ट्रेंडिंगसामाजिक

Maharashtra Monsoon : राज्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस , आयएमडीचे आजचे अपडेट पहा !

Maharashtra Monsoon : राज्यात उशिराने आलेला मान्सून आता स्थिरावला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. आधी बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला रोखून धरले होते. परंतु वादळ शांत होताच आता मान्सूनने चांगलाच वेग पकडला आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून कसा असणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

रोजचे हवामान खात्याचे अपडेट येथुन जाणुन घ्या !

Monsoon and Rain : राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे शहरांत चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. यामुळे या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा चार दिवसांपासून नाही.

काय आहे अलर्ट

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव असणार आहे. काही भागांत मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. यासंदर्भात काही भागांत ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

टाटाच्या ‘या’ देशातील सर्वात सुरक्षित कारसमोर Mahindra XUV700 ही फेल, किंमत फक्त इतकी.

मुंबईत जोरदार, अंधेरी भुयारी मार्ग बंद

मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसानंतर अंधेरी भुयारी मार्ग पुन्हा एकदा काही काळासाठी बंद करण्यात आला. अंधेरी परिसरात सध्या पाऊस कमी झाला आहे. भुयारी मार्गातील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुसळधार पावसानंतर अंधेरी एसव्ही रोडवरही पाणी साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाला उशीर, भाजीपाला कडाडला

राज्यात यंदा मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून उशिराने आला. आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरु आहे. यामुळे भाजीपाला निघत नाही. आवक कमी अन् मागणी जास्त झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. कधी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकावा लागणारा टोमॅटो आता चांगलाच महाग झाला आहे. किरकोळ विक्री दर अनेक ठिकाणी 120 रुपये किलोवर गेला आहे.

आता आधार कार्ड वरुन मिळणार 5 मिनिटात 2 लाखांचे पर्सनल लोन , येथून ऑनलाइन अर्ज करा.

धरणसाठ्यात अद्याप वाढ नाही

पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पात 36 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील धरणांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा पाणी प्रकल्पाने गाठली मृत साठ्याची पातळी गाठली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 43 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. Maharashtra Monsoon

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button