
एकी कडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हा धक्का बसला होता ,पण कोणीतरी पक्षासाठी मुख्यंमत्री दुसऱ्यांदा होण्याच्या स्वप्नावर पाणी सोडून वरीष्ठ् व्यक्तींचा आदेश हाच अंतिम मानून उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य् करून सर्वासमोर एक आदर्श नक्कीच उभा केला.प्रत्येकाला हे पटणार नाही पण मला तर हे शिकायला मिळाले की माणसाने आयूष्यात संय्यम ठेवणे गरजेचे आहे ,आहे त्या पेक्षा नक्कीच तुम्हाला अधिक चांगले मिळेल..असो
त्या दिवशी मावस भावाचा निरोप आला की बकऱ्याचा कार्यक्रम आहे तुला यावे लागेल .लोकांना हे पटतच नाही काही जण मांसाहार करत नसतात..जर तुम्ही नाही म्हंटलात तर त्यांचा परत एक प्रश्न असतोच की खरच तू खात नाही..मला तर कधी कधी वाटत की या लोकांनी अस ठरवलं आहे की सर्वंजणांना मांसाहारी करून आपण शांत बसायचंय..कशाला नाही म्हणायचं म्हणून मी त्याला हो म्हंटले आणि मी बकऱ्याच्या कार्यक्रमाला जायचा निर्णय घेतला .श्री येडेश्वरी देवस्थान ,येरमाळा येथे हा कार्यक्रम होता..तेथे आम्ही सर्वजण पाहोचलो.अधिच मावशीने भाकरी करून आणल्या होत्या .जवळपास ३०-४० च्या आसपास जण आले असतील.मटन , एका झाडाखाली चूल करून मोठया पातीळयामध्ये मटनाची भाजी बनवायला चालू झाले आणि आम्ही तोपर्यंत श्री येडेश्वरी चे दर्शन घेण्यासाठी निघालो.देवस्थान एका डोंगरावरती आहे.देवस्थान येईपर्यंत त्या मंदिराभोवती भाविकांना येण्याजाण्यासाठी उत्त्म पायऱ्यांची सोय केली आहे.त्या पायऱ्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला डोंगराच्या पायथ्या पासून ते शिखरापर्यंत व्यापा-यांनी भक्तांच्या सेवोसाठी प्रत्येक वस्तूंची सोय केली आहे..पूजेला लागणाऱ्या वस्तू पासून ते जेवणापर्यंत तसेच इतर व्यवसाय पण त्या ठिकाणी उभा राहिले आहेत..जवळपास १०० च्या आसपास लोकांच्या हाताला काम मिळाले आहे.त्यांचे अस्तित्व या देवस्थानांमुळे निर्माण झाले आहे. हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येतात..त्यांच्या श्रध्देमूळे रोजगार निर्माण झाले आहेत.
काही जण देवाकडे आपल्या अडचणी घेउन येतात,तर काही जण फक्त् देवाचे दर्शन घ्यायला येतात.तर काही जण मोक्ष मिळावे याच्यासाठी देवाची पुजा करतात,तर काही जणांना निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो.प्रत्येक जण अशा ठिकाणी येणे आणि येथे आर्थिक व्यवहार स्वत:साठी करणे हेच अप्रत्यक्षपणे समाजसेवा होय.या लेखामधून तुम्हाला हेच मला सांगायच आहे की देवावर विश्वास,श्रध्दा ठेवणाऱ्यांची संख्या जेवढी वाढेल ,तेवढया फायदा प्रत्येक घटकाला होईल,आणि आपली अर्थव्यवस्था भरभराटीला येईल. म्हणून नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांची संख्या वाढणे गरजेचे आहे.देव आहे याच्या वर लोकांचा विश्वासा वाढला पाहिजे..तसेही देव आहे की नाही या प्रश्नांचे उत्तर सर्वांना त्यांच्या आयुष्यात एखाद्या टप्प्यात येतेच..तरीही आपले काम हे आहे की घरामध्ये पूजा पाठ करणे,कोणावरती तरी श्रध्दा ठेवणे गरजेचे आहे,आपली संस्कृती जेवढी जपाल तेवढा फायदा आपल्याला होणार आहे.म्हणून धार्मिक होणे हीच खरी समाजसेवा. लेखक राम ढेकणे