सरकारी योजना

Free Flour Mill Scheme मोफत पीठाची गिरणी योजना विषयी माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा देशातील महिला उद्योजकांचे प्रमाण वाढावे यासाठी आपले महाराष्ट्र सरकार नेहमी नवनवीन योजना राबवित असते. आज आपण अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत जिचे नाव मोफत पीठाची गिरणी Free Flour Mill Scheme असे आहे.

ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येते.

मोफत पीठाची गिरणी योजना काय आहे?

मोफत पिठाची गिरणी ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे ह्या योजनेअंतर्गत ज्या महिलांना स्वताचा पिठाची गिरणीचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना शंभर टक्के अनुदानात पिठाची गिरणी वितरीत केली जाते.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत –

ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास साहाय्य प्राप्त होईल.

योजनेमुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलांना नव्वद टक्के अनुदानावर पीठ गिरणी दिली जाते.

ह्या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी प्राप्त झाल्याने महिलांना स्वताचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू करता येईल.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

महिलांना घरबसल्या स्वताचा रोजगार उपलब्ध झाल्याने नोकरीसाठी उन्हातान्हात भटकण्याची आवश्यकता पडणार नाही.

मोफत शिलाई मशीन योजना २०२४ विषयी माहिती Free Silai Machine Scheme Information in Marathi

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? Free Flour Mill Scheme 

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील स्वताचा पीठ गिरणी व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या स्त्रियांना दिला जाईल.

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

ह्या योजनेचा मुख्य हेतु महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

महिलांना स्वताच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवणे

तसेच महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ घडवून आणने हा मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा मुख्य हेतु आहे.

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

ही योजना महाराष्ट्र राज्यातील स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या अनुसुचित जाती जमाती मधील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

मोफत पिठाची गिरणी ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत ह्या योजनेअंतर्गत अनुदान दिले जात आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत स्वताचा पीठ गिरणी व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या महिलांना शंभर टक्के अनुदानावर पीठ गिरणी दिली जाते.

गिरणीच्या कोटेशन बिलावर नव्वद टक्के पर्यंत अनुदान देखील देण्यात येते.फक्त उर्वरित दहा टक्के इतकी रक्कम लाभार्थीं महिलेला स्वताच्या खिशातुन भरावी लागते.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.

फक्त अनुसूचित जाती जमाती मधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गरीब महिलांना दिला जाणार आहे.

अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न १.२० लाखापेक्षा जास्त असु नये.

ह्या योजनेसाठी १८ ते ६० ह्या वयोगटातील महिलांना अर्ज करता येईल.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज
  • महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचा रहिवासी दाखला
  • महिलेचा जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • पीठ गिरणी कोटेशन तसेच बील
  • लाईटबील
  • अर्जदार महिलेचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दाखला
  • बॅक खाते पासबुक
  • ईमेल आयडी मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज दोन फोटो

Free Flour Mill योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

सर्वप्रथम महिलेने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयातील महिला बालकल्याण विकास विभागात जाऊन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.

अणि अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून त्याला सांगितलेले कागदपत्र जोडून अर्ज बालकल्याण विकास विभागात जमा करून द्यायचा आहे.

यानंतर आपण केलेला अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालय महिला बालकल्याण विकास विभागाकडे पाठविण्यात येईल.

मग विभाग अधिकारी आपल्या अर्जाची छाननी करतील आपल्या कागदपत्रांची पडताळणी करतील मग सर्व चौकशी करून झाल्यावर सर्व काही व्यवस्थित असल्यास पात्र महिला लाभार्थींची निवड केली जाईल.

योजनेसाठी निवड झाल्यानंतर आपणास संदेश पाठवला जातो.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button