ट्रेंडिंगसरकारी योजना

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन योजना २०२४ विषयी माहिती Free Electric Vehicle Scheme Divyang Apang in Marathi

अपंग तसेच दिव्यांगांसाठी महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठी योजना आणली आहे.हया योजनेचे नाव आहे दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन योजना असे आहे.

ह्या दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन योजनेअंतर्गत जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे मोफत इलेक्ट्रिक वाहन दिले जाणार आहे.

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन हे काय आहे?

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन ही शासनाने दिव्यांग तसेच अपंग व्यक्तींसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे ह्या योजनेअंतर्गत दिव्यांग अपंग व्यक्तींना शासनाकडून मोफत तीन चाकी वाहन दिले जाणार आहे.

ह्या वाहनाचा उपयोग करून दिव्यांग अपंग व्यक्ती आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत.हया योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करायला सुरुवात देखील झाली आहे.

मोफत वाहन योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंग तसेच दिव्यांग व्यक्तींनी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

शासनाने अपंगांसाठी दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेल्या मोफत वाहन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम https://evehicleform.mshfdc.co.in ह्या वेबसाईटवर जाऊन आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचा आहे.

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जदार व्यक्तीकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.याचसोबत त्याचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा अधिक असायला हवे ज्या व्यक्तींंचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा कमी आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.

अर्जदार व्यक्तीकडे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र देखील असचे आवश्यक आहे.

ज्यांचे अपंगत्व जास्त आहे अशा व्यक्तींची ह्या योजनेअंतर्गत विशेष निवड केली जाणार आहे.कारण अशा व्यक्तींना सदर योजनेअंतर्गत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्जदार व्यक्तीकडे दिव्यांगत्वाचे युडीआयडी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

अर्जदार व्यक्तीचे वय दिनांक १/१/२०२४ रोजी १८ ते ५५ ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत मतिमंद व्यक्तींचे कायदेशीर पालक देखील इथे अर्ज करू शकतात.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला हवे.

इथे उत्पन्नाचा दाखला लागणार असल्याने उत्पन्नाचा दाखला हा प्रत्येक अर्जदाराने तहसिल कार्यालयात जाऊन काढुन घ्यायचा आहे.

लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींची निवड केली जाणार आहे.यामुळे निवडीचा क्रम अतितीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांग असा असेल.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विषयी माहिती Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana in Marathi

अतितीव्र दिव्यांग असलेल्या व्यक्तींना वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असेल तर अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या एसकाॅड साहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज करताना अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे संबंधित वाहनाची काळजी घेण्याचे बंधपत्र देखील देणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय लाभार्थींची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.

अर्जदार व्यक्ती ही शासकीय निमशासकीय मंडळ महामंडळातील कर्मचारी नसावी.

सदर योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार दिव्यांग वित्त विभाग महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

दिव्यांग अपंगांसाठी मोफत वाहन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –

१) दोन पासपोर्ट साईज फोटो

२) अर्जदाराची सही

३) एससी एसटी असल्यास जातीचा दाखला खुल्या प्रवर्गासाठी व्यक्तींना जातीचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.

४) वय अधिवास प्रमाणपत्र

५) निवासी पुरावा

६) युडीआयडी सर्टिफिकेट

७) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र

७) ओळखपत्र म्हणून आधार कार्ड

८) बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

९) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र

मोफत वाहन योजनेसाठी आॅनलाईन फाॅम भरण्यासाठी दिलेल्या काही महत्वाच्या सर्वसामान्य सुचना –

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शाॅप आॅन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग व्यक्तींकडून आॅनलाईन पदधतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आॅनलाईन पदधतीने अर्ज सादर करण्यासाठी दिलेले नोंदणी पोर्टल ३/१२/२०२३ ते ४/१/२०२४ सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button