PM Shrestha : पीएम श्रेष्ठ योजनेविषयी माहीती
अनुसुचित जाती मधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या देशातील सरकार नेहमी नवनवीन उपक्रम योजना राबवित असते. आज आपण केंद्र सरकारने अनुसुचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेचे नाव पीएम श्रेष्ठ PM Shrestha योजना असे आहे.
अनुसुचित जाती ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम श्रेष्ठ ही योजना सुरू केली आहे.
पीएम श्रेष्ठ ह्या योजनेचा फुलफाॅम scheme for residential education for students high school in targeted area असा होतो.
पीएम श्रेष्ठ काय आहे ? What is PM Shrestha Scheme ?
ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे.पीएम श्रेष्ठ ही केंद्र सरकारची एक निवासी शिक्षण योजना आहे.
ह्या पीएम श्रेष्ठ योजनेत अनुसूचित जाती मधील एससी प्रवर्गातील गरीब तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण अणि संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
६ डिसेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने ह्या योजनेची सुरुवात केली होती.ही योजना भारत देशातील सर्व राज्यात लागु करण्यात आली आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ – Benefit given under PM Shrestha Yojana
ह्या योजनेअंतर्गत नववी तसेच बारावी इयत्तेपर्यत शिकत असलेल्या एससी कॅटॅगरी मधील विद्यार्थ्याना मोफत निवासीय शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.यामध्ये शाळेची फी,ट्यूशन फी आणि हॉस्टेल फीचा देखील समावेश असणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यांच्या हस्ते श्रेष्ठ नावाची योजना सुरू करण्यात येत आहे.
पीएम श्रेष्ठ ह्या योजनेअंतर्गत एससी प्रवर्गातील गुणवंत तसेच गरीब विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम खाजगी निवासी शाळेत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेचे लाभार्थी कोण आहेत ? Who are the beneficiaries of PM Shrestha Yojana?
अनुसूचित जाती एससी प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे अशा गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड –
Selection of students under PM Shrestha Yojana –
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षण एजंसी मार्फत राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आयोजित करून केली जाणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थीं विद्यार्थ्यांना नववी ते अकरावी इयत्तेपर्यत सीबीएसईशी संलग्न सर्वोत्तम खाजगी निवासी शाळेत प्रवेश दिला जातो.
पीएम श्रेष्ठ योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
अनुसूचित जाती प्रवर्गातील एससी प्रवर्गातील नववी ते गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण उपलब्ध करून देणे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जे काही दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे ते खाजगी शाळेमधुन उपलब्ध करून दिले जाणार आहे.अणि यात जो काही खर्च येईल तो केंद्र सरकार करणार आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?
पीएम श्रेष्ठ योजनेमुळे नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
योजनेमुळे देशातील अनुसुचित जाती प्रवर्गातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना देखील उच्च दर्जाचे शिक्षण घेता येईल ज्यामुळे त्यांना भविष्यातील संधी देखील शोधता येतील.
पीएम श्री योजना सरकारी शाळा़ंचा विकास Pm Shree School Scheme Information in Marathi
ह्या योजनेअंतर्गत विविध परिसरातील शाळांची निवड केली जाणार आहे अणि त्या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ह्या निवासी शिक्षणाचा लाभ दिला जाईल.
नववी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना घरची परिस्थिती गरीबीची असल्याने शाळा सोडुन देतात ह्या समस्येला ह्या योजनेअंतर्गत नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
ह्या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील एससी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला जाईल.
योजनेचा लाभ फक्त देशातील नागरीक असलेल्या एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
पीएम श्रेष्ठ ह्या योजनेचा लाभ फक्त विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना खुप महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.
पीएम श्रेष्ठ योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पत्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
पीएम श्रेष्ठ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर shreshta.nta.nic.in वर जावे लागेल.
यानंतर आपल्यासमोर योजनेचे होम पेज ओपन होईल तिथे दिलेल्या registration for 2024 ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आपल्यासमोर अजुन एक पेज ओपन होईल यानंतर आपल्यासमोर एक डिकलेरेशन बाॅक्स यावर सहमती दर्शवत टीक करून घ्यायचे आहे.
नंतर click here to proceed वर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
अणि खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.