सरकारी योजना

(Tadpatri) ताडपत्री अनुदान योजना २०२४ विषयी माहिती

आपल्या देशातील सरकार येथील शेतकरयांच्या हितासाठी त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी नेहमी नवनवीन योजना राबवित असते.

आज आपण महाराष्ट्र शासनाने शेतकरींसाठी सुरू केलेल्या अशाच एका विशेष योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.ह्या योजनेचे नाव शेततळे Tadpatri अनुदान योजना आहे.

Tadpatri ताडपत्री अनुदान योजना काय आहे?

ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

शेततळे ताडपत्री अनुदान ही योजना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद निधीअंतर्गत सुरू केलेली योजना आहे.

हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान प्राप्त करून दिले जाते.म्हणजे यात फक्त पन्नास टक्के इतकी रक्कम शेतकरींना भरावी लागेल.

मिष्टी योजना काय आहे ? What is Mishti Scheme ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन प्राप्त व्हावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरीला पन्नास टक्के अनुदानावर ताडपत्री वितरीत करण्यात येत आहे.

आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करत शेती व्यवसाय करावा लागतो आहे.

अशातच शेतकरयांना शेतीशी संबंधित इतर वस्तु संसाधने देखील आपण उपलब्ध करून दिली तर शेतकरयांना याचा चांगला उपयोग होईल

तसेच जास्तीत जास्त व्यक्ती शेती व्यवसायाकडे वळतील हा हेतू मनात ठेवून शासनाने शेतकरींना पन्नास टक्के अनुदानावर ताडपत्री वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताडपत्री अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देऊन शेतीसाठी उपयोगाच्या ठरत असलेल्या ताडपत्री वितरीत करण्यात याव्यात.

तसेच शेतकरयांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे.हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Tadpatri योजनेची इतर उद्दीष्टे –

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त साहित्य सामग्रीची म्हणजे ताडपत्रीची खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्राप्त करून देणे.

शेतकरींना ताडपत्री खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडीअडचणीला सामोरे जावे लागु नये

शेतीक्षेत्राचा विकास करून शेतकरींच्या आर्थिक उत्पन्नात वाढ घडवून आणने

ताडपत्री अनुदान योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

ही योजना राज्य सरकारच्या जिल्हा परिषद योजनेअंतर्गत राबवली जाते.

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थींच्या बँक खात्यात डिबीटी द्वारे ट्रान्स्फर करण्यात येत असते.

ताडपत्री अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

ही योजना शासनाने विशेषतः शेतकरींसाठी सुरू केलेली आहे म्हणून ताडपत्री अनुदान योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी असणार आहेत.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू शकतात.

ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

योजनेअंतर्गत शेतकरींना शेतीसाठी उपयुक्त ताडपत्रीची खरेदी करण्यासाठी शासनाकडून पन्नास टक्के अनुदान दिले जाते.

ताडपत्री अनुदान प्राप्त करण्यासाठी सगळ्यात पहिले शेतकरयाला स्वताचे पैसे खर्च करून ताडपत्री विकत घ्यावी लागेल मग त्यानंतर ताडपत्रीचे बील पंचायत समिती मध्ये सादर करावे लागणार आहे.

यानंतर ताडपत्री खरेदी करण्यासाठी शेतकरयाला जितका खर्च आला त्याच्या पन्नास टक्के इतका अनुदानित खर्च लाभार्थीं शेतकरींच्या खात्यात डिबीटी दवारे जमा करण्यात येईल.

ताडपत्री अनुदान योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के इतकी रक्कम शासनाकडुन अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त होते.

ताडपत्रीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकाचे धान्याची नासाडी होणार नाही तसेच पावसापासून देखील त्यांचे संरक्षण होण्यास मदत होईल.

योजनेमुळे शेतकरींना आपल्या उत्पन्नात अधिक वाढ करता येईल.

शेतकरींना शेतीसाठी उपयुक्त ठरत असलेल्या ताडपत्रीची खरेदी करण्यासाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही.तसेच ताडपत्री खरेदी करण्यासाठी कोणाकडुन उधार उसनवारी करून पैसे घ्यावे लागणार नाही.

जास्तीत जास्त शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहीत होतील त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडुन येईल.

ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेणारा शेतकरी लाभार्थीं हा महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावा.

फक्त शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे इतर बाहेरच्या राज्यातील शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे बंधनकारक आहे तसेच त्याच्याकडे जमीन सुद्धा असायला हवी.

अर्जदाराने शासनाने सुरू केलेल्या ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत याआधी ताडपत्रीचा लाभ घेतलेला नसावा.

एका परिवारातील फक्त एक व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकते.

ताडपत्री खरेदी करण्यासाठी शेतकरींना कुठल्याही प्रकारचे अॅडव्हान्सड दिले जाणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

Tadpatri ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • ताडपत्री अनुदान योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज
  • आधार कार्ड
  • ताडपत्री खरेदी केल्याचे बील
  • जमिनीचा सातबारा अणि आठ अ उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बॅक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • ईमेल आयडी मोबाईल नंबर
  • संयुक्त शेजजमिन असल्यास जोडीदाराचे संमतीपत्र

ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

सर्वप्रथम आपणास आपल्या क्षेत्रातील कृषी कार्यालयात जायचे आहे अणि तिथुन ताडपत्री अनुदान योजनेचा फाॅम घ्यावा लागेल.

मग तो घेतलेल्या फाॅममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.त्या फाॅमला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो कृषी कार्यालयात जमा करायचा आहे.

यानंतर आपल्या जमा केलेल्या अर्जाची कागदपत्रांची तपासणी केली जाईल अणि लाभाची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यात येईल.

डेबिट क्रेडिट कार्ड वापरता? वीस मागे पाच जणांची फसगत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button