ट्रेंडिंगसरकारी योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विषयी माहिती Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana in Marathi

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीन शिष्यवृत्ती योजना आहे. हया शिष्यवृत्ती योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे आहे.

खुल्या प्रवर्गासाठी जशी पंजाबराव देशमुख अणि एससी एसटी कॅटॅगरी करीता जशी बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

तशाच प्रकारे ओबीसी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे.

ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर देखील काढला आहे.

हया योजनेसाठी शासनाने शंभर कोटी इतक्या वार्षिक खर्चाची तरतूद देखील केली आहे.

जननी सुरक्षा योजना विषयी माहिती Janani Suraksha Yojana in Marathi

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही खासकरून ओबीसी इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती,भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केलेली एक महत्वाची शिष्यवृत्ती योजना आहे.

आदिवासी विकास विभागातील स्वयं योजना अणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजना.

ह्या दोघांच्या धर्तीवर इतर मागासवर्गीय विमुक्त जाती,भटक्या जमाती अणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रति जिल्हा ६०० याप्रमाणे एकुण २१ हजार ६००…

विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास मान्यता दिली गेली आहे.

ह्या योजनेअंतर्गत भोजन, निवास,व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्याकरिता खालील निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक लिंक असलेल्या बॅक खात्यात थेट रक्कम वितरीत केली जाणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ –

  • जे विद्यार्थी मुंबई शहर, मुंबई उपनगर,नवी मुंबई, ठाणे,पुणे पिंपरी चिंचवड, नागपुर ह्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना भोजन भत्ता ३२ हजार,निवास भत्ता २० हजार,अणि निर्वाह भत्ता ८ हजार रुपये दिला जाईल.
  • प्रति विद्यार्थी एकुण संभाव्य वार्षिक खर्च ६० हजार केला जाणार आहे.
  • जे विद्यार्थी इतर महसुल विभागीय शहरात मध्ये किंवा उर्वरित क वर्ग मनपा ह्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत.
  • अशा विद्यार्थ्यांना ह्या योजनेअंतर्गत भोजन भत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण प्रति विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ५१ हजार रुपये केला जाईल.
  • इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २५ हजार,निवास भत्ता १२ हजार….
  • अणि निर्वाह भत्ता ६ हजार असा एकुण प्रति विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ४३ हजार रुपये ह्या योजनेअंतर्गत केला जाईल.
  • तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २३ हजार, निवास भत्ता १० हजार अणि निर्वाह भत्ता ५ हजार….
  • असे एकूण प्रति विद्यार्थी संभाव्य वार्षिक खर्च ३८ हजार रुपये केला जाणार आहे.
  • ह्या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून ६०० ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजनेसाठी मेरीट प्रमाणे निवड केली जाणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?

जे उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी अर्ज करतात पण त्यांना कुठल्याही शासकीय वसतीगृहात राहण्यासाठी जागा मिळत नाही.

फक्त अशा ओबीसी,एसबीसी,व्हीजे अणि एनटी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना हया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

जे विद्यार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेत आहे असे विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना का सुरू करण्यात आली आहे?

एससी एसटी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.

हया योजनेअंतर्गत एससी एसटी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला ६० हजार रुपये दिले जातात.

यात उरतात फक्त ओबीसी, एसबीसी, व्हीजे एनटी म्हणजेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग.

ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षण घेण्यासाठी काहीतरी आर्थिक लाभ मिळायला हवा काहीतरी आर्थिक साहाय्य प्राप्त व्हावे म्हणून विशेष मागण्या सुरू होत्या.

अणि आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की ह्या मागण्या सरकारकडून मान्य देखील करण्यात आल्या आहेत.

सावित्रीबाई फुले आधार योजनेमुळे आता इतर मागास वर्ग ओबीसी,विमुक्त जाती,भटक्या जमाती.

विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा आता उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीचा आधार दिला जाणार आहे.

शासनाच्या ह्या नवीन कल्याणकारी योजनेमुळे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यांना सुद्धा आता उच्च शिक्षण घेण्यासाठी वर्षाला ६० हजार रुपये दिले जातील.

माझी कन्या भाग्यश्री योजना विषयी माहिती Majhi kanya Bhagyashri Yojana Information in Marathi

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा अणि कुठे करायचा?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार हया योजनेसाठी अर्ज कधी अणि कुठे करायचा हे लवकरच कळविण्यात येईल.

योजनेसाठी लाभार्थीं निवडीचे जे काही निकष असतील त्या संदर्भात देखील लवकरच एक स्वतंत्र शासन निर्णय येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button