सरकारी योजना

महिला उदयोगिनी योजनेविषयी माहीती Mahila Udyogini Scheme Information In Marathi

स्वताच्या पायावर उभे राहावे आपण स्वावलंबी व्हावे अशी आज प्रत्येक महिलेची मनापासूनची इच्छा असते. हयासाठी महिला सातत्याने धडपड देखील करत असतात. पण स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करून आपल्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी महिलांकडे भांडवल नसते ज्यामुळे कित्येक महिलांना स्वताजवळ कौशल्य असुन देखील पैशाच्या अभावामुळे स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेवरून महाराष्ट्र राज्यात महिला उदयोगिनी Mahila Udyogini Scheme ही योजना सुरू केली गेली आहे.

ज्या महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे भांडवलासाठी पुरेसे पैसे नाहीये.

अशा महिलांसाठी शासनाने एक विशेष योजना सुरू केली आहे जिचे महिला उदयोगिनी असे आहे.भारत सरकारच्या अंतर्गत महिला विकास महामंडळाकडुन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ह्या कार्यक्रमाद्वारे महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करून महिला उद्योजकतेस समर्थन तसेच प्रोत्साहन दिले जाते.

भारत सरकारने देशातील महिलांच्या विकासासाठी सुरू केलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण अणि अत्यंत महत्वाची योजना आहे.

महिला उदयोगिनी योजना काय आहे?

What is Mahila Udyogini Scheme ?

योजनेअंतर्गत महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

उदयोगिनी ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे जिच्याअंतर्गत उद्योग व्यवसाय करण्यासाठी महिलांना तीन लाखापर्यंतचे आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

ह्या योजनेअंतर्गत महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

योजनेअंतर्गत महिलांना कुठलाही एक उद्योग व्यवसाय सुरू करता येईल.

महिला उदयोगिनी हया योजनेअंतर्गत एकुण ८८ प्रकाराचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

गटई स्टाॅल योजनेविषयी माहीती Gatai Stall Scheme Information in Marathi

उदा,

  • अगरबत्ती उत्पादन
  • खाद्य तेलाचा व्यापार
  • लायब्ररी
  • बेकरी
  • पार्लर
  • बेडशीट टाॅवेल व्यवसाय
  • आॅडिओ व्हिडिओ पार्लर
  • रेडिओ टीव्ही सेवा
  • एनर्जी फुड
  • नाचणी पावडरचे दुकान
  • रेडीमेड कपडयांचा व्यवसाय
  • केळीचे पान बनवण्याचा विकण्याचा व्यवसाय
  • रिअल इस्टेट एजन्सी
  • सौंदर्य प्रसाधने गृह
  • बांगडयांचे शाॅप
  • चटई विणण्याचा व्यवसाय
  • चप्पलचे दुकान
  • रीबीन शाॅप
  • फुलांचे दूकान
  • जीम
  • चहा पावडरचा व्यवसाय
  • फोटो स्टुडिओ
  • मिठाईचे दुकान
  • टेलिरींग काम
  • लोकरीच्या कपडयांचा व्यवसाय
  • कॅन्टीन खाणपान
  • पिठाची गिरणी
  • माशांचे स्टाॅल
  • मटणाचे स्टाॅल

इत्यादी असा कुठलाही छोटा मोठा उद्योग व्यवसाय महिला ह्या योजनेअंतर्गत सुरू करू शकतील.

Mahila Udyogini Scheme योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

ज्या महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीये अशा महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे

तसेच राज्यात महिला उद्योजकतेस प्रोत्साहन देणे हे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Mahila Udyogini Scheme योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

महिला उदयोगिनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा ते पंचावन्न ह्या वयोगटातील सर्व महिला पात्र असतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

ज्या महिलांनी बॅकेकडुन कर्ज घेतले आहे अणि त्याची परतफेड केली नाहीये त्या महिलांना ह्या योजनेअंतर्गत कर्ज दिले जात नाही.

महिला उदयोगिनी योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

दिव्यांग तसेच विधवा परीतक्त्या महिलांना उदयोगिनी ह्या योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी उत्पन्नाची कुठलीही अट ठेवण्यात आली नाहीये.

विधवा दिव्यांग महिला परीतक्त्या यांना उदयोगिनी योजनेअंतर्गत व्याजमुक्त कर दिले जाते.म्हणजे ह्या योजनेअंतर्गत विधवा,दिव्यांग परीतक्त्या महिलांना कुठलेही व्याज न आकारता कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

योजनेअंतर्गत इतर प्रवर्गातील महिलांना १० ते १२ टक्के इतके व्याजदर आकारून कर्ज दिले जाते.यात ज्या बॅकेकडुन कर्ज दिले जाते त्या बॅकेच्या नियमानुसार हा व्याजदर ठरत असतो.

लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  • महिला उदयोगिनी योजनेचा अर्ज
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • बॅक खाते पासबुक
  • अर्जदार महिलेचे पासपोर्ट साईज दोन फोटो
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचा जन्म दाखला
  • दारिद्य्र रेषेखालील महिलांसाठी रेशनकार्ड झेरॉक्स

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करावा लागेल?

महिला उदयोगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला आपल्या राहत्या घराजवळील कुठल्याही एखाद्या बॅकेत किंवा ज्या बॅकेत आपले खाते आहे त्या बॅकेत जाऊन ह्या योजनेची चौकशी करावी लागेल.

ह्या योजनेचा अर्ज घेऊन तो भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन तो बॅकेत जमा करायचा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांना आॅनलाईन अर्ज करायचा आहे अशा महिला udyogini.org ह्या वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी आपला अर्ज सादर करू शकतात.

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

महिला उदयोगिनी ह्या योजनेअंतर्गत महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.हया घेतलेल्या कर्जात महिला दिलेल्या ८० लघुउद्योग व्यवसायांपेकी कुठलाही एक उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात.

महिला उदयोगिनी योजनेअंतर्गत महिलांना घेतलेल्या कर्जावर तीस टक्के इतके अनुदान दिले जाते.

ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे अणि त्यांना घरबसल्या स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांसाठी स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची ही एक चांगली संधी आहे.

योजनेअंतर्गत शारीरीक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना, आर्थिक परिस्थिती गरीबीची असलेल्या एससी एसटी कॅटॅगरी मधील महिलांना कुठलेही व्याज न आकारता कर्ज दिले जाते.

ह्या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनता येईल आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या आधार देता येईल.

महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही किंवा स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाकडुन उसणे पैसे देखील मागावे लागणार नाही.

ह्या योजनेमुळे महिलांना आर्थिक प्रगती साधता येईल.महिलांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होईल.

भारतातील सात व्यवसायांपेकी फक्त एका व्यवसायाची मालकीन महिला असते त्यामुळे महिला उद्योजकतेला अधिक प्राधान्य प्राप्त करून देण्यासाठी महिला उद्योजकतेस समर्थन देण्यासाठी ही महिला उदयोगिनी योजना सुरू करण्यात आली आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button