ट्रेंडिंग

Maharashtra Farmers Loans : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच होणारं या शेतकऱ्यांची कर्जमाफी , पहा सविस्तर वृत…!

Maharashtra Government Scheme : अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केवळ 1,851 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. विरोधकांनी आणि सत्तेत असलेल्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात ठराव मांडला असता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन हेक्टर धानासाठी 15 हजारांऐवजी 20 हजार रुपये अनुदान जाहीर केले. Maharashtra Farmers Loans

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा, बँकांकडून कर्ज ऑफर, व्याजदर आणि पात्रता निकष जाणून घ्या.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पोर्टल सुरू करून 6,500 कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या सरकारने केवळ एक रुपयाचा पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असून पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत १७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पीक विमा योजनेत विक्रमी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य सरकारने यासाठी 5174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हे व्यवसाय सुरू करून महिला बनू शकतात एक यशस्वी उद्योजक , सरकारही करेल मदत !

सध्या 2 हजार 121 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांनी आगाऊ रक्कम म्हणून मंजूर केली आहे. 1217 कोटी रुपयांचे आगाऊ वाटप करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आम्ही धरणावर जाऊन पाहणी करतो, आम्ही घरी बसून फेसबुक लाईव्ह करत नाही, असे ते म्हणाले. Maharashtra Farmers Loans

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत.

आतापर्यंत ९ लाख ७५ हजार ५९ हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटींची मदत द्यायची आहे. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button