ट्रेंडिंगसामाजिक

Monsoon Update 2023 : पावसाची चाहूल..मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात ‘वरुण राजा’ केव्हा बरसणार ?

Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये दाखल झालेला पाऊस हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र, केरळ (Kerala) , कर्नाटक, तामिळनाडू, गोव्यासह देशातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन सॅटेलाईट फोटोंनुसार, आज सकाळी 10.45 वाजता केरळपासून गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भागापर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून येत आहेत. Monsoon Update 2023

रोजच्या हवामान अंदाजा विषयी माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Weather Forecast : चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे.

मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे की, चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकुल होत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

EVC इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या डीलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा आणि महिन्याला कमवा 1 ते 2 लाख रूपये !

आयएमडीने शनिवारी सांगितलं होतं की, पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील 48 तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस आणखी सरकण्याची शक्यता आहे. Monsoon Update 2023

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता

त्याआधी 13 जून दरम्यान महाराष्ट्रात तर 16 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

Top Business Ideas : फक्त 25000 हजार रुपयांपासून सुरू करा हा व्यवसाय आणि महिन्याला कमवा 50 ते 70 हजार रुपये.

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती.

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईसह उपनगरातही मान्सूपूर्व पाऊस झाला. महाराष्ट्रात नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह इतरही अनेक जिल्ह्यात शनिवारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button