सरकारी योजना

ई श्रम कार्ड योजनेविषयी माहीती E Shram Card Scheme Information In Marathi

आज आपला देश ज्या प्रगतीपथावर आहे जो विकास आपल्या देशाचा घडुन आला आहे त्यात आपल्या भारत देशातील कामगार वर्गाचा खुप महत्वाचा वाटा आहे. अणि आज आपल्या भारतातील गरीब कामगार वर्गाची संख्या देखील असंख्य प्रमाणात आहे. पण आज असंघटित क्षेत्रातील काम करत असलेल्या कामगारांना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडीअडचणी तसेच संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा ह्या देशातील गरीब मजदुर कामगाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या गरीब कुटुंबाला अनेक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.त्यांना एकवेळचे अन्न देखील प्राप्त होत नसते. म्हणुन आपल्या भारत देशातील गरीब तसेच कष्टकरी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी कामगारांकरीता शासनाने ह्या योजनेचा आरंभ केला होता. आजच्या लेखात आपण ई श्रम कार्ड E Shram Card ह्या योजनेची सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ई श्रम कार्ड योजना काय आहे?

E Shram Card ही भारत सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील गरीब, कष्टकरी श्रमिक वर्गासाठी सुरू केलेली एक महत्वाची कल्याणकारी योजना आहे.

देशातील असंघटित क्षेत्रातील गरीब कष्टकरी श्रमिक वर्गाला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाच्या वतीने त्यांना ई श्रम कार्ड जारी केले जाते.

ई श्रम कार्ड काय असते ? What is E Shram Card?

हे ई श्रम कार्ड देशातील असंघटित क्षेत्रातील गरीब कष्टकरी श्रमिक मजदुर तसेच कामगार वर्गाला शासनाने दिलेले एक ओळखपत्र आहे.

ह्या ओळखपत्राच्या आधारे कामगारांना शासनाने त्यांच्यासाठी सुरू केलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.

ई श्रम कार्ड तयार करण्यासाठी कामगारांना आॅनलाईन पदधतीने ह्या कार्ड साठी नोंदणी करावी लागते.

यानंतर मग सर्व महत्वाच्या कागदपत्रांची चौकशी करून झाल्यावर हे ई श्रम कार्ड तयार करून कामगाराला दिले जाते.

समजा एखाद्या असंघटित क्षेत्रातील कामगाराचा,मजदुराचा कामाच्या ठिकाणी अपघात झाला अणि अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला किंवा तो गरीब कामगार अपघातामुळे अपंग झाला तर अशा परिस्थितीत त्या कामगाराच्या कुटुंबाला ई श्रम कार्ड दवारे आर्थिक मदत प्राप्त होते.

ई श्रम कार्ड ही योजना सर्वप्रथम कधी सुरू करण्यात आली होती?

ही योजना सर्वप्रथम केंद्र सरकारच्या वतीने २०२० मध्ये देशातील कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत लाभार्थीं व्यक्तीस दोन लाखापर्यंतचा अपघाती विमा प्रदान केला जातो.

योजनेअंतर्गत एखाद्या कामगाराचा मजदुराचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये इतकी मदत केली जाते.अणि त्या मजदुराला अपघातात अपंगत्व आले तर एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.

ई श्रम कार्ड योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

भारतातील नागरीक असलेली तसेच असंघटीत क्षेत्रात कामगार असलेली कुठलीही गरीब कष्टकरी श्रमिक कामगार व्यक्ती ह्या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकते.

ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेचा लाभ फक्त भारत देशातील नागरिकांना दिला जाईल.

ई श्रम कार्ड हे फक्त असंघटित क्षेत्रातील पात्र कामगार, मजदुर,श्रमिक कष्टकरी वर्गाला प्रदान केले जाईल.

E Shram Card करीता नोंदणी करण्यासाठी आपले वय किमान सोळा ते एकोणसाठ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

महिला उदयोगिनी योजनेविषयी माहीती Mahila Udyogini Scheme Information In Marathi

ई श्रम कार्डसाठी नोंदणी करत असलेला अर्जदार व्यक्ती आयकर भरत नसावा.तसेच तो व्यावसायिक देखील असु नये असे असल्यास त्याला योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

E Shram Card योजनेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफ ओ तसेच इएस आयसी कर्मचारींना पात्र मानले जाणार नाही.

ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थलांतरित तसेच कृषी कामगारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे.

ह्या योजनेचा लाभ फक्त भारत देशातील असंघटित क्षेत्रातील गरीब कष्टकरी श्रमिक मजदूरांना तसेच भुमिहिन शेतकरी वर्गाला दिला जाईल.इतर शेतकरींना ह्या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करता येणार नाही.

ई श्रम कार्ड काढण्यासाठी कोणाकोणाला नोंदणी करता येणार आहे?

E Shram Card योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी भारत देशातील नागरिक असलेल्या असंघटित क्षेत्रातील कुठल्याही कामगाराला अर्ज करता येणार आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये कोणकोणाचा समावेश होतो?

असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये वीट भट्टी वर काम करणारा मजदुर,दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग,पेपर फेरीवाले,दुधाचा व्यवसाय करणारे,मेंढीपालन करणारे मेंढपाळ,सेल्समन,वेगवेगळ्या आॅनलाईन कंपनीत काम करणारे डिलीव्हरी बाॅय,पंचर काढणारा आॅटो चालवणारे भाजी विक्रेते,अल्पकाळ काम करणारे कामगार बांधकाम क्षेत्रातील कामगार, भुमिहिन शेतमजूर, घरगुती कामगार इत्यादींचा समावेश असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये होतो.

वरील सर्व कामगारांना ई श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी नोंदणी करता येईल.

ई श्रम कार्ड काढण्यासाठी कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?

कार्ड काढण्यासाठी आपल्याला पुढील महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • लाईटबील
  • अर्जदाराची सर्व शैक्षणिक माहिती
  • बॅक खात्याची डिटेल्स
  • आधार कार्ड सोबत रेजिस्ट्रर मोबाईल नंबर

ई श्रम कार्ड काढण्याचे महत्वाचे फायदे कोणकोणते आहेत?

ज्या असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपले ई श्रम कार्ड बनवले आहे त्यांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ प्राप्त करता येईल.

ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत केंद्र शासन देशातील मजदुर कामगार यांना आर्थिक मदत करते.

ज्या असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्डसाठी नोंदणी केली आहे त्यांना साठ वय झाल्यानंतर दरमहा पेंशन प्राप्त होते.

ई श्रम कार्ड ह्या योजनेअंतर्गत अपघात झाल्यास प्रत्येक नोंदणीकृत कामगारास दोन लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण दिले जाते.

ह्या योजनेचा लाभार्थीं अपघातात अपंग झाला तर त्याला एक लाखापर्यंतचे आर्थिक साहाय्य दिले जाते.

ज्या कामगारांनी ई श्रम कार्ड साठी आपली नाव नोंदणी केली आहे अशा कामगारांना त्यांचे स्वताचे घर बांधता यावे यासाठी शासनाच्या वतीने निधी सुद्धा दिला जातो.

ई श्रम कार्ड योजनेच्या पोर्टलवरून जे कामगार नोंदणी करत असतात त्यांना आपल्या कामानुसार मोफत उपकरणे वितरीत करण्यात येत असतात.

ह्या योजनेमध्ये जे कामगार समाविष्ट झाले आहेत त्यांना शासनाने श्रमिक कामगारांसाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो.

ई श्रम कार्ड मध्ये लाभार्थीं कामगारांना पुढील योजनांचा लाभ घेता येईल –

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
  • आयुष्यमान भारत योजना
  • अटल पेंशन योजना
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
  • प्रधानमंत्री आवास योजना
  • राष्ट्रीय सामाजिक साहाय्य योजना
  • राष्ट्रीय पेंशन योजना
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना

घरबसल्या आॅनलाईन पदधतीने आपले ई श्रम कार्ड कसे काढायचे?

ई श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला eshram.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

अणि ई श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी लागेल.

ई श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी आपल्याला eshram.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल अणि तेथे दिलेल्या register on eshram ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपण आपल्या आधार कार्ड सोबत संलग्न असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.अणि गेट ओटीपी वर क्लिक करायचे आहे.

आता आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जाईल तो इंटर ओटीपी ह्या बाॅक्स मध्ये भरायचा आहे.

यानंतर आपल्यासमोर एक रेजिस्ट्रेशन फाॅम ओपन होईल तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.फाॅमसोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहेत.अणि शेवटी खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून आपला फाॅम सबमिट करायचा आहे.

नोंदणी पुर्ण झाल्यावर आपल्याला दहा अंक असलेले ई श्रम कार्ड जारी केले जाते.

ई श्रम कार्ड योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कष्टकरी गरीब श्रमिक मजदुर कामगारांना एका व्यासपीठावर आणने हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button