सरकारी योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना विषयी माहिती Pradhan Mantri Vay Vandana Scheme Information in Marathi

प्रधानमंत्री वय वंदना योजना शासनाने फक्त देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली गुंतवणूक योजना आहे.भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आयसीने ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. आपल्या समाजात अनेक असे व्यक्ती आहेत जे आपल्या निवृत्तीची योजना आधीपासूनच आखुन ठेवत असतात. जेणेकरून त्यांचे म्हतारपण आरामात जाईल.अणि म्हतारपणात त्यांना कुठलीही आर्थिक समस्या देखील उद्भवणार नाही.

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या निवृत्तीनंतरची रक्कम अशा स्कीम मध्ये गुंतवण्यास अधिक प्राधान्य देत असतात

जिथे त्यांचे पैसे अधिक सुरक्षित राहतील.अणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगले रिटर्न्स देखील प्राप्त होतील.

आज आपण एका अशा योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यात गुंतवणुक केल्यावर ज्येष्ठ नागरिकांचे पैसे तर सुरक्षित राहतातच शिवाय त्यांना ह्या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर चांगले रिटर्न्स देखील प्राप्त होतात.अणि ह्या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेंशन प्राप्त होते. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या ह्या गुंतवणुक योजनेचे नाव प्रधानमंत्री वयवंदना योजना असे आहे.

अटल पेंशन योजना विषयी माहिती 

प्रधानमंत्री वयवंदना योजना काय आहे?

प्रधानमंत्री वय वंदना योजना 2024 (PMVVY): ब्याज दर, मेच्योरिटी बेनिफिट,  आवेदन प्रक्रिया की पूरी जानकारी

ही योजना शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक निवृत्ती तसेच निवृत्ती वेतन योजना आहे.

प्रधानमंत्री वयवंदना योजना ही भारत सरकादवारे सुनिश्चित करण्यात आलेली अनुदानित गुंतवणुक योजना आहे.गुंतवणुकदार ही योजना आॅफलाईन किंवा आॅनलाईन पदधतीने खरेदी करून घेऊ शकतात. प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम ही खरेदी किंमत म्हणून ओळखली जाते.हया योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना खात्रीशीर परतावा देखील मिळतो. ज्येष्ठ नागरिक हा परतावा मासिक, त्रैमासिक,अर्धवार्षिक वार्षिक म्हणून देखील घेऊ शकतात.

म्हणजे ज्यांना ह्या योजनेतुन दरमहा निवृत्ती वेतन हवे आहे ते दरमहा घेऊ शकतात ज्यांना त्रिमासिक अर्धवार्षिक किंवा वार्षिक निवृत्ती वेतन हवे आहे ते त्रैमासिक अर्धवार्षिक वार्षिक निवृत्ती वेतन देखील घेऊ शकतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जशापदधतीने पैसे हवे असतील आपण तशापदधतीने ज्येष्ठ नागरीक पैसे काढु शकतात.

पण जेव्हा आपण ह्या योजनेसाठी फॉर्म भरत असतो. तेव्हा आपल्याला हे सुनिश्चित करावे लागते की आपल्याला जे काही निवृत्ती वेतन हवे आहे

ते दरमहा हवे आहे किंवा त्रैमासिक अर्धवार्षिक वार्षिक पद्धतीने हवे आहे.

कारण फॉर्म भरून झाल्यानंतर यात आपल्याला कुठलाही बदल करता येत नाही.

योजनेचे फायदे तसेच वैशिष्ट्य काय आहे?

प्रधानमंत्री वयवंदना योजना ही गुंतवणुकदारांना निश्चित अणि नियमित उत्पन्न प्राप्त करून देणारी सरकारची योजना आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी आपले पैसे सेविंग अकाऊंट मध्ये न ठेवता जर प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये गुंतवले

तर आपल्याला गुंतवलेल्या रक्कमेवर मासिक वेतन तर मिळतेच शिवाय आपली गुंतवणूक केलेली रक्कम ही दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहते.

प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही एकत्रितपणे गुंतवणुक करता येते.

ह्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला ह्या योजनेमध्ये गुंतवणक करता येते.

प्रधानमंत्री वयवंदना ह्या योजनेचा लाभ ६० वय झाल्यानंतर ज्येष्ठ नागरीक घेऊ शकतात ह्या योजनेत फक्त दहा वर्षांसाठी रक्कम गुंतवावी लागते.

हे गुंतवणुक केलेले पैसे आपणास दरमहा तिमाही सहामाही वार्षिक इत्यादी कुठल्याही पद्धतीने निवृत्ती वेतन स्वरूपात मिळु शकतात.

दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ह्या योजनेमध्ये गुंतवणक केलेली रक्कम आपणास व्याजासह परत केली जाते.

प्रधानमंत्री वयवंदना योजनेचा लाभ पती पत्नी एकत्रितपणे तसेच वैयक्तिक रीत्या देखील लाभ घेऊ शकतात.

प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना किती निवृत्ती वेतन प्राप्त होते?

योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना १८ हजार ५०० रूपये इतके मासिक निवृत्ती वेतन प्राप्त होते.

प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघांनी मिळून गुंतवणुक केली तर त्या दोघांना वृदधालपकाळात १८ हजार ५०० रुपये इतके निवृत्ती वेतन प्राप्त होते.

योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा किती आहे?

ह्या योजनेमध्ये पहिले ७.५० लाख इतकी होती पण आता यात वाढ करून ही मर्यादा १५ लाख इतकी करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री वयवंदना योजनेमध्ये मिळणारे व्याजदर –

  1. योजनेमध्ये गुंतवणक केल्यावर ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के इतके व्याज दर प्राप्त होते.
  2. योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जर मासिक पेंशन हवे असेल तर त्यांना ७.४० टक्के इतका व्याजदर दिला जातो.
  3. ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्रैमासिक पेंशन हवी असेल त्यांना ७.४५ टक्के इतका व्याजदर प्राप्त होतो.
  4. पुन्हा ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहा महिन्यांनी पेंशन हवी असेल त्यांना ७.५२ टक्के इतका व्याजदर प्राप्त होतो.
  5. आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक पेंशन हवी आहे त्यांना ७.६३ टक्के इतके व्याज दर प्राप्त होते.

या योजनेअंतर्गत किती पैसे जमा केल्यावर ज्येष्ठ नागरिकांना किती पेंशन प्राप्त होते?

ज्या ज्येष्ठ नागरिकांनी १ लाख ६२ हजार १६२ रूपये एवढी गुंतवणुक केली अशा व्यक्तींना महिन्याला पेंशन घेण्यासाठी ७.४० टक्के व्याजदराने एक हजार रुपये इतके पेंशन प्राप्त होते. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी १ लाख ६१ हजार ७४ रूपये एवढी गुंतवणुक केली अशा व्यक्तींना ७.४५ टक्के इतक्या व्याजदराने त्रैमासिक तीन हजार रुपये इतकी पेंशन प्राप्त होईल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी १ लाख ५९ हजार ५७४ रूपये इतकी गुंतवणुक केली अशा व्यक्तींना ७.५२ ह्या व्याजदराने सहामाही ६ हजार रुपये इतकी पेंशन प्राप्त होते. ज्येष्ठ नागरिक ह्या योजनेत जमा केलेले पैसे योजना सुरू केल्यानंतर दहा वर्षांच्या अगोदर देखील काढु शकतात पण इथे दोन टक्के इतकी रक्कम कपात केली जाते.

ह्या योजनेत आपण आपला वारसदार देखील निवडु शकतात योजनेच्या दहा वर्षांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकाला काही झाले तर त्याचे पैसे त्याच्या वारसदाराला दिले जातात.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button