ट्रेंडिंग

iPhone 13 Offer : आयफोनवर तब्बल 13 हजारांची घसघशीत सूट, Offers जाण्यापूर्वी जाणून घ्या…iphone13

iPhone 13 Offer : तुमच्याकडे iPhone 13 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आम्ही असं म्हणतोय कारण iPhone 13 वर 12 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट तुम्ही मिळवू शकता. जाणून घेऊया या खास ऑफरबद्दल…

मुंबई : मोबाईल (Mobile) म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव येतं. ते नाव म्हणजे आयफोन. स्मार्टफोन (Smartphone) घ्यायचाय, असं कुणी बोललं की लगेच आयफोनचा आमका फोन घ्या, तो फोन घ्या, असं आयफोनप्रेमी सांगू लागतात. धडाधड यादीच सांगतात. इतका मोठा चाहतावर्ग आहे या आयफोनचा. आयफोन प्रेमींची संख्या कधीच कमी होत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं आणि ते खरं देखील आहे. आयफोन 13 नेहमी सर्वकालीन स्मार्टफोन्सपैकी एक म्हणून गणला जातोय. यामुळेच लोक स्मार्टफोनवर पैसे खर्च करताना आयफोनला प्राधान्य देतात. जर तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे iPhone 13 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आम्ही असं म्हणतोय कारण iPhone वर 12 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट तुम्ही मिळवू शकता. जाणून घेऊया या ऑफरबद्दल…

ऑफलाइन स्टोअरमध्ये स्वस्तात

तुम्ही Imagine Apple Premium Reseller Store वरून iPhone 13 स्वस्तात खरेदी करू शकता. त्याठिकाणी तुम्हाला वर 8 हजार 400 ची थेट सूट मिळणार. जर तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला 4 हजारची अतिरिक्त सूट मिळेल. अशाप्रकारे, तुम्हाला iPhone 13 च्या 128 GB स्टोरेज मॉडेलवर एकूण 12 हजार 400 रुपयांची सूट मिळेल. जर तुमच्याकडे चांगला जुना फोन असेल तर तुम्हाला 19 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 48 हजार 500 रुपये होईल.

आयफोन 13 चे स्पेसिफिकेशन्स

मध्ये 6 कोर CPU सह A15 बायोनिक प्रोसेसर आहे. याशिवाय यात 16 कोअर न्यूरल इंजिन आहे. Apple कधीही रॅम आणि बॅटरीबद्दल अधिकृत माहिती देत ​​नाही. iPhone 13 सह, 512 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल. iPhone 13 मध्ये 1000 nits ब्राइटनेससह 6.1-इंच रेटिना XDR डिस्प्ले आहे.

सूटमध्ये कसा फरक पडणार, जाणून घ्या…

या सर्व सूट पाहता फोनची किंमत 48 हजार 500 रुपये होईल.

iPhone 13 मध्ये 12-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यावेळी एक नवीन वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा अपर्चर f/1.6 आहे. यासह सेन्सर ऑप्टिकल स्थिरीकरणासाठी समर्थन आहे. नाईट मोड पूर्वीपेक्षा चांगला बनवण्यात आला आहे. दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे, ज्यामध्ये ऍपर्चर f/2.4 आहे. फोनसह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button