सरकारी योजना

अपंग बस सवलत योजना २०२४ विषयी माहिती

अपंग बस सवलत ह्या योजनेअंतर्गत जे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास आहेत.

अशा कुटुंबामधील अपंग व्यक्तींना किमान एका वर्षाच्या कालावधीकरीता पीएम पीएम एल ह्या बसेसचे पासेस फ्री मध्ये देण्यात येत आहेत.

तसेच अपंग व्यक्तींच्या ह्या पासेसची रक्कम पुणे महानगर पालिकेच्या वतीने पीएम पीएम एल कडे जमा करण्यात येणार आहे.

ही योजना सामाजिक न्याय अणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

अपंग बस सवलत योजना का सुरू करण्यात आली आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश अपंग व्यक्ती असे आहेत ज्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी देखील वेगवेगळया अडीअडचणींना सामोरे जावे लागते.

त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शारीरिक दुर्बलतेमुळे लवकर कोणी काम देखील देत नाही ज्यामुळे त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते.

अपंग व्यक्तींच्या जीवनातील ह्याच सर्व अडीअडचणींना समस्यांना लक्षात घेऊन पुणे महानगर पालिकेने पुणे शहरातील अपंग व्यक्तींना पीएम पीएम एल बसेसचे पासेस मोफत मध्ये देण्याचे ठरवले आहे.

ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट अपंग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा करणे,त्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासु नये तसेच कोणाकडुन उसणे पैसे घेण्याची देखील गरज पडु नये.

यासाठी त्यांना सशक्त,आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक मदत करणे जेणेकरून त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

वृदध कलाकार मानधन योजनेविषयी माहिती

अपंग बस सवलत योजनेचे लाभार्थी कोण असतील?

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांतील अपंग व्यक्ती ह्या योजनेचे मुख्य लाभार्थीं असणार आहेत.

अपंग बस सवलत योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत जे कुटुंब पुणे शहरातील महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास आहे अशा कुटुंबामधील अपंग व्यक्तींना एक वर्षाच्या कालावधीकरीता मोफत बसेसचे पासेस दिले जाणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

अपंग बस सवलत ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व अर्जदारांना आॅफलाईन पद्धतीने महानगर पालिका कार्यालयात जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल.

सर्वप्रथम आपणास महानगर पालिका कार्यालयात जाऊन ह्या सर्व फाॅम घ्यायचा आहे तो व्यवस्थित विचारलेली माहीती भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन मनपा कार्यालयात जमा देखील करायचा आहे.

योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

ह्या मोफत बस पासेस सवलतीची सुरूवात पुणे महानगर पालिका कडुन येथील मनपा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांतील अपंग व्यक्तींसाठी विशेषतः करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत अपंग मोफत बससेवा प्राप्त होईल म्हणजे त्यांना बसने जाण्या येण्यासाठी भाडे द्यावे लागणार नाही कारण त्यांच्याकडे मोफत बस प्रवास करण्यासाठी पास असेल.

ह्या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सरळ अणि सोप्पी आहे.

मोफत बस पासेस सेवा योजनेचा लाभ सर्व अपंग पुरूष तसेच महिला वर्गाला दिला जाईल.

अपंग बस सवलत योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

पुणे शहरातील महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांतील सर्व अपंग व्यक्तींना ह्या योजनेअंतर्गत मोफत पीएम पीएम एल बसेसचे पासेस दिले जाणार आहे.

म्हणजे बसने प्रवास करण्यासाठी त्यांना पैसे भरावे लागणार नाही.

अपंग बस सवलत योजनेचा लाभ सर्व वयोगटातील व्यक्तींना होणार आहे.

अपंग बस सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम तसेच पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील महानगर पालिका क्षेत्रात किमान ३ वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.

फक्त महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांतील अपंग व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे अपंग व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही.

१/५/२००१ नंतर जन्माला आलेल्या तसेच हयात अपत्यांमुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाली असेल तर ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

महाराष्ट्र सरकारने निर्धारित केलेल्या नुसार ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे असायला हवे.

शासनाच्या सुचवलेल्या बदलानुसार योजनेच्या नियम अटींमध्ये बदल करण्यात येईल.

योजनेच्या नियम अटींमध्ये बदल करण्याचा तसेच अर्ज स्वीकार करण्याचा नाकारण्याचा अधिकार मनपा आयुक्त तसेच प्राधिकृत अधिकारीस असणार आहे.

अपंग बस सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • कुटुंब तीन वर्षे पुणे मनपा क्षेत्रात वास्तव्यास असल्याचा दाखला
  • रेशनिंग कार्ड झेरॉक्स
  • तीन वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून मागील तीन वर्षांची मनपा कर पावती, लाईटबील,झोपडी फोटो पास झोपडी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग असल्याचा दाखला
  • अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • पुणे मनपा अपंग स्मार्ट कार्ड जवळ असल्यास त्याची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व वयोगटातील व्यक्तींना वयाचा पुरावा देणे आवश्यक आहे.वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला,मतदान कार्ड, हाॅस्पिटल मधील वयाचा दाखला

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button