सरकारी योजना

मोफत शिलाई मशीन योजना २०२४ विषयी माहिती Free Silai Machine Scheme Information in Marathi

मोफत शिलाई मशीन Free Silai Machine ह्या योजनेअंतर्गत ज्या स्त्रिया आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशिनचे वितरण करण्यात येते.

जेणेकरून त्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या लोकांचे कपडे शिवून शिवणकामाचा व्यवसाय करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल.

ह्या योजनेमुळे महिलांना रोजगाराचे साधन प्राप्त होईल आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा सांभाळ करता येईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात अधिक भर पडण्यास मदत प्राप्त होईल.

ही योजना महिला व बालकल्याण विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येते. हया योजनेची सुरुवात पीएम मोदी यांनी २०१९ मध्ये केली होती.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना विषयी माहिती

मोफत शिलाई मशीन ह्या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व गरीब महिलांना दिला जातो.हया योजनेअंतर्गत गरजु गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाते.

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

मोफत शिलाई मशीन ह्या योजनेअंतर्गत लाभार्थीं महिलांना मोफत शिलाई मशिनचे वितरण करण्यात येते.

योजनेचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत?

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वितरीत करून घरबसल्या रोजगार प्राप्त करून देणे.

महिलांना स्वताच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना आत्मनिर्भर तसेच सक्षम बनवणे.तसेच त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने.

महिलांच्या मासिक उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांना आपल्या परिवाराच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी कोणावरही विसंबून राहण्याची तसेच आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणाकडुनही कर्ज किंवा उसणे पैसे घेण्याची आवश्यकता भासु नये.

योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

मोफत शिलाई मशीन ही योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली आहे.

ही योजना देशातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातील पन्नास हजार पेक्षा जास्त महिलांना दिला जाणार आहे.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना जास्त धावपळ देखील करावी लागत नाही कारण ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया खुप सुलभ आणि सोप्पी आहे.

Free Silai Machine योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे?

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला नगरपालिका जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागात जावे लागेल.आणि तिथून मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

यानंतर अर्जदाराने अर्जामधील विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.तिथे सांगितलेली कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायची आहेत.आणि भरलेला अर्ज महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन जमा करायचा आहे.

अर्ज जमा केल्यावर त्याची एक पोचपावती देखील जवळ घ्यायची आहे.

मग संबंधित अधिकारी आपल्या अर्जाची अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करतील आणि मग आपण योजनेसाठी पात्र ठरत असल्यास आपल्याला मोफत शिलाई मशिन देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास पुढील महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतील-

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्न दाखला (योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न १.२ लाखापेक्षा जास्त असु नये)
  • जन्म दाखला(शाळेचा दाखला किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र)
  • महिला अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेकडे ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • रेशनकार्ड
  • जातीचा दाखला
  • शिलाई मशीन चालवण्याचे सर्टिफिकेट
  • मोबाईल नंबर,दोन पासपोर्ट साईज फोटो

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेले नियम अटी

ही अर्जदार महिला २० ते ४० वयोगटातील असणे आवश्यक आहे.

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.

महिलेचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखापेक्षा जास्त नसावे.

अर्जदार महिलेने केंद्र तसेच राज्य सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीनचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

महिलेच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नसावे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button