सरकारी योजना

महिला बचत गट नोंदणी अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती.

आज अशा अनेक सुशिक्षित महिला आहेत ज्यांना नोकरी न करता स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो. पण भांडवलाच्या अभावामुळे त्यांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करता येत नाही अशा स्वताचा उद्योग व्यवसाय करू इच्छित असलेल्या महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शासनाने एक कर्ज योजना सुरू केली आहे. ह्या कर्ज योजनेचे नाव महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना असे आहे. ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असते. आजच्या लेखात आपण महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना म्हणजे काय ?ह्या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ? ह्या योजनेअंतर्गत महिलांना किती कर्ज दिले जाते आणि महिला बचत गट नोंदणी अर्ज कसा करावा इत्यादी बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना म्हणजे काय?

योजना ही महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील स्त्रियांसाठी सुरू करण्यात आलेली शासकीय कर्ज योजना आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला बचत गटातील घरगृहिणींना,स्त्रियांना स्वताचा एखादा लघुउद्योग सुरू करायचा आहे.

अशा स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय करायला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगास चालना प्राप्त करून देण्यासाठी कमी व्याजदराची आकारणी करून,कमी अटी नियम लावून त्यांना ह्या महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

जेणेकरून अशा महिलांना आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा.

योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील स्त्रियांना दिला जातो.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत ज्या महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखापासुन २० लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

बचत गटातील २० महिला सभासदांना प्रत्येकी २५ हजार रुपये इतके कर्ज दिले जाते.हे कर्ज तीन वर्षांच्या आत परतफेड करावे लागते.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत आकारले जाणारे व्याजदर –

महिला बचत समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदर आकारून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

योजनेअंतर्गत महिलांना ९५ टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडुन अणि पाच टक्के कर्ज राज्य महामंडळाकडुन दिले जाते.त्यामुळे लाभार्थीं महिलेला पैसे स्वताच्या खिशातुन भरावे लागत नाही.

सावित्रीबाई फुले मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती Savitribai Phule Scholarship Scheme Information in Marathi

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील ज्या महिलांना स्वताचा एखादा लघुउद्योग सुरू करायचा आहे अशा महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने अणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आत्मनिर्भर बनवणे.

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी स्त्रियांना स्वताचा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून त्या सक्षम होतील हा देखील ह्या योजनेचा मुख्य हेतु आहे.

योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

महिला लाभार्थींचे वय किमान १८ ते ५० वयोगटा दरम्यान असणे आवश्यक आहे.

महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.

अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असावी.तसेच तिचे नाव दारिद्य्र रेषेखालील श्रेणीमध्ये असावे.

ग्रामीण भागातील अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न ९८ हजार अणि शहरी भागातील अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्जदार महिलेचे कुठलेही जुने गुन्हेगारी रेकॉर्ड नसावे.

ज्या महिलांनी बचत गट स्थापित केला आहे अणि तो बचत गट स्थापन करून दोन वर्षे इतका कालावधी पुर्ण झाला आहे अशा महिला बचत गटांना ह्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्जदार महिला मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमाती मधील असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात –

  • कर्ज योजनेचा अर्ज
  • जात प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेचे बॅकेत खाते असावे
  • महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न प्रमाण
  • महिलेचे पासपोर्ट साईज दोन फोटो
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा पुरावा
  • रेशनकार्ड, मतदान कार्ड
  • अर्जदार महिलेचे बचत गट सभासद ओळखपत्र
  • बॅक खाते पासबुक झेराॅक्स
  • बचत गटाचे पॅन कार्डची झेरॉक्स

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचे फायदे –

योजनेमुळे राज्यातील महिलांना स्वताचा स्वयंरोजगार उपलब्ध होईल अणि त्या सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील.

महिला उद्योजकतेस प्रोत्साहन प्राप्त होईल.

बचत गटातील स्त्रियांना स्वताच्या घराजवळ स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल.

योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी कमी कागदपत्रे लागतात.

महिलांना स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना जास्त व्याजदरात कोणाकडुनही कर्ज घ्यायची आवश्यकता भासणार नाही कारण ह्या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा? महिला बचत गट नोंदणी अर्ज कसा करावा

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज करायला अर्जदाराला आपल्या जवळील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयात जावे लागते.

यानंतर आपणास महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या कार्यालयात जमा करायचा आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button