सरकारी योजना

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना विषयी माहिती Rajmata Jijau Free Cycle scheme 2024

आज पाहावयास गेले तर आपणास दिसून येईल की खेडेगावात आजही येण्या जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीयेत.येथील रस्ते देखील पक्के नाहीयेत. यामुळे ग्रामीण भागातील तरूणांना महाविद्यालयात जाण्यासाकरीता दुर अंतरावर मैलोनमैल पायी चालत जाण्याची वेळ येते.यात विद्यार्थ्यांचा वेळ अणि पैसा दोघे खर्च होतात. त्यातच ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी आपल्या मुलाला सायकल खरेदी करून देता येत नसते. म्हणून ग्रामीण भागातील अशा गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी साधन प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येत आहे.

मोफत सायकल वाटप ही योजना महाराष्ट राज्यातील पुणे समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना काय आहे?

ह्या योजनेअंतर्गत महाविद्यालयापासुन दोन किलोमीटर पेक्षा दुर अंतरावर राहत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत सायकल वाटप केली जाते.

योजना का सुरू करण्यात आली आहे?

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील वास्तव्यास असलेल्या तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान प्राप्त करून देण्यासाठी मोफत सायकल वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहिती Kishori Shakti Yojana Information in Marathi

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना दिला जाईल.

ज्या विद्यार्थ्यांचे घर महाविद्यालयापासुन दोन किलोमीटर पेक्षा दूर अंतरावर आहे अशा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे घर महाविद्यालयापासुन दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर आहे अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत सायकल दिली जाते.

योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच दिला जाईल.

अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असायला हवे अणि त्या बॅकेतील खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवे.

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेसाठी ठेवण्यात आलेले नियम अटी –

योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे घर महाविद्यालयापासुन किमान दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर असावे.

विद्यार्थीचे कुटुंब पुणे मनपा हद्दीत तीन वर्षे पेक्षा अधिक कालावधी पासुन वास्तव्यास असायला हवे.

अर्जदार विद्यार्थ्याला मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेत ५० पेक्षा जास्त गुण असावे.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्राप्त होणारे एकुण वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या अटी तसेच नियम यात बदल करण्याचा किंवा अर्जदाराचा अर्ज अस्वीकार करण्याचा अधिकार मा उप आयुक्त पुणे महानगर पालिका यांच्याकडे असणार आहे.यांचा याबाबतचा घेतलेला निर्णय हा शेवटचा निर्णय असेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशनिंग कार्ड साक्षांकित झेरॉक्स
  • अर्जदाराचे कुटुंब मागील तीन वर्षांपासून पुणे महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून महानगर पालिकेची आयकर पावती/लाईटबील,झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती तसेच भाडे करारनामा यापैकी कोणतेही एक कागदपत्र जोडावे.
  • वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला/शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • अर्जदार मागासवर्गीय आहे हे सिदध करण्यासाठी जातीचा दाखला
  • मागील वर्षीची गुणपत्रिका
  • झोपडपटटीमधील अर्जदार विद्यार्थ्यांने शेजार समूह गटाचा उत्पन्न दाखला जोडणे तसेच झोपडपट्टी व्यतीरीक्त इतर ठिकाणी राहत असलेल्या अर्जदार विद्यार्थीने तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे.
  • अर्जदार विद्यार्थीचे दोन पासपोर्ट साईज फोटो

योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला dbt.pmc.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button