ट्रेंडिंग

Ladka Bhau Yojana GR : लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू , पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे ?

Ladka Bhau Yojana GR : लाडका भाऊ योजनेचा जीआर आता समोर आला आहे. ज्यामध्ये राज्यातील तरुणांना सरकार नेमके कोणत्या योजनेअंतर्गत पैसे देणार हे त्यात नमूद करण्यात आलं आहे.

Ladka Bhau Yojana: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. ज्याला लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे. याच योजनेचा आता सरकारने जीआर देखील जारी केला आहे. जाणून घ्या त्या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलंय. (gr of ladka bhau yojana has been released see how the youth will get the money exactly maharashtra shinde government)

येथे ऑनलाइन अर्ज करा ……..!

लाडका भाऊ योजनेचा GR जसाच्या तसा Ladka Bhau Yojana GR

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

कोणत्याही कागदपत्राशिवाय 3 मिनिटात 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल,

घरी बसून असे करा अर्ज ……….!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप :

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (CM Youth Work Training Scheme) योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.

नमो किसान योजनेच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा, या यादीतील नाव तपासा,

हे देखील 100% पुराव्यासह.

१) या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.

२) बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.

GOVERNMENT OF MAHARASHTRA

३) लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना/उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या (CM Youth Work Training Scheme) संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेंतर्गत पात्र आस्थापना / उद्योग यांची यादी खालील शासन निर्णयातील प्ररीशिष्ट-अ मध्ये नमूद आहे.

४) शासकीय / निमशासकीय आस्थापना / उद्योग / महामंडळाची सबंधित तालुका /जिल्हा/विभाग/ राज्यस्तरीय कार्यालये या योजनेंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील.

५) रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल.

उमेदवाराची पात्रता :

१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

२) उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.

३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

४) उमेदवाराची आधार नोंदणी असावी.

५) उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.

६) उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button