दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना विषयी माहिती DDU GKY Scheme Information in Marathi
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने दिनदयाळ ग्रामीण कौशल्य DDU GKY योजना राबविण्यात येत असते.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.
एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना ह्या योजनेअंतर्गत फ्री कोर्स देखील आॅफर केला जातो तसेच प्रशिक्षणादरम्यान मोफत मध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय देखील केली जाते.
अणि पुर्ण प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर प्लेसमेंट म्हणजे जाॅब देखील विद्यार्थ्यांना ह्या योजनेअंतर्गत देण्यात येत असतो.
ग्रामीण भागातील तरूणांना आपल्या योग्यतेनुसार क्षमतेनुसार योग्य तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सुरू करण्यात आली आहे.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक चळवळ आहे.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
देशातील गरीब ग्रामीण भागातील तरूणांना शासनाकडुन कौशल्य प्रदान करून त्या प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारावर रोजगार उपलब्ध करून देणे हे दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अटल पेंशन योजना विषयी माहिती
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना १०२ कोर्सपैकी कुठल्याही एका कोर्सची मोफत ट्रेनिंग दिली जाते.मग तो शिलाई,ब्युटिशियन,नर्सिंग ट्रेनिंग इत्यादी पैकी कुठलाही कोर्स असो.
कोर्स पूर्ण करत असताना ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना शासनाकडून एक गणवेश मोफत मध्ये दिला जातो.हा गणवेश रोज ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना परिधान करणे बंधनकारक आहे.
ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना लागणारे कोर्स मटेरियल जसे की वहया पुस्तके इत्यादी देखील मोफत मध्ये उपलब्ध करून दिले जाते.
विद्यार्थी जो कोर्स करतो आहे त्यासाठी लागणारे सर्व साहित्य संसाधने फ्री मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येते.
ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता दुपारी लंच रात्री डिनर देखील दिले जाते.विदयार्थ्याचा रोजचा सकाळच्या नाश्ता दुपारचे रात्रीचे जेवणाचा मेन्यू काय असेल हे देखील त्यालाच ठरवता येईल
जे विद्यार्थी बाहेरगावाहून आले आहेत अशा विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दरम्यान राहण्यासाठी फ्री होस्टेलची सुविधा देखील दिली जाते.
ट्रेनिग दरम्यान राहण्यासाठी विद्यार्थ्यांना जे रूम दिले जातात ते एकदम सुरक्षित अणि स्वच्छ असतात.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना फ्री कोर्स देखील उपलब्ध करून दिले जातात.
याचसोबत ट्रेनिंग पुर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट म्हणजे जाॅब देखील विद्यार्थ्यांना प्रदान केले जातात.
ट्रेनिंग दरम्यानच विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी करण्यासाठी जाॅबचे आॅफर लेटर देखील दिले जाते.अणि जाॅब करत असताना किमान १२ हजार रुपये इतके मासिक वेतन दिले जाते.
ट्रेनिंग पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने १५ हजार रुपये इतके विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड देखील दिले जाते.
नोकरी करत असताना आपल्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी वेगवेगळे साॅफ्टस्कील टीम वर्क डोमेन स्कील असे जाॅबसाठी लागणारे आवश्यक वेगवेगळे स्कील देखील शिकविले जातात.
१०७ तासांचे इंग्रजी भाषा बोलण्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स संगणकाचा कोर्स देखील फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
योजनेसाठी अर्ज करायला आपणास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://ddugky.gov.in/apply-now वर जायचे आहे.
अणि अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.अणि त्याला फोटो अपलोड करून सबमिट करायचे आहे.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा DDU GKY लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड धारक मनरेगा कामगार देखील पात्र ठरतील.
राष्ट्रीय स्वास्थ विमा अंतर्गत ज्यांचे कार्ड आहे ते देखील इथे अर्ज करू शकतात.
अंत्योदय अन्न योजना एएवाय कार्ड धारक देखील इथे अर्ज करू शकतात.
ज्यांच्याकडे बीपीएल रेशनकार्ड आहे ते इथे अर्ज करू शकतात.
जे बचत गटात आहेत ते देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर ग्रामीण भागातील सर्व तरुण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.