन ट्रक तसेच गाडी खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर आपण सेकंड हॅड ट्रक देखील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खरेदी करू शकतात.
  • ह्या सेकंड हॅड ट्रकमध्ये आपण सर्व खाण्याचे पदार्थ ठेवू शकतात.

किचनमध्ये स्वयंपाक बनवताना वापरले जाणारे सर्व साहित्य ट्रकमध्ये ठेवणे –

  • किचनमध्ये स्वयंपाक बनवताना आपल्याला जी काही साधन सामग्री लागत असते. ती सर्व साधन सामग्री आपल्याला ह्या फुड ट्रकमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
  • उद – कढाई, भगोने, जेवण बनवण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे भांडे, इत्यादी.
  • थोडक्यात सांगायचे म्हटले तर स्वयंपाक बनवत असताना आपल्याला जे काही भांडे वगैरे लागत असतात ते सर्व आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खरेदी करणे आवश्यक आहे.

फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कच्चा मालाची आवश्यकता आहे ?

फुड ट्रकचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे काही कच्च्या मालाची आवश्यकता असते –

  1. पीठ
  2. मैदा
  3. दुध
  4. पनीर
  5. वेगवेगळ्या प्रकारच्या वेज, नाॅनवेज भाज्या
  6. तांदूळ
  7. गॅस शेगडी
  • याचसोबत आपण कस्टमरला जेवण वाढण्यासाठी लागणारे भांडे प्लेट्स तसेच पाने देखील खरेदी करणे आवश्यक आहे.
  • उरलेले अन्नपदार्थ कचरा, कचरा टाकण्यासाठी एक डस्टबिन ठेवायला हवे. आपल्याकडे खाण्यासाठी आलेल्या कस्टमरला व्यवस्थित बसुन जेवणाचा आनंद घेता यावा म्हणून आपण टेबल खुर्च्या देखील ठेवायला हव्या.
  • आपल्या कस्टमरला उन्हातान्हात छत्रीच्या सावलीत बसुन जेवणाचा आनंद उपभोगता यावा यासाठी आपण एक छत्री देखील खरेदी करू शकतात.

फुड ट्रक व्यवसायात किचनमध्ये लागणारे इतर साहित्य –

  1. मायक्रो वेव्ह
  2. ज्युसर मिक्सर
  3. फ्रीज
  4. स्टीमर
  5. दोन बर्नर
  6. इन्व्हर्टर

फुड ट्रक व्यवसायासाठी लागणारा स्टाफ –

  • फुड ट्रकचा व्यवसाय आपण एकट्याने सांभाळु शकत नाही कारण ह्या व्यवसायात आपल्याला सकाळी लवकर उठून जेवण बनवावे लागते. कस्टमरला बसण्यासाठी सर्व व्यवस्था करावी.
  • ट्रक स्वच्छ करावा लागतो ट्रकमध्ये स्वयंपाक बनवायला लागणारे सर्व आवश्यक साहित्य ठेवावे लागते. ही सर्व कामे एकट्याने करायचे म्हटले तर आपल्यावर खूप लोड येऊन जाईल.
  • म्हणुन हा व्यवसाय चालविण्यासाठी आपल्याकडे किमान एक दोन व्यक्तींचा स्टाफ तरी असायलाच हवा. पुढे मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण आपल्या स्टाफसाठी विशिष्ट युनिफॉर्म ठेवू शकतात. याने बाजारात आपला एक ब्रँड तयार होण्यास मदत होईल.
  • फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक शेफ अणि एका हेल्परची आवश्यकता असते.

फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे लायसन-

  • फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या एरिया मधील चीफ फायर अधिकारी कडुन एक एन ओसी प्राप्त करावे लागेल.
  • कारण आपण आपल्या वाहनाच्या ट्रकच्या मध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी सिलेंडरचा वापर करत असतो. ज्याने एखाद्या वेळी आग लागुन मोठी दुर्घटना देखील होऊ शकते.
  • याचसोबत आपल्याला एफ एस एस ए आयचे लायसन्स प्राप्त करावे लागते. आपल्याकडे आपल्या वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की आरसी डीएल इत्यादीं असायला हवीत.
  • ही सर्व कागदपत्रे वाहन चालवताना आपल्याकडे आहे किंवा नाही हे तपासले जाते.

फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी लागत असलेल्या लायसन्सची यादी –

  1. शाॅप अॅण्ड इस्टॅब्लिशमेंट लायसन्स
  2. फायर सेफ्टी सर्टिफिकेट
  3. आरटीओ कडुन प्राप्त झालेले एन ओसी
  4. महानगरपालिका कडुन प्राप्त झालेले एन ओसी
  5. किचन इन्शुरन्स
  6. एफ एस एस आय मोबाईल व्हेंडर लायसन्स

फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक –

  • फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एका ट्रकची वाहनाची आवश्यकता असते. ज्यासाठी आपल्याला तीन चार लाख लागतात.
  • दोन लाख आपल्याला स्वयंपाक बनवायला लागणारे सर्व साहित्य खरेदी करायला लागतील. म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला पुर्णतः ६ लाखापर्यंत खर्च करावा लागेल.

फुड ट्रक व्यवसायात होणारी एकुण कमाई –

फुड ट्रक व्यवसायात आपण दिवसाला हजार रूपयांपर्यतचे अन्नपदार्थ बनवून दिवसाला दोन तीन हजारापर्यत कमाई करू शकतो.

फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी बिझनेस प्लॅन –

  • फुड ट्रकचा व्यवसाय सुरू करताना आपण आधी हे बघायला हवे की आपण लोकांना आपल्या फुड ट्रक दवारे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तु अन्नपदार्थ खाऊ घालणार आहे. कोणकोणते अन्नपदार्थ आपण आपल्या फूड ट्रक मेन्यु मध्ये कस्टमरसाठी बनवणार आहे.
  • आपण कोणकोणते अन्नपदार्थ आपल्या कस्टमरला खाण्यासाठी वाढणार आहे.मग आपण निवडलेल्या मेन्यु प्रमाणे आपल्याला फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी एक योग्य लोकेशन निवडावी लागेल.
  • समजा आपल्याला इटालियन, काॅटिनेंटल मेन्यु ठेवायचा आहे तर त्या मेन्युनुसार आपल्याला एक योग्य लोकेशन निवडावी लागेल.
  • अणि समजा आपण फुड ट्रक मध्ये इडली, सांबार, ढोसा असे पदार्थ ठेवले तर हे पदार्थ शहरातील कुठल्या लोकेशनला जास्तीत जास्त विकले जातील आपल्याला हे आधी बघावे लागेल.मग त्यानुसार लोकेशनची निवड करावी लागेल.
  • आपल्या कोणत्या कमर्शियल वाहनाची निवड करायची आहे हे आपल्या फूड ट्रक मधील मेन्यु तसेच त्याच्या साईजवर अवलंबून असते.
  • जर आपल्याला आपल्या फुड ट्रकचा मेन्यु माहीती असेल तर त्यानुसार आपण आपल्या किचनची रचनेत सुधारणा घडवून आणु शकतो.
  • आपल्या फुड ट्रक मध्ये कोणकोणते खाण्या पिण्याचे अन्नपदार्थ कस्टमरला बनवून मिळतील हे आपण आपल्या वाहनावर द्यायला हवे. याने कस्टमरला आपल्या फुड ट्रक मध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळणार आहे हे समजण्यास मदत होईल.
  • आपण आपल्या फुड ट्रक व्यवसायात कस्टमरला कॅश सोबत डिजीटल पदधतीने पेमेंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी लागेल. म्हणजे ज्या कस्टमरकडे कॅश नाहीये त्याला युपीआय क्यु आर कोड द्वारे आॅनलाईन पदधतीने पेमेंट करता येईल.
  • आपल्या फुड ट्रक व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जर आपल्याला होम डिलिव्हरीची सुविधा कस्टमरला उपलब्ध करून द्यायची असेल तर यासाठी आपल्याला अतिरिक्त डिलिव्हरी बॉय हायर करावे लागणार आहे.
  • अणि जेवढेही स्टाफ आपण हायर केला आहे त्यांना आपल्या कामाची प्राॅपर ट्रेनिंग देखील द्यावी लागेल.
  • फुड ट्रक व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या कस्टमर मध्ये वाढ व्हावी म्हणून आपल्याला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग देखील करावी लागते.

फुड ट्रक व्यवसाय सुरू करताना कोणकोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे ?

  • आपण ज्या लोकेशनवर आपला फुड ट्रकचा व्यवसाय सुरू करतो आहे. त्या लोकेशनवर आपण जो मेन्यु कस्टमरला उपलब्ध करून देणार आहे. तोच मेन्यु तिथे कोणीही देत नसावे.
  • आपण आपल्या फुड ट्रकचा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू करायला हवा जिथे नियमितपणे लोकांची रहदारी सुरू असते.
  • आपण जिथे फुड ट्रकचा व्यवसाय सुरू केला आहे त्या परिसरात काॅर्पारेट हाऊस, स्कुल काॅलेज शासकीय कार्यालय असणे आवश्यक आहे. याने आपला फुड ट्रकचा व्यवसाय अधिक वेगाने चालण्यास मदत होईल.
  • फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी जुने वाहन खरेदी करताना आपण त्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट चेक करून घ्यायचे आहे. त्याचे आरसी बरोबर आहे किंवा नाही हे चेक करायला हवे.
  • त्या वाहनाचे रोड टॅक्स पावती आहे किंवा नाही त्याचा इन्शुरन्स काढला आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचे आहे.
  • जे सेकंड हॅड वाहन आपण फुड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी खरेदी करता आहे त्याची आयु दहा वर्षांपेक्षा कमी असायला हवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button