सरकारी योजना

पीएम श्री योजना सरकारी शाळा़ंचा विकास Pm Shree School Scheme Information in Marathi

पीएम श्री शाळा योजना भारत सरकारने देशातील सरकारी शाळा़ंचा विकास घडवून आणण्यासाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

श्री शाळा ह्या योजनेअंतर्गत भारतातील १४ हजार ५०० शाळा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.पीएम श्री ह्या योजनेअंतर्गत देशातील १४ हजार ५०० शाळांना अपग्रेड करण्यात येणार आहे.

पीएम श्री शाळा ह्या योजनेचे पुर्ण नाव प्रधानमंत्री स्कुल फाॅर रायझिंग इंडिया योजना असे आहे.ही योजना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे.

ह्या योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये केली होती.देशातील जुन्या शाळांना अपग्रेड करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.

पीएम श्री शाळा योजना काय आहे?

ही केंद्र सरकारची योजना आहे जिच्याअंतर्गत देशातील १४ हजार ५०० शाळांना अपग्रेड करण्यात येणार आहे.

पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या शाळांना अपग्रेड करण्यासाठी २७ हजार ३६० रूपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.

ह्या सर्व शाळांमध्ये कंप्यूटर लॅब,ग्रंथालय, खेळण्याचे मैदान, स्मार्ट वर्ग वसतिगृह,उपाहारगृह,स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी, वीज, इंटरनेट इत्यादी आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे.

याचसोबत ह्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.

म्हणजे पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास,बहुआयामी शिक्षण आणि वैयक्तिक विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शिक्षण देण्यात येते.

पीएम श्री शाळा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

देशातील १४ हजार ५०० शाळांना अपग्रेड करणे हे पीएम श्री शाळा ह्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पीएम श्री शाळा योजनेचे महत्व काय आहे?

ह्या योजनेच्या मार्फत देशातील शाळांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

देशातील शाळांमध्ये अद्यावत तंत्रज्ञान आणि शिकवण्याच्या पद्धती उपलब्ध करून दिल्या जातील.सरकारच्या ह्या योजनेमुळे मुलांचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल तसेच मुलांचे चांगले भविष्य निर्माण होण्यास मदत होईल.

योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?

ह्या योजनेचा लाभ चिन्हांकित करण्यात आलेल्या देशातील १४ हजार ५०० शाळा अणि त्या शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दिला जाईल.

पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत जवळपास १८ लाख विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त होणार आहे.

पीएम श्री शाळा योजनेची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?

ह्या योजनेची आॅफिशिअल वेबसाईट Dsel.education.gov.in/pm Shree school ही आहे.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

पीएम श्री शाळा योजनेमुळे देशातील शिक्षणाच्या स्तरात सुधारणा घडुन येईल.

ह्या योजनेमुळे सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करता येईल.तसेच शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी चांगले वातावरण ह्या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल.

पीएम श्री योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

ही केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शैक्षणिक योजना आहे.

पीएम श्री योजनेअंतर्गत देशातील १४ हजार ५०० सरकारी शाळांना अपग्रेड करण्यात येणार आहे.

भारतातील शिक्षणाच्या स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अर्ज करत असलेली शाळा प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावरील असावी.

ह्या योजनेचा लाभ फक्त देशातील सरकारी शाळांना दिला जाणार आहे.

सदर शाळेत शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

लाभार्थी शाळा ग्रामीण तसेच अर्धशहरी क्षेत्रातील असणे आवश्यक आहे.

लाभार्थी शाळेकडे पुरेशी जमीन देखील असावी तसेच शाळेची इमारत चांगल्या स्थितीत असायला हवी.

शाळेमध्ये शौचालय,पिण्याचे पाणी,वीज इत्यादी आधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • शाळेचा जमिनीचे प्रमाणपत्र
  • शाळेच्या इमारतीचे प्रमाणपत्र
  • शाळेतील विद्यार्थ्यांच्या एकुण संख्या असलेले प्रमाणपत्र
  • शाळेतील पायाभूत सुविधांचे प्रमाणपत्र
  • शाळेचे नाव पत्ता फोन नंबर ईमेल आयडी

पीएम श्री शाळा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला आपणास pm Shri school.education.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

अर्ज केल्यानंतर सरकारी अधिकारी निरीक्षण करतील अणि कोणत्या शाळांमध्ये आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे हे ठरवण्यासाठी तपासणी करतात.

मग तपासणी झाल्यानंतर एक अहवाल तयार करण्यात येत असतो ज्यात प्रत्येक गटातील प्रत्येकी दोन शाळांची निवड केली जाते.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button