सरकारी योजना

Rashtriya Gokul Mission Yojana राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेविषयी माहिती

राष्ट्रीय गोकुळ मिशन ही योजना (animal husbandry department)पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन Rashtriya Gokul Mission ह्या योजनेमध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ(national dairy development board) नोडल एजन्सी म्हणून काम करते.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेमध्ये कोणाला अर्ज करता येईल?

Rashtriya Gokul Mission ह्या योजनेमध्ये एखादी व्यक्ती वैयक्तिक अर्ज करू शकते.

सेल्फ हेल्प गृप तसेच एफपीओ,एफपीसी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय गोकुळ मिशन ह्या योजनेमध्ये कोणाला अर्ज करता येत नाही?

प्रायव्हेट लिमिटेड फर्म तसेच पार्टनरशिप फर्म देखील ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही.

राष्ट्रीय गोकुळ मिशन ह्या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

Rashtriya Gokul Mission ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या अर्जदाराच्या नावावर किमान पाच एकर जमीन असणे आवश्यक आहे.

समजा अर्जदाराच्या नावावर जमीन नसेल त्याच्या घरच्यांच्या नावावर जमीन असेल तरी देखील चालते.

किंवा अर्जदाराचे घरातील कोणाच्याही नावावर जमीन नसेल तर अर्जदार आपल्या मित्राच्या तसेच कुठल्याही नातलगाच्या, एखाद्या परक्या व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन १० वर्षाच्या नोंदणीकृत भाडे पट्टी करारावर घेऊ शकतो.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे दोनशे गायी तसेच दोनशे म्हशी असाव्यात.हया कुठल्याही जातीच्या किंवा विशिष्ट जातीच्या असल्या तरी देखील चालेल.

तसेच आपल्याला ह्या कामातील काहीतरी अनुभव असायला हवा.

शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहिती

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम किती आहे?

ह्या योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम ही दोनशे कोटी इतकी आहे.

कारण ह्या प्रकल्पात आपल्याला दोनशे गायी म्हशी विकत घ्याव्या लागतात,त्यांच्यासाठी शेड उभारावे लागते.जनावरांसाठी चारा रूम बांधावा लागतो.

याचसोबत आपणास सर्व डेअरी संसाधने खरेदी करावी लागतात.हया सर्व गोष्टींसाठी आपणास साधारणतः चार ते सव्वाचार कोटी इतका खर्च येत असतो.

म्हणजे ह्या चार सव्वाचार कोटींच्या पन्नास टक्के इतकी अनुदानाची रक्कम आपणास दिली जाते.चार कोटीचा प्रकल्प असल्यास त्यांच्या पन्नास टक्के इतकी रक्कम म्हणजे २ कोटी इतके अनुदान आपल्याला दिले जाते.

दोन कोटीपेक्षा अधिक अनुदान आपल्याला ह्या राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत दिले जात नाही.

प्रकल्पाचा एकुण खर्च चार सव्वाचार कोटी असल्यास दोन कोटी इतकी आपल्याला सबसिडी प्राप्त होते.दोन करोड रुपये इतके कर्ज घ्यायचे आहे.अणि बाकीचे ३० ते ४० लाख म्हणजे दहा टक्के इतका प्रकल्प खर्च स्वता करायचा आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

योजनेअंतर्गत लाभार्थींना फ्रंट एंड सबसिडी दिली जाते.हया सबसिडीचा वापर लाभार्थीं गायी म्हशी विकत घेण्यासाठी तसेच शेडबांधकाम करण्यासाठी इत्यादी आवश्यक डेअरी संसाधने खरेदी करण्यासाठी देखील करू शकतो.

इत्यादी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या सबसिडीचा वापर आपणास करता येईल.

यात गायी म्हशींसाठी आपल्याला आयव्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर देखील करता येईल.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

ह्या योजनेअंतर्गत दोन कोटी इतके कर्ज प्राप्त करण्यासाठी आपले सिबिल चांगले असणे आवश्यक आहे.

आपल्याकडे असलेल्या पाच एकर जमीनीची तसेच आपण १० वर्षाच्या भाडेपटटी करारानुसार घेतलेल्या जमीनीची

मार्केट व्हॅल्यू दोन कोटी असणे आवश्यक आहे.

समजा आपल्याकडे असलेल्या पाच एकर जमीनीची तसेच दहा वर्षांच्या भाडेपटटी करारानुसार घेतलेल्या जमीनीची मार्केट व्हॅल्यू दोन कोटी पेक्षा कमी असेल तर आपण आपली किंवा आपल्या मित्राची नातलगाची दुसरी शेतजमीन,फ्लॅट,मालमत्ता दोन कोटींच्या सिक्युरिटी साठी दिली तरी चालेल.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेसाठी कर्ज प्राप्त करण्याची प्रक्रिया –

सगळ्यात पहिले अर्जदाराला आपला अहवाल तयार करावा लागतो.मग योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागेल.

आॅनलाईन अर्ज केल्यानंतर तीन चार महिन्यांनी आपल्याला प्रथम सबसिडी मंजुरी पत्र तसेच बॅक फाॅरवर्डिग लेटर एल ओ आय प्राप्त होते.

एल ओ आय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुन्हा बॅकेत जावे लागेल मग बॅक आपल्या मालमत्तेचे कायदेशीर कारवाई करून प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे मुल्यांकन करते मग सर्व चौकशी झाल्यावर आपणास सॅक्शन लेटर देत असते.

हे सॅक्शन लेटर आपल्याला एन डी डीबी (national dairy development board) च्या वेबसाईटवर अपलोड करावे लागते यानंतर राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे कर्मचारी आपल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी भेट देतात.

मग आपली मालमत्ता बॅकेतर्फे माॅरगेज होते माॅरगेज मालमत्ता झाल्यानंतर एनडीडीबी अणि बॅकेमध्ये अनुदान करार होता.

ह्या अनुदान करार झाल्यानंतर आपल्या बॅकेत लोन अकाऊंटं अणि सेविंग अकाऊंट असे दोन खाते ओपन होतात.

सेविंग अकाऊंटं मध्ये सबसिडी ही आपल्याला आठ टप्प्यात दिली जाते अणि लोन अकाऊंटं मध्ये आपल्याला लोनची रक्कम जमा केली जाते.

म्हणजे सेविंग अकाऊंट मध्ये अनुदानाची रक्कम अणि कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाते.

गायी म्हशी विकत घेण्यासाठी शेड उभे करण्यासाठी आपल्याला सुरूवातीला जे सात आठ महिने लागतील त्या कालावधीत आपल्याला बॅकेचा हप्ता भरावा लागत नाही हया सात आठ महिन्यांच्या कालावधीत आपल्याला बॅकेकडुन घेतलेल्या रक्कमेवर फक्त बॅकेचे व्याज द्यावे लागते.

सात महिन्यांनंतर सात वर्षे इतक्या कालावधीसाठी ई एम आय सुरू होतो.हा ईएम आय अडीच ते तीन लाखांच्या आसपास असतो.आपण किती कर्ज घेतो आहे त्यावर देखील हा ई एम आय किती भरावा लागेल हे ठरत असते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर अर्ज केल्यानंतर बॅकेकडुन कर्ज प्राप्त करण्यासाठी तीन महिने लागतात,

मग प्रकल्पासाठी निधी उभा करायला सात ते आठ महिने इतका कालावधी लागतो.यानंतर आपला प्रकल्प उभा राहत असतो.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button